बाणाई मंदिर
मुंबई -- नाशिक -- नागपूर राष्ट्रीय महामार्गापासून फक्त कि.मी. अंतरावर, मालेगाव शहराच्या दक्षिणेस गिरणा व मोसम नदीच्या संगमापासून जवळच एक कि.मी.वर ऐन नदीकाठावर चंदनापुरी हे छोटेसे टुमदार गाव वसलेले आहे.महामार्गावरुनच बानुबाईच्या मंदिराचे कळस दिसतात. वाकड्या -- तिकड्या वळणाची चिमुकली गाडीवाट आपल्याला थेट गावाच्या वेशीत नेऊन सोडते. आता ती वाट डांबरी रस्त्याचा साज ल्यायली आहे. वेशीतून आत शिरताच लगेच डावीकडे वळावे. अगदी 100 फुटावरच, नदीपात्रात पाय रोवून हे मंदिर ऊभे आहे. मंदिराभोवतीच्या तटबंदीचे प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख आहे तर मूळ मंदिराचे प्रवेशद्वार पुर्वाभिमुख आहे. आत खंडेरावाच्या डाव्या अंगास बाणाई तर उजव्या अंगास म्हाळसासुंदरी अशी तिघांची मूर्ती आहे.
वेशीपासून सरळ दक्षिणेस पुढे 100 फुटावर फक्त बानुबाईचेच मंदिर आहे. निसर्ग रमणिय परिसरातील गर्दीपासून दूर असलेले हे मंदिर मनाला भाळून टाकते.
No comments:
Post a Comment