Showing posts with label NEET. Show all posts
Showing posts with label NEET. Show all posts

Thursday, 19 November 2020

रामप्रसाद च्या जिद्दीची यशोगाथा

#किनवट_जिल्हा_नांदेड येथिल शिवाजी चौकात आपल्या आई वडिलांसोबत फुटाणे विकणारा #रामप्रसाद, परिस्थितीवर मात करतं जिद्द, संघर्ष आणि मेहनतीच्या बळावर NEET परिक्षेत यश संपादन करून MBBS पुणे साठी रामप्रसाद पात्र ठरला.

आज समाजात आपण पाहतो, एकिकडे लाखो रुपये खाजगी शिकवणीवर खर्च करून मुलांच्या MBBS प्रवेशासाठी आईवडील सतत प्रयत्न करत असतात, जिथे मुलांना आईवडलांकडून सगळ्या सोयी सुविधा पुरवल्या जातात तरी मुलं अभ्यासात कुठेतरी कमी पडतात. मात्र रामप्रसादने आई वडिलांना कसल्याही खर्चात न पाडता उलट स्वतः आई वडिलांच्या कामात मदत करून NEET परीक्षेत 720 पैकी 625 मार्क घेतले आणि MBBS साठी पात्र ठरला...आणि आजही मनात कसलाही संकोच न करता तो बाजारात मिठाई, फुटाणे विकत आहे.

सलाम त्याच्या जिद्दीला आणि चिकाटीला...


सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...