Friday, 25 December 2020

गीता जयंती

आज मार्गशीर्ष शु. एकादशी भागवत एकादशी म्हणजेच गीता जयंती. आजच्याच दिवशी साडेपाच हजार वर्षांपूर्वी कुरुक्षेत्राच्या मैदानावर महाभारताचे महान धर्मयुद्ध सुरू झाले होते.या युद्धापूर्वी अर्जुन युद्धापासून परावृत्त झाला तेव्हा युध्दापासून परावृत्त झालेल्या कर्तव्यच्युत अर्जुनाला पुन्हा युद्धासाठी उभे करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजेच श्रीमद्भगवद् गीता आणि या गीतेची जयंती आज आहे. श्रीमद्भगवद् गीता विश्वातील एकमेव ग्रंथ ज्याची जयंती साजरी केली जाते तो हिंदूंचा धर्मग्रंथ श्रीमद्भगवद् गीता. 

या श्रीमद्भगवद् गीतेमध्ये एकूण 700 श्लोक आहेत जे विविध 18 अध्यायांत विभागले आहेत. गीतेचा प्रथम अध्याय अर्जुनाच्या विषादापासून सुरू होतो ज्याचे नाव "अर्जुनविषादयोग" असे आहे तर शेवट "मोक्षसन्यासयोग" या अध्यायाने होतो. गीतेत एकूण चार व्यक्तींमधील संवाद आहे. त्यांपैकी मुख्य संवाद हा अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांतील असून संजय नावाचा धृतराष्ट्राचा सारथी ते सर्व (महर्षी वेदव्यासांनी दिलेल्या दिव्यदृष्टी द्वारे) बघून धृतराष्ट्रास सांगत आहे. गीतेचा पहिला श्लोक हा धृतराष्ट्राचा असून त्यात तो संजयला कुरुक्षेत्रावरील परिस्थिती विचारतो तर शेवटचा श्लोक हा संजयने म्हटलेला आहे ज्यात तो धृतराष्ट्राला युद्ध सुरू होण्यापूर्वीच युद्धाचा परिणाम सांगतो की पांडवच युद्ध जिंकणार आहेत असे. 
या गीतेची आज साडेपाच हजार वर्षांनंतरही खासियत अशी की ती आजच्याही  विश्वाचिंतकांचे प्रश्न सहज सोडवते. म्हणूनच भारताच्या स्वातंत्र लढ्यात अगदी दोन टोके समजले जाणारे लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी दोघांनीही श्रीमद्भगवद् गीता उचलली होती. स्वामी विवेकानंद तर त्यात सर्व धर्मांचा पाया बघतात (स्वामी विवेकानंद यांचे शिकागो मधील भाषण आणि विश्व धर्म परिषदेतला प्रसंग यासाठी प्रसिद्ध आहे) म्हणूनच या भारताला 2020 चे मिशन देणारे भूतपूर्व राष्ट्रपती (राष्ट्राध्यक्ष) डॉ. ए पी जे अब्दुल कलाम मुस्लिम असूनही श्रीमद्भगवद् गीतेचे अभ्यासक आणि पूजक होते. याच गीतेचा विभूती योग (अध्याय 10वा) विश्वातील चराचरात भरून राहिलेल्या भगवंताचे दर्शन घडवते. 
तेव्हा एक हिंदू आणि महत्वाचे म्हणजे मानव म्हणून आपण एकदा तरी या आपल्या धर्मग्रंथास उघडून बघितले पाहिजे किंवा निदान त्याबद्दल महत्वाची जुजबी माहिती तरी आपणाला असावी या करताच हा लेखन प्रपंच.....

"गर्व से कहो मुझे मेरे धर्मग्रंथ के बारे मे पता है, और वह श्रीमद्भगवद् गीता है......."

Thursday, 24 December 2020

बाळ येशू मंदिर, नाशिकरोड

२५ डिसेंबर ला जगभर नाताळ साजरा केला जातो. आज नाताळच्या पूर्वसंध्येला आपण नाशिकरोडच्या प्रसिद्ध अशा बाळ येशू तीर्थस्थान (Shrine of Infant Jesus) बद्दल जाणून घेऊयात.

नाशिकरोडला असलेले हे बाळ येशूचे मंदिर ५१ वर्षापूर्वी दिवंगत फादर पीटर लुईस यांनी स्थापन केले. मंदिरात बाळ येशूची अतिशय सुरेख मूर्ती आहे. बाहुली व अन्य वस्तू वाहून मनोभावे नवस केला तर तो पूर्ण होतो, अशी श्रद्धा आहे.

 १९६१ मध्ये फादर पीटर लुईस यांनी बाल येशू यात्रेला प्रारंभ केला, तेव्हापासून दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या 
तिस-या शनिवारी पूर्ण दिवस व रविवारी दुपारपर्यंत ही यात्रा भरते. 

जगातील ही अशाप्रकारची केवळ दुसरी यात्रा आहे. जगात झेकोस्लाव्हिया देशाच्या प्राग शहरात व नाशिकरोड येथेच ही यात्रा भरते. तेथूनच मंदिरातील मूर्ती आणण्यात आली आहे.

नवस करण्यासाठी मेणबत्ती, घर, बाहुली, गाडी, भोवरा यांची प्रतिकृती वाहिली जाते. यात्रेचा दरवर्षी वेगवेगळा विषय असतो.

Tuesday, 22 December 2020

कोदंडधारी श्रीराम

 कोदंडधारी श्रीराम 

भोसला मिलिटरी स्कूलच्या आवारात कोदंडधारी श्रीरामाचे सुंदर मंदिर आहे. या मंदिरात तरुण कोदंडधारी श्रीरामाची मूर्ती स्थापित केलेली आहे.

देशात अशा प्रकारची हि एकमेव मुर्ती असल्याचे सांगितले जाते, कारण मंदिरामध्ये फ़क्‍त रामाचीच मुर्ती स्थापन करु नये असा दंडक आहे. वैशिष्ट्य असे कि, येथील भोसला मिलिटरी स्कुलमध्ये  प्रशिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांनी उडविलेल्या बंदुकीच्या गोळ्यांच्या रिकाम्या काडतूसाच्या धातुतून ही मुर्ती बनवली  असल्याने तिची चकाकी कायम असते व मुर्तीवरही रासायनिक प्रक्रिया वा इतर परिणाम होत नाही. मूर्तीतून रामाचे लोभसवाणे पण कणखर व्यक्‍तिमत्व साकार होते. रामाच्या डाव्या हातात धनुष्य, उजव्या हातात बाण व डोक्यावर मुकुट असून प्रत्यंचा सरळ रेषेत ताण दिल्यासारखी बरोबर वाटते. ही मूर्ती ख्यातनाम शिल्पकार सदाशिव साठे यांनी बनवली आहे. 

This Murti of a young Kodand dhari Shri Ram is cast from the melted metal of discarded bullet casings used by Bhonsala Military School students in Nasik. 






Monday, 21 December 2020

शिवप्रतापदिन

आज मार्गशीर्ष शु. सप्तमी. 

शिवप्रताप दिन!!! 

प्रतापगडावर महाराजांनी अफझलखान मारीला! अखिल हिंदुस्तानात महाराजांचा दबदबा निर्माण करणारी घटना!

#स्वराज्याच्या #इतिहासातला #सुवर्णक्षण..#अफझल खानाच्या रूपात #स्वराज्यावर चालून आलेले संकट #छत्रपती #शिवाजी #महाराजांनी #प्रतापगडावर त्याचा वध करून दूर केले, तसेच त्यांच्या सैन्याचा दणदणीत पराभव करून परतावून लावले. 

जॅक्सन खून खटला

आजच्या दिवशी 1909 साली संगीत शारदा या नाटकाच्या प्रयोगादरम्यान अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा तत्कालीन कलेक्टर जॅक्सनचा विजयानंद नाट्यगृहात गोळ्या झाडून वध केला.

Sunday, 20 December 2020

खंडेराव मंदिर चंदनापुरी

बाणाई मंदिर

मुंबई -- नाशिक -- नागपूर  राष्ट्रीय महामार्गापासून फक्त कि.मी. अंतरावर, मालेगाव शहराच्या दक्षिणेस गिरणा  व मोसम नदीच्या संगमापासून जवळच  एक कि.मी.वर ऐन नदीकाठावर चंदनापुरी हे छोटेसे टुमदार गाव वसलेले आहे.महामार्गावरुनच बानुबाईच्या मंदिराचे कळस दिसतात. वाकड्या --  तिकड्या वळणाची चिमुकली गाडीवाट आपल्याला थेट गावाच्या वेशीत नेऊन सोडते. आता ती वाट डांबरी रस्त्याचा साज ल्यायली आहे. वेशीतून आत शिरताच लगेच डावीकडे वळावे. अगदी 100 फुटावरच, नदीपात्रात पाय रोवून हे मंदिर ऊभे आहे. मंदिराभोवतीच्या तटबंदीचे प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख आहे तर मूळ मंदिराचे प्रवेशद्वार पुर्वाभिमुख आहे. आत खंडेरावाच्या डाव्या अंगास बाणाई तर उजव्या अंगास म्हाळसासुंदरी अशी तिघांची मूर्ती आहे. 

वेशीपासून सरळ दक्षिणेस पुढे 100 फुटावर फक्त बानुबाईचेच मंदिर आहे. निसर्ग रमणिय परिसरातील गर्दीपासून  दूर असलेले हे मंदिर मनाला भाळून टाकते.

Saturday, 19 December 2020

चंपाषष्ठी

मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. यास खंडोबाचें नवरात्र असें म्हणतात. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. जेजुरी ह्या गावी मल्हारी देवस्थान आहे. 

यामागील कथा अशी आहे की आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन ‘मणी’ व ‘मल्ल’ दैत्यांचा वध केला. ‘मल्हारी मार्तंड’ हा महादेवाचा एक अवतार होता. कृतयुगात ब्रह्म देवाने मणी व मल्ल राक्षसांना वर दिले होते की तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही. हे वर प्राप्त केल्यावर ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले. त्यांचा हा त्रास बघून ऋषीमुनींनी देवांकडे मदत मागितली. तेव्हा भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपले ७ कोटी अर्थात येळकोट सैन्य घेऊन राक्षसांवर चालून गेले. मार्तंड भैरवांनी मणी राक्षसाची छाती फोडून त्याला जमिनदोस्त केले. तसेच मणी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे व माझे अश्वारूढ रूपही तुझ्या शेजारी राहावे अशी इच्छा व्यक्त केली. भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले. 

नंतर मार्तंड भैरवांनी मल्ल राक्षसाचा पराभव केला, तेव्हा त्याने शरण जाऊन तुमच्या नावाआधी माझे नाव जोडले जावे अशी मागणी केली. तथास्तु म्हणून मार्तंड भैरवाने तेही मान्य केले. तेंव्हापासून त्यांना मल्हारी मार्तंड असे म्हटले जाते. 
या दिवशी प्रामुख्याने वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. तसेच या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवितात. तसेच या नैवेद्याचा काही भाग कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात. 

(कॉपी पेस्ट)

जिद्दीच्या जोरावर स्वतःला सिद्ध करणाऱ्या मराठी तरुणाची यशोगाथा

 इंजिनीअर तरुण वळला अंजिराच्या शेतीकडे, वर्षाकाठी करतोय दीड कोटीची उलाढाल

जिद्दीच्या जोरावर स्वतःला सिद्ध करणाऱ्या मराठी तरुणाची यशोगाथा
इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी, नंतर आयुष्य ऐषोआरामात आयुष्य…असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पुण्याच्या दौंड येथील समीर डोंबे या तरुणानेही आपलं इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण करत पहिलं दीड वर्ष नोकरी केली. महिन्याकाठी ४० हजाराचा पगार मिळत असून नोकरीचं धकाधकीचं जीवन आणि त्यातून मिळणारा मोबदला यामुळे समीर फारसा समाधानी नव्हता. २०१३ साली समीरने नोकरी सोडत अंजिराची शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला परिवारातील एकही सदस्य किंवा मित्राने समीरच्या या निर्णयाला पाठींबा दिला नाही. तरीही समीरने जिद्दीने अजिंराची शेती करत वर्षाकाठी दीड कोटीची उलाढाल करेपर्यंतचा पल्ला गाठला आहे.
“आमच्या दौंड भागात सिंचनाची हवीतशी सोय नाही. परिसरातली संपूर्ण शेती ही पावसावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत मी शेतीमध्ये फारकाळ टिकू शकणार नाही असं सर्वांना वाटत होतं. माझं लग्न कसं होणार अशी चिंता आई-बाबांना होती.” समीर बेटर इंडिया या संकेतस्थळाशी बोलत होता. समीरने स्वतःच्या काही कल्पना अमलात आणत वेगळा बदल घडवून आणला. अडीच एकराच्या शेतजमिनीवर अंजिराचं उत्पन्न आल्यानंतर हातात आलेलं पिक बाजार समितीत नेण्याऐवजी समीरने १ किलोचे बॉक्स तयार करुन स्थानिक बाजारपेठेत विकण्यासाठी द्यायला सुरुवात केली.
छोट्या बॉक्समध्ये मिळणारं अंजीर पाहून समीरच्या एका मित्राने सुपरमार्केटमध्ये हे बॉक्स विक्रीसाठी ठेवण्याची कल्पना सुचवली. यानंतर एका स्थानिक सुपरमार्केटसोबत करार केल्यानंतर समीरला चांगला प्रतिसाद मिळायला लागला. यानंतर समीरने आपल्या शेतातलं अंजिराचं पिक ‘पवित्रक’ या नावाने बाजारात आणलं. यानंतर पुणे, मुंबई, बंगळुरु, दिल्ली यासारख्या शहरांमधूनही समीरच्या शेतातील अजिंरांना मागणी वाढायला लागली.
आपल्या उत्पादनाचा वेगळा ब्रँड समीरने बाजारात आणला आहे
आपल्या बॉक्सवर उत्पादनाचं नाव, फोन नंबर आणि कंपनीचा पत्ता लिहीलेला असतो. त्यामुळे काही ग्राहक माझ्याशी थेट संपर्क साधून मागणी करायचे. मग काही ग्राहकांनी एक छोटासा ग्रुप तयार करत मोठ्या प्रमाणात अंजिराची ऑर्डर द्यायाला सुरुवात केली. याचाही आपल्याला फायदा झाल्याचं समीर म्हणाला.
दौंड हे पुणेशहरापासून लांब असल्यामुळे या भागात प्रदूषणाचा फारसा त्रास नाही. अंजिराचं उत्पन्न घेण्यासाठी आवश्यक असलेली हवामानाची परिस्थिती, मातीचा पोत हे सर्वकाही अनुकूल होतं. या पट्ट्यात कोणीही अंजिराची शेती करत नसल्यामुळे याचा फायदा समीरने घेत आपलं उत्पादन बाजारत आणलं. या प्रयोगाला मिळालेलं यश पाहून समीरने आपली अडीच एकराची शेती पाच एकरावर नेली असून उर्वरित जागेत तो अंजिरापासून जॅम आणि पल्प असे पदार्थ तयार करुन विकतो. ग्राहकांशी थेट संपर्क असल्यामुळे लॉकडाउनकाळातही समीरने थेट Whats App वरुन ऑर्डर स्विकारत खडतर काळात १३ लाखांचा धंदा केला. समीरच्या शेतातील उत्तम दर्जाच्या अंजिरांना आज बाजारात ८० ते १०० रुपये किलो असा भाव मिळतो. काहीतरी नवीन करायची जिद्द, समोर संकंट आली तरीही न घाबरता आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्याच्या गुणामुळे आज समीर डोंबे या तरुणाने स्वतःला सिद्ध केलं आहे.
(लोकसत्ता)





नाशिकचा पैसे छापण्याचा उद्योग

पैसे छापणे हा नाशिकचा खुप जुना व्यवसाय आहे आजही नाशकात भद्रकाली परिसरात एक टांकसाळ गल्ली आहे इथल्या टांकसाळे वाड्यात मुठ्ठल नामक परिवार राहायचा त्यांना पेशव्यांनी टांकसाळे हे आडनांव दिले होते बडोद्याचे गायकवाड नाशकातल्या टांकसाळीतून १७६९ ते सुमारे १७७२ या कालावधीत आपली नाणी पाडत असत पेशवाईत नाणी पडण्याच्या भानगडीत सरकार पडत नसे नाणी पाडणे हा खाजगी धंदा असायचा हा व्यवसाय सुरु करायला सरकारची परवानगी मात्र घ्यावी लागे अर्थात सरकार नाणी पडण्याचा मोबदला मात्र घेत असे १७५०च्या सुमारास दोन कासारांना नाणी पाडण्याची परवानगी मिळाली होती तीन वर्षाच्या लायसन्ससाठी त्यांना १२५ रुपये फी भरावी लागली होती शिवाय गिऱ्हाईकानी नाणी पाडण्यासाठी टांकसाळीत चांदी जमा करायची आणि दर शेकडा नाण्यांच्या मागे सरकारला काही करही द्यावा लागे १७६५ मध्ये नाशकातल्या लक्ष्मण आप्पाजी यांनी माधराव पेशव्यांच्या परवानगीने इथे टांकसाळ सुरु केली बहुतांश अशिक्षित असणाऱ्या रयतेला मोघलाई पासून चालत आलेले चलनच पेशव्यांनी चालू ठेवले चांदवडच्या टांकसाळीतून निघालेल्या नाण्यावर जाफराबाद उर्फ चांदोरचा उल्लेख सापडतो पेशव्यांचे सेनाधिकारी तुकोजीराव होळकर यांनी चांदवडच्या किल्ल्यावर सोने, चांदी, तांब्याची नाणी पडण्याचा परवाना दिला होता पण नंतर म्हणजे सुमारे १८०० मध्ये ही टांकसाळ चांदवड शहरात आली.

सन १८०० च्या पुढे एकोणिसाव्या शतकात ब्रिटिशांचा अंमल बळावत चालला सुरुवातीला त्यांनी त्या त्या ठिकाणांचीच नाणी व्यापारासाठी वापरली सुमारे १८३० पर्यंत तरी स्थानिक नाणी आणि स्थानिक टांकसाळी आहे त्या परिस्थितीत चालू ठेवल्या पण १८३५ साली मात्र इंग्रजांनी नाणे विषयक कायदा केला संपूर्ण हिंदुस्थानात एकाच प्रकारची नाणी वापरण्याची सक्ती केली नाण्याच्या एका बाजूला किंमत लिहिलेली असे आणि दुसऱ्या बाजूला सुरुवातीला चौथ्या विल्यमचे आणि १८४० नंतर व्हिक्टोरीया राणीचे चित्र १८३० साली इथली बहुतेक सर्व नाणी मुंबईच्या टांकसाळीत पाडली जाऊ लागली पण याच कालावधीत इंग्लंडात जोरदार औद्योगिक क्रांती झाली पण पहिल्या महायुद्धामुळे चांदीचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आणि साहेबाच्या डोक्यात हिंदुस्थानात कागदी रुपये छापायची कल्पना आली इंग्रज व्यापाऱ्यांच्या कलकत्ता, मद्रास, मुंबई सारख्या ठिकाणी काही बँका होत्या त्या त्या ठिकाणच्या, स्थानिक व्यवहारांसाठी या बँका कागदी नोटा वापरायच्या पण हिंदुस्थानात वापरल्या जाणाऱ्या या नोटा इंग्लंडातच छापल्या जायच्या तिथून इकडे यायच्या पण नाण्यांमुळे काम चालत असल्याने नोटा तिकडे छापून इकडे आणण्याची अडचण वाटत नव्हती पण आता चांदीच्या तुटवड्यामुळे इंग्रजाला कागदी नोटा इथे हिंदुस्थानात कुठे तरी छापायच्या होत्या आणि रंगून, कराची, ढाका, कलकत्ता, लाहोर, कानपुर, मद्रास, दिल्ली, पुणे, बेंगलोर इत्यादी सगळी महत्वाची ठिकाणे बाजूला सारून साहेबाला नाशिकनेच भुरळ घातली नाशिकची निवड नोटा छापण्यासाठी करताना इंग्रजांनी अगदी सखोल विचार करूनच केली होती नाशिक एकतर मुंबईच्या जवळ हवामानाच्या बाबतीत नाशिक सुरुवाती पासूनच सरस कुठल्याच मोसमात अतिरेक नाही पण वर्षभर तुलनेने थंड हवेचे ठिकाण उन्हाळ्यातही दिवसातले काही तास सोडले तर अन्य प्रहरी नाशकात सुखद हवामान साठ वर्षांपूर्वी सुरु झालेली रेल्वे हे ही एक महत्वाचे कारण होते ज्यामुळे साहेबाला नाशिक नोट छपाईसाठी आकर्षक वाटले शेजारीच देवळाली होते पूर्वी पासूनच देवळाली हा इंग्रजी फौजेचा तात्पुरता तळ असे त्यामुळे नोटा तयार झाल्यावर रेल्वेतून वाहतूक करताना आवश्यक असण्याऱ्या संरक्षणाची व्यवस्थाही तयार होती एका व्यवसायाची अनोख्या ठिकाणी सुरुवात करताना सर्वात महत्वाची आवश्यक ती बाब म्हणजे मनुष्यबळाची विसाव्या शतका पर्यंत हजारो वर्षे नाशिकमध्ये असणाऱ्या आणि बहरत गेलेल्या उद्योग आणि व्यापारामुळे नाशिक हे एक उद्यमशील शहर होते आणि त्यामुळेच इथे एका नवीन उद्योगाला आवश्यक असणाऱ्या कारागिरांची आणि अन्य मनुष्यबळाची इथे कधीच कमतरता नव्हती आणि नाही अशा अनेक मुद्द्यांचा सारासार विचार करून इंग्रजांनी नाशकात नोटा छापायचा निर्णय घेतला आणि १९२८ साली नाशकात हा कारखाना सुरु झाला.

(कॉपी पेस्ट)

ब्रह्मगिरी चा मारुती

🚩🚩 जय बजरंगबली 🚩🚩
 
ब्रह्मगिरी पर्वतावरील मार्गावर कातळात कोरलेली मारुती ची मूर्ती 

Picture credit  - @rohan_gadekar08

Friday, 18 December 2020

शेतकरी फळे भाजी सुपर मार्केट

बंगलोरमध्ये शेतक-यांनी सुरू केले स्वतःचे फळे भाजीपाल्याचे सुपर मार्केट. शेतातील माल थेट ग्राहकांपर्य॔त पोहोचण्यासाठी सर्वोत्तम पर्याय. आपल्या कडेही असे व्हायला हवे.



नाशिकचे ग्रामदैवत - भद्रकाली

जुन्या नाशकात भद्रकाली देवीची मूर्ती सध्या या जागी आणली ती ईस्लामी आक्रमणा पासून बचाव करण्यासाठी.  १७९० साली हे मंदिर बांधण्यात आले. जुन्या नाशकातील प्रथा-परंपरा या मंदिराद्वारे नकळत जपल्या जात आहेत.

तसं बघितलं तर येथे रोज दर्शनाला येणारे फार नाहीत पण नवरात्रात हे दृश्य बदलते परिसरातील जुन्या वाड्यांमधील महिला हातात जपमाळ घेऊन देवीला १०८ प्रदक्षिणा घालू लागतात. संध्याकाळी भारतीय बैठक अंथरले जाते. ब्रह्मवृंद यजुर्वेद संहितेचे धीर गंभीर स्वरात सामुहिक पठण करू लागतात. त्यावेळेस मंदिराचा गाभारा भारला जातो. येथे खरोखरच आदिशक्तीचा निवास आहे असे जाणवू लागते. 

मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथील किर्तन संस्था... साधारण गेल्या सत्तर ते ऐंशी वर्षापासून अव्याहतपणे रोज संध्याकाळी येथे कीर्तन सेवा सादर केली जाते.  प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेपासून तर अमावस्येपर्यंत एक कीर्तनकार नेमला जातो. संध्याकाळी भद्रकाली मंदिरात किर्तन झाले की किर्तनकार काळाराम मंदिरा कडे निघतात. रात्री त्यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम राम मंदिरात होतो. अलीकडच्या काळामध्ये कीर्तनकार मिळणे अवघड झाले आहे. एकंदर कीर्तन संस्थेला उत्पन्नाचा मार्ग नसतो. त्यामुळे बुवांची बिदागी, राहण्याची व्यवस्था करणे कठीण जाते. त्यावर उपाय म्हणून भद्रकाली आणि काळाराम मंदिर दोन्ही कीर्तन संस्था मिळून एक कीर्तनकार नेमतात. बहुदा काळाराम मंदिरात त्यांच्या मुक्कामाची सोय होते. दोन्ही ठिकाणाहून मिळणारी बिदागी आणि आरतीच्या तबकात काय जमा होतील ते यावर दोन्ही संस्था परंपरा कशी काय टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. 

महिना संपला की अमावस्येला भद्रकाली मंदिरात गोपालकाला प्रसादाचे वाटप केले जाते. पूर्वी करमणुकीची साधने फारशी नव्हती. त्या काळात किर्तनाला श्रोत्यांची गर्दी असे नामांकित कीर्तनकार येथे कीर्तन सादर करणे हा आपला बहुमान समजत. सध्याच्या काळात मात्र कीर्तनाच्या वेळी मंदिर जवळपास रिकामेच असते. अशाही परिस्थितीत किर्तन संस्थेने या परंपरेत खंड पडू दिला नाही. मंत्रयुगा कडून यंत्र युगा कडे वाटचाल या शब्दात नाशिककरांचे वर्णन पदोपदी केले आहे. आता तर वाटचाल मेट्रो सिटीकडे सुरू केली आहे पण एकेकाळी नाशिक हे शहर नव्हते फक्त एक गाव आणि भद्रकाली होती ती या गावाची ग्रामदेवता. 

नाशिककरांचे पाय नवरात्र सुरू झाले की देवीच्या दर्शनासाठी भद्रकाली मंदिराकडे वळतात. येथे मग जुने मित्र भेटतात, जुनी माणसे भेटतात जुन्या आठवणींची उजळणी होते एकमेकांना खुशाली विचारली जाते आणि त्यावेळी खऱ्या अर्थाने जाणवते नाशिकचे ते गावपण.

Wednesday, 16 December 2020

चिमाजीआप्पांचे पुण्यस्मरण आणि नारोशंकराची घंटा

चिमाजीआप्पांचे पुण्यस्मरण आणि नारोशंकराची घंटा 


श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत त्यांचे बंधू चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांविरुद्ध वसईच्या लढाईमध्ये मराठी सैन्याने अभूतपूर्व पराक्रम केला. त्यावेळी वसईच्या किल्ल्यामधील चर्चच्या घंटा या लढाईतील विजयाचे स्मरण राहावे म्हणून पेशवे १७३९ सोबत घेऊन आले. त्यातील एक घंटा नाशिकमधील रामेश्वर मंदिरात ठेवण्याचे ठरवले. ही घंटा सध्या दिसते तिथे म्हणजेच मुख्य दरवाजाच्या प्रवेशद्वारच्या वरती बांधण्यात आली. आजही ही घंटा मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून दिमाखात उभी आहे. या घंटेच्या बाजूला असलेला महीरप हा देखील राजपूत शैलीचा आहे. तेव्हापासून या रामेश्वर मंदिराला नारोशंकर मंदिर आणि घंटेला नारोशंकर मंदिराची घंटा असे म्हणतात. या विजयाचे शिल्पकार असलेले चिमाजीआप्पा यांची आज पुण्यतिथी आहे. ही घंटा नाशिककरांना चिमाजीआप्पा आणि मराठ्यांच्या पराक्रमाचे सतत स्मरण करुन देत राहील.

अजेय योद्धा आणि रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे, यांचे धाकटे बंधू, चिमाजी बाळाजी भट उपाख्य चिमाजीअप्पा ! जन्म १७०७ मधे आणि मृत्यू, १७४० मधे ! उणीपुरी ३३ वर्षे मिळाली, या योद्ध्याला ! मराठी साम्राज्याचा आधारस्तंभ !यांची आज पुण्यतिथी, ते १७ डिसेंबर, १७४० रोजी आपल्याला सोडून गेले. 

कै. चिमाजी अप्पांचे नांव निघाले, की वसईचा किल्ला आठवतो ! पोर्तुगीजांच्या ताब्यातून किल्ला घेण्यात कुचराई होते आहे, अपयश येते आहे, या शंकेसरशी - ‘या तोफेला माझे शिर बांधा, आणि लावा बत्ती ! माझा देह तरी या किल्ल्यात पडेल ! मग कळवा राऊला, तुमचा चिमा परत आला नाही. किल्ल्यात त्याने देह ठेवला !’ 

तापलेल्या शिशासारखे हे शब्द, आमच्या मराठा सैनिकांच्या कानांत पडले, आणि कळीकाळाला देखील न घाबरणाऱ्या, सैनिकांनी ‘वसईचा किल्ला’ आपल्या पराक्रमाने जिंकून स्वराज्यात आणला ! 

सहावीच्या शालेय पुस्तकात, कवि दु. आ. तिवारी यांची ‘मोहरा इरेला पडला’ या नांवाची कविता होती. ती आपल्यासाठी — 


मोहरा इरेला पडला ! 


बेलाग दुर्ग जंजिरा वसईचा किल्ला असला

दुश्मन फिरंगी तिथला आटोपेना कोणाला

त्या सिंहाला पकडाया भारतीय चिमणा सजला

गोव्याचा टोपीवाला कोंकणचा पगडीवाला

लागली झुंज उभयाला बुद्धीचा डाव उडाला

मोहरा इरेला पडला ||१||


बोलावूनी सरदारांना तो समरधुरंधर बोले

शूरांनो वेढा द्याया चारमास होऊनी गेले

बेहीम्मत जे असतील परतोनी ते जातील

जा कळवा की दादाला मोहरा इरेला पडला ||२||


तोफेच्या तोंडी माथे बांधोनी उडवा हाथे

शीर तुटुनी त्या आघाते किल्ल्यात पडूद्या त्याते

ती निर्वाणीची वाणी डोळ्यास आणि पाणी

प्रत्येक वदे गहीवरुनी इर्षेस वीर हा चढला

मोहरा इरेला पडला ||३||


गोळ्यांच्या मार्याखाली चर खोदोनी रेतीत

उडविले सुरंगी बार तट लोळविला मातीत

गर्जना एकदम झाली पडलेल्या खिंडारात

जो बांध तटाचा फुटला तो सेनासागर सुटला

धैर्याचा किल्लेवाला बंदुकीस भाला भिडला

मोहरा इरेला पडला ||४||


मर्दच्या मराठी फौजा रणकीर्ती जणांच्या गाव्या

जणू घोंगावत मधमाश्या मोहोळाला बिलगाव्या

कडकडात वरुनी व्हावा सारखा अग्निवर्षावा

परी तो सिंहाचा छावा परतेना हिम्मतवाला

मोहरा इरेला पडला ||५||


वारावर करतची वार अनुसरले शूर पवार

शिंद्यांचा खांदा घोडा चालला जणू की तीर

बावटा धरुनी तोंडात भोसले चढे जोमात

आगीच्या वर्षावात सामना भयंकर झाला

मोहरा इरेला पडला ||६||


गरनाळी तोफा मोठ्या धुंकार कराया सजल्या

घायाळ धडाधड खाली तनु कितक्यांच्या धड्पडल्या

धातीचे निधडे वीर चिंध्यापरी त्यांच्या झाल्या

पगडीची फौज हटेना क्षत्रुची पकड सुटेना

तो विजयश्रीचा चिमणा बेहोष होऊनी लढला

शौर्याची शर्थ जहाली बावटा तटावर चढला

जयनादाने वसईचा दिग्प्रांत पहा दुमदुमला


तो समय आणि ती मूर्ती ठाके कवीनयनापुढती

मोहरा इरेला पडला ||७||


- कै. दु, आ. तिवारी यांच्या मराठ्यांची संग्रामगीते ह्या काव्यसंग्रहातून







दीपिका देशमुख : कोरोना लॉकडाऊनमध्ये 150 जणींना रोजगार देणारी महिला

दीपिका देशमुख : कोरोना लॉकडाऊनमध्ये 150 जणींना रोजगार देणारी महिला

पतीच्या आजारपणामुळे त्यांनी सायकल दुरुस्तीचा व्यवसाय हाती घेतला. त्यानंतर घरगुती जोडधंदे करत, हळूहळू महिलांना सोबत घेऊन ज्वेलरीपासून ते पापड, कुरडया आणि लोणची विकणं सुरू केलं. पण कोरोना लॉकडाऊनच्या ऐन कसोटीच्या काळात त्यांनी भरारी घेतली. त्याचं नाव आहे दीपिका देशमुख...

लॉकडाऊनच्या काळात संधी साधून त्यांनी वेगवेगळे मास्क बनवण्याचा काम सुरू केलं. प्रतिकूल परिस्थितीत पुढे येत गृह उद्योगाच्या माध्यमातून अकोल्याच्या दीपिका देशमुख यांनी अनेक गृहिणीच्या आयुष्यात नवा 'सूर्योदय' आणला आहे. 

लग्नानंतर सुरुवातीच्या काळात गृहिणी अशीच दीपिका देशमुख यांची ओळख होती. संसाराचा गाडा व्यवस्थित सुरू असताना पतीच्या आजारपणामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. त्यांचे पती सायकल दुरुस्तीचा व्यवसाय करायचे. त्यांच्या आजारपणामुळे दीपिका यांनी सायकल दुरुस्तीच्या व्यवसायात पुढाकार घेतला. पण पतीच्या औषधांचा खर्च सायकल व्यवसायातून अपुरा पडायचा, असं दीपिका सांगतात.

"मी एक महिला असून मोठ्या हिमतीने सायकलचं दुकान सांभाळत होते. दुकानावर दोन कर्मचारी होते. तरीही पंक्चर काढणे, सायकल दुरुस्त करणे अशी कामे त्यांच्याकडून शिकून घेतली. त्यातून मिळकत व्हायची पण पतीच्या औषधाला हा पैसा अपुरा पडायचा. त्यामुळे दुकानातूनच पूरक व्यवसाय सुरू करण्याच ठरवलं."

"सूक्ष्म कलागुण तसा माझ्यात होताच, त्यामुळं लाह्या आणि बत्तासे यापासून दागिने तयार केले. त्याला चांगली मागणी मिळत असल्याचं पाहून पुढील व्यवसायाला चालना मिळाली."

ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या दागिन्यांमधूनच दीपिका यांना नव्या कल्पना सुचत गेल्या. त्यातून डोहाळे जेवण सजावट, लग्नासाठीचा मेकअप अशा विविध उपक्रमांना त्यांनी सुरुवात केली.

त्या सांगतात, "या उपक्रमातून तेल्हाऱ्यात आमच्या वस्तूंची मागणी वाढायला लागली. म्हणून 2017 मध्ये आम्ही सूर्योदय बहुउद्देशीय महिला मंडळ संस्थेची स्थापना केली. त्यातून गृहउद्योग सुरू केला. ग्रामीण भागातील अनेक महिला आमच्या गृहउद्योगाशी जुळल्या. त्यातून महिलांना आवड असणाऱ्या कामाकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं.

