Showing posts with label निशिगंधा. Show all posts
Showing posts with label निशिगंधा. Show all posts

Tuesday, 3 November 2020

डॉ.सौ. निशिगंधा मोगल यांचे प्रेरणादायी व अभिमानास्पद दातृत्व !!!

 प्रेरणादायी व अभिमानास्पद दातृत्व !!!

भारतीय जनता पार्टीच्या नाशिक च्या जेष्ठ नेत्या माजी विधान परिषद सदस्य, माजी आमदार डॉ.सौ. निशिगंधा मोगल यांनी त्यांचे सर्व 'स्त्री धन' (सोन्याचे दागिने) सैनिकांसाठी भारतीय सेनादलाला द्यायचे ठरविले होते,पण सेनादल दागिने स्वीकारीत नाही म्हणून त्यांनी त्या दागिन्यांच्या किंमती इतकी रक्कम रु 20 लाख रुपये सैन्यदलाकडे पाठविले.
काही वर्षांपूर्वी कारगिल येथे पर्यटनासाठी गेलेल्या डॉ. मोगल यांनी तेथील सैनिकांची कामगिरी बघितल्यानंतर सोने विकून आलेल्या 20 लाख रुपयांचा निधी सैनिकांच्या कल्याणासाठी ध्वज निधी म्हणून सुपूर्द केला. सैनिकी बोर्डद्वारे या मदतीबद्दल डॉ. निशिगंधा मोगल यांना पत्र पाठवून आभार मानले आहे.
त्यांची देशप्रेमाची भावना गौरवास्पद आणि अभिमान वाटावा अशीच आहे.






सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...