कोदंडधारी श्रीराम
भोसला मिलिटरी स्कूलच्या आवारात कोदंडधारी श्रीरामाचे सुंदर मंदिर आहे. या मंदिरात तरुण कोदंडधारी श्रीरामाची मूर्ती स्थापित केलेली आहे.
देशात अशा प्रकारची हि एकमेव मुर्ती असल्याचे सांगितले जाते, कारण मंदिरामध्ये फ़क्त रामाचीच मुर्ती स्थापन करु नये असा दंडक आहे. वैशिष्ट्य असे कि, येथील भोसला मिलिटरी स्कुलमध्ये प्रशिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांनी उडविलेल्या बंदुकीच्या गोळ्यांच्या रिकाम्या काडतूसाच्या धातुतून ही मुर्ती बनवली असल्याने तिची चकाकी कायम असते व मुर्तीवरही रासायनिक प्रक्रिया वा इतर परिणाम होत नाही. मूर्तीतून रामाचे लोभसवाणे पण कणखर व्यक्तिमत्व साकार होते. रामाच्या डाव्या हातात धनुष्य, उजव्या हातात बाण व डोक्यावर मुकुट असून प्रत्यंचा सरळ रेषेत ताण दिल्यासारखी बरोबर वाटते. ही मूर्ती ख्यातनाम शिल्पकार सदाशिव साठे यांनी बनवली आहे.
This Murti of a young Kodand dhari Shri Ram is cast from the melted metal of discarded bullet casings used by Bhonsala Military School students in Nasik.
No comments:
Post a Comment