Friday, 25 December 2020

गीता जयंती

आज मार्गशीर्ष शु. एकादशी भागवत एकादशी म्हणजेच गीता जयंती. आजच्याच दिवशी साडेपाच हजार वर्षांपूर्वी कुरुक्षेत्राच्या मैदानावर महाभारताचे महान धर्मयुद्ध सुरू झाले होते.या युद्धापूर्वी अर्जुन युद्धापासून परावृत्त झाला तेव्हा युध्दापासून परावृत्त झालेल्या कर्तव्यच्युत अर्जुनाला पुन्हा युद्धासाठी उभे करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजेच श्रीमद्भगवद् गीता आणि या गीतेची जयंती आज आहे. श्रीमद्भगवद् गीता विश्वातील एकमेव ग्रंथ ज्याची जयंती साजरी केली जाते तो हिंदूंचा धर्मग्रंथ श्रीमद्भगवद् गीता. 

या श्रीमद्भगवद् गीतेमध्ये एकूण 700 श्लोक आहेत जे विविध 18 अध्यायांत विभागले आहेत. गीतेचा प्रथम अध्याय अर्जुनाच्या विषादापासून सुरू होतो ज्याचे नाव "अर्जुनविषादयोग" असे आहे तर शेवट "मोक्षसन्यासयोग" या अध्यायाने होतो. गीतेत एकूण चार व्यक्तींमधील संवाद आहे. त्यांपैकी मुख्य संवाद हा अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांतील असून संजय नावाचा धृतराष्ट्राचा सारथी ते सर्व (महर्षी वेदव्यासांनी दिलेल्या दिव्यदृष्टी द्वारे) बघून धृतराष्ट्रास सांगत आहे. गीतेचा पहिला श्लोक हा धृतराष्ट्राचा असून त्यात तो संजयला कुरुक्षेत्रावरील परिस्थिती विचारतो तर शेवटचा श्लोक हा संजयने म्हटलेला आहे ज्यात तो धृतराष्ट्राला युद्ध सुरू होण्यापूर्वीच युद्धाचा परिणाम सांगतो की पांडवच युद्ध जिंकणार आहेत असे. 
या गीतेची आज साडेपाच हजार वर्षांनंतरही खासियत अशी की ती आजच्याही  विश्वाचिंतकांचे प्रश्न सहज सोडवते. म्हणूनच भारताच्या स्वातंत्र लढ्यात अगदी दोन टोके समजले जाणारे लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी दोघांनीही श्रीमद्भगवद् गीता उचलली होती. स्वामी विवेकानंद तर त्यात सर्व धर्मांचा पाया बघतