२५ डिसेंबर ला जगभर नाताळ साजरा केला जातो. आज नाताळच्या पूर्वसंध्येला आपण नाशिकरोडच्या प्रसिद्ध अशा बाळ येशू तीर्थस्थान (Shrine of Infant Jesus) बद्दल जाणून घेऊयात.
नाशिकरोडला असलेले हे बाळ येशूचे मंदिर ५१ वर्षापूर्वी दिवंगत फादर पीटर लुईस यांनी स्थापन केले. मंदिरात बाळ येशूची अतिशय सुरेख मूर्ती आहे. बाहुली व अन्य वस्तू वाहून मनोभावे नवस केला तर तो पूर्ण होतो, अशी श्रद्धा आहे.
१९६१ मध्ये फादर पीटर लुईस यांनी बाल येशू यात्रेला प्रारंभ केला, तेव्हापासून दरवर्षी फेब्रुवारी महिन्याच्या
तिस-या शनिवारी पूर्ण दिवस व रविवारी दुपारपर्यंत ही यात्रा भरते.
जगातील ही अशाप्रकारची केवळ दुसरी यात्रा आहे. जगात झेकोस्लाव्हिया देशाच्या प्राग शहरात व नाशिकरोड येथेच ही यात्रा भरते. तेथूनच मंदिरातील मूर्ती आणण्यात आली आहे.
नवस करण्यासाठी मेणबत्ती, घर, बाहुली, गाडी, भोवरा यांची प्रतिकृती वाहिली जाते. यात्रेचा दरवर्षी वेगवेगळा विषय असतो.
No comments:
Post a Comment