Showing posts with label काळाराम. Show all posts
Showing posts with label काळाराम. Show all posts

Thursday, 2 December 2021

काळाराम मंदिरातील रचना

#श्रीकाळाराम मंदिर #नाशिक 

अष्टस्तंभावर आधारित #मेघडंबरी अकरा वर्तुळात एक हजार पाकळ्या कल्पलेल्या आहेत. #सहस्त्रदल कमलाचे प्रतिक अधोमुखी #रामयंत्र काही मंडळी च्या मते #श्रीयंत्र मध्यभागी आहे.
बाहेरून तिन कळसांच्या मधिल हा  मधला कळस याला #अमलक {आवळ्याचा आकार } म्हटले जाते. 

#हेमाडपंती वास्तूशास्त्राचा अद्भुत नमुना 

(photo by Pushpak Patil)

Monday, 20 September 2021

अपघाती मृत्यू झालेल्या अनामिक कारागिराचे शिल्प

अपघाती मृत्यू झालेल्या अनामिक कारागिराचे शिल्प

हे शिल्प नाशिक येथील काळाराम मंदिराचे आहे. उत्तर, दक्षिण, व पश्चिम अश्या तीन बाजूस असे हत्तीचे द्वंद्व असलेले शिल्प आहे. फक्त पश्चिम बाजूचे शिल्पातील एका हत्तीवर माणूस पालथा पडलेला दिसत आहे. 

असे का ?          
पूर्वी उंच बांधकामास क्रेन वा त्या सारखे अन्य यांत्रिक उपकरणे उपलब्ध नव्हती.        टप्प्या टप्प्याने मातीचा उतार करून शिल्प व अवजड वस्तू वर सरकवत. 

अशात काम करणारा एक कारागीर वरून खाली पडला तो नेमका या हत्तीवर व तेथेच गतप्राण झाला. त्याची स्मृती म्हणून नंतर एक दगडी पुतळा बनवून तो त्या हत्तीवर ठेवण्यात आला आहे. 

मंदिरातील अन्य हत्तीवर असा पुतळा नाही. ती फक्त त्या अज्ञात कारागीराची स्मृतिशिला आहे. 
या मंदिरात ज्या ओव-या आहेत त्याची संख्या ८४ आहे. ८४ लक्ष योनीतून जीवास फिरावे लागते याचे ते प्रतीक आहे. 

या मंदिराच्या वास्तुकलेचे वैशिष्ट्य असे की, पूर्व दरवाजात उभे राहून सुद्धा  गाभाऱ्यातील मुर्तीचे दर्शन घेता येते. दरवर्षी रामनवमीस सुर्यकिरण रामाचे मुर्तीवर प्रकाशित होतात.

राम मंदिरा समोर मारूती मंदिर आहे. त्या सभामंडपास ४० खांब आहेत. ते हनुमान चालीसाचे प्रतीक म्हणून बाधले गेले आहेत.(१० खांबांची १ ओळ अश्या ४ ओळी). मारुतीच्या मूर्तीची नजर श्रीरामप्रभूंच्या चरणावर आहे.
         
मंदिराचे प्रांगणातून मुख्य मंदिरात जाण्या साठी १४ पायर्‍या चढून जावे लागते. रामाच्या १४ वर्षे वनवासाचे ते प्रतीक आहे.

असे हे वैशिष्ट्यपूर्ण नाशिकचे काळाराम मंदिर.

Sunday, 28 February 2021

अभयहस्त प्रभु राम

 #अभय हस्त मुद्रेतील श्री प्रभु रामचंद्र,

#काळाराम #मंदिर, #नाशिक




Monday, 2 November 2020

श्रीरामाचे मिशा

"श्रीरामाच्या  मिश्या"

नाशिक च्या काळारामाचे वैशिष्ट्य येथे चैत्र गुढीपाडवा ते चैत्र शुध्द त्रयोदशी माध्यान्न राज उपचार महाअभिषेक झाल्यानंतर प्रभूरामचंद्र लक्ष्मण यांना सोन्याच्या मिश्या लावल्या जातात.

भगवान शिवाचे अवतार असलेल्या भैरव,खंडेराव यांचे  दर्शन या स्वरूपात दाखवतात.   परंतु संपूर्ण जगात कोणत्याही वैष्णव मूर्तीला { विष्णू , राम, कृष्ण, बालाजी, विठ्ठल ,मोहनीराज } मिश्या दाखवलेल्या नाहीत.

या संदर्भात वाल्मीकी रामायणात एक कथानक आले आहे. (वाल्मीकी रामायण .अरण्यकाण्ड षडविंशः{२६ } सर्ग.श्लोक क्र.४ रामः क्रोधं परं लभे वधार्थं सर्व रक्षसाम्.)

प्रभूरामचंन्द्र ज्या वेळी दंडकारण्यात आले. त्या वेळी खरदूषण त्रीशिर शूर्पणखा यांच्यासह रावणाचे महा बलाढ्य व अतिशय क्रूर असे १४ हजार राक्षस  दंडकारण्यात व विशेषतः पंचवटीच्या परिसरात वास्तव्यास होते. 

देवांना देखील दूर्रजय असलेल्या या महाबलाढ्य राक्षस सेनेचा अजानबाहू असलेल्या प्रभू श्रीरामांनी अवघ्या दिड मुहुर्तात म्हणजे ४५ मिनिटांत वध केला, त्या प्रसंगी श्रीरामाच्या चेहऱ्याकडे कोणी पाहू शकत नव्हते, जणू ते राक्षसांचे काळ भासत होते. उग्र तेज रामरायांच्या चेहऱ्यावर क्रोध धारण केल्यामुळे प्रकटले होते जणू ते राक्षसांचे काळ, भासत होते 

म्हणून ते राक्षसांना दंड देणारे, शिक्षा करणारे काळराम; एरवी दशरथ तयनं शामलं शान्तमूर्तिम् असणारे भासत नव्हते तर वीर रस धारण केलेले दिसत होते.

प्रभूच्या जीवनातील प्रथमच एवढा मोठा युद्ध प्रसंग ... प्रचंड मोठा पुरूषार्थ गाजविला. राम बाण केव्हा भात्यातुन काढीत केव्हा जोडून सोडीत होते हे सुघ्दा समजत नव्हते ...

पुरूषार्थाची पराकाष्ठा केली. वीर, शौर्य, तेज, उग्र सर्वच भाव रामांच्या चेहऱ्यावर प्रकटला. मिशी त्याच पराक्रमाचे प्रतिक. म्हणून रामाच्या मूर्तीस सोन्याची मिशी लावली जाते...

सायंकाळी शेजआरती च्या वेळी मिशी काढल्यानंतर राम पुन्हा सुंदर शांत दिसतांत.

सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...