वस्तू तयार करण्यात ज्या महिलांचा हातखंडा असेल ते काम त्या महिलेकडे सुपूर्द करण्यात आलं. मग त्यातून कुणी चकल्या, लोणची, पापड्या, कुरवड्या, पापड किंवा डोहाळ्यासाठीचे जेवण असेल ते आम्ही तयार करायला लागलो. आमच्या गृह व्यवसायातून फुलांपासून तयार केलेले दागिने तर असायचेच, पण हळदीपासून तयार केलेले दागिने आमची विशेष ओळख होती, हलव्यापासूनही आम्ही दागिने तयार केले. आणि त्याची विक्री आमच्या गृह उद्योगातूनच व्हायची."

दीपिका यांचा व्यवसाय तेजीत असताना कोरोनाची लाट आली. लॉकडाउन जाहीर झाला. याकाळात अनेकांच्या संसाराची आर्थिक घडी विस्कटली, हातावर पोट असलेल्या कुटुंबाचे संसार उघड्यावर आले. पण दीपिका देशमुख यांनी लॉकडाऊनमधील संधी हेरली. 

"कोरोना काळात आर्थिक अडचण होतीच. महिलांचा रोजगार हिरावला जाणार का, हा धोकाही होता. मग यावर उपाय म्हणून आम्ही मास्क तयार करण्याचं काम सुरू केलं. आणि ते लक्षवेधी ठरलं. आम्ही तयार केलेल्या नक्षीदार मास्कला प्रचंड मागणी आहे. जवळपास सव्वा लाख मास्कची विक्री आम्ही कोरोना काळात केली आहे.

त्यात पैठणी मास्क, डायमंड मास्क, शालूवरचे मास्क, नवरदेव- नवरीचे मास्क निर्मितीच्या माध्यमातून कोरोनाकाळात दीडशे महिलांना रोजगार तर दिलाच मात्र या काळात या अर्थजनातून त्यांनी कुटुंबाचा  गाडा चालवण्यात हातभार लावला," असं दीपिका सांगतात. व्यवसायला लोकांचा प्रतिसाद मिळाल्यावर दीपिका देशमुख यांचा आत्मविश्वास बळावला, त्यासोबत इतर महिलांना सक्षम करण्याची प्रेरणा मिळाली. त्यातून सूर्योदय बहुउद्देशीय गृह उद्योगाचा पसारा उभा राहिला. गावातील महिला आज स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या आहे.

नितेश राऊत (बीबीसी मराठीसाठी)

Monday, 14 December 2020

नाशिक हरवले धुक्यात

नाशिक शहरात ९८ टक्के आर्द्रता...

हंगामातील सर्वात जास्त आर्द्रता असल्याने दृश्यमानतेत घट...

१५० ते २०० मीटरपर्यंत दृश्यमानता असून संपूर्ण शहर धुक्यात हरवले आहे... 

मंगळवारी सकाळी १५°C किमान तापमानाची नोंद...

#Nashik foggier than hill stations of India...

#NashikWinterDays

Jeevan Jadhav lead pencil carving artist

 नाशिककरांना आपला सार्थ अभिमान आहे....





Sunday, 13 December 2020

ऐश्वर्येश्वर मंदिर, सिन्नर

ऐश्वर्येश्वर मंदिर, सिन्नर

काहीशे दुर्लक्षित असे ऐश्वर्येश्वर मंदिर चालुक्यकालिन द्राविडी वळणाच्या शिल्पसौंदर्याने नटलेले आहे.  भग्नावस्थेत असलेल्या या मंदिरातील शिल्पे आजही आपले लक्ष वेधून घेतात. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर नटराजाची नृत्यमुद्रा असलेले मकरतोरण व त्यावरील अतिशय सुंदर नक्षीकाम अद्वितीय असेच आहे.  मंदिरातील प्रत्येक खांबांवर अशीच उत्तम कलाकुसर कोरलेली आहे. गाभा-यात सुबक असे शिवलिंग आहे.

गेली सुमारे आठ नऊ शतके हे मंदिर निसर्गाशी तसेच नागरिक व भक्तांच्या अनास्थेशी झुंज देत उभे आहे.


चांदवडचे श्री चंद्रेश्वर महादेव मंदीर

चांदवडचे श्री चंद्रेश्वर महादेव मंदीर

चांदवड गावाच्या उत्तरेला तांबकडा परिसरात चांदवड किल्ल्याच्या माचीवर श्री च॔द्रेश्वर महादेवाचे पुरातन  स्थान आहे.  चांदवड ही चंद्रहास राजाची राजधानी होती.   त्यानेच चांदवडच्या किल्ल्यावर चंद्रेश्वर महादेवाचे मंदिर बांधले.  नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी इसवी सन १७४० मध्ये केला. या मंदिराच्या आवारात प्राचीन मंदिराचे अवशेष पहायला मिळतात.

आता चंद्रेश्वर महादेव मंदिरापर्यंत गाडी रस्ता झाला आहे, त्यामुळे थेट मंदिरापर्यंत गाडी जाऊ शकते व तेथून पुढे चांदवडच्या गडावर जाता येते.



वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....