Showing posts with label खंडोबा. Show all posts
Showing posts with label खंडोबा. Show all posts

Sunday, 21 February 2021

जेजुरी शिवलिंग

#जेजुरी_शिवलिंग

वर्षातून एकदा महाशिवरात्रीला उघडले जाते.
मुख्य गाभा-याच्या उजव्या बाजूस छोट्या दरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर खाली एक माणूस उतरू शकेल इतके छोटे तळघर आहे. तेथे हे शिवलिंग आहे. शिवपार्वतीने कैलासानंतर पृथ्वीतलावर वास्तव्य  केलेले एकमेव ठिकाण म्हणजे जेजुरी (जयाद्री) पर्वत असे मानले जाते
 
जय मल्हार 🙏🙏🙏

Sunday, 20 December 2020

खंडेराव मंदिर चंदनापुरी

बाणाई मंदिर

मुंबई -- नाशिक -- नागपूर  राष्ट्रीय महामार्गापासून फक्त कि.मी. अंतरावर, मालेगाव शहराच्या दक्षिणेस गिरणा  व मोसम नदीच्या संगमापासून जवळच  एक कि.मी.वर ऐन नदीकाठावर चंदनापुरी हे छोटेसे टुमदार गाव वसलेले आहे.महामार्गावरुनच बानुबाईच्या मंदिराचे कळस दिसतात. वाकड्या --  तिकड्या वळणाची चिमुकली गाडीवाट आपल्याला थेट गावाच्या वेशीत नेऊन सोडते. आता ती वाट डांबरी रस्त्याचा साज ल्यायली आहे. वेशीतून आत शिरताच लगेच डावीकडे वळावे. अगदी 100 फुटावरच, नदीपात्रात पाय रोवून हे मंदिर ऊभे आहे. मंदिराभोवतीच्या तटबंदीचे प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख आहे तर मूळ मंदिराचे प्रवेशद्वार पुर्वाभिमुख आहे. आत खंडेरावाच्या डाव्या अंगास बाणाई तर उजव्या अंगास म्हाळसासुंदरी अशी तिघांची मूर्ती आहे. 

वेशीपासून सरळ दक्षिणेस पुढे 100 फुटावर फक्त बानुबाईचेच मंदिर आहे. निसर्ग रमणिय परिसरातील गर्दीपासून  दूर असलेले हे मंदिर मनाला भाळून टाकते.

Saturday, 19 December 2020

चंपाषष्ठी

मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. यास खंडोबाचें नवरात्र असें म्हणतात. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. जेजुरी ह्या गावी मल्हारी देवस्थान आहे. 

यामागील कथा अशी आहे की आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन ‘मणी’ व ‘मल्ल’ दैत्यांचा वध केला. ‘मल्हारी मार्तंड’ हा महादेवाचा एक अवतार होता. कृतयुगात ब्रह्म देवाने मणी व मल्ल राक्षसांना वर दिले होते की तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही. हे वर प्राप्त केल्यावर ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले. त्यांचा हा त्रास बघून ऋषीमुनींनी देवांकडे मदत मागितली. तेव्हा भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपले ७ कोटी अर्थात येळकोट सैन्य घेऊन राक्षसांवर चालून गेले. मार्तंड भैरवांनी मणी राक्षसाची छाती फोडून त्याला जमिनदोस्त केले. तसेच मणी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे व माझे अश्वारूढ रूपही तुझ्या शेजारी राहावे अशी इच्छा व्यक्त केली. भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले. 

नंतर मार्तंड भैरवांनी मल्ल राक्षसाचा पराभव केला, तेव्हा त्याने शरण जाऊन तुमच्या नावाआधी माझे नाव जोडले जावे अशी मागणी केली. तथास्तु म्हणून मार्तंड भैरवाने तेही मान्य केले. तेंव्हापासून त्यांना मल्हारी मार्तंड असे म्हटले जाते. 
या दिवशी प्रामुख्याने वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. तसेच या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवितात. तसेच या नैवेद्याचा काही भाग कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात. 

(कॉपी पेस्ट)

सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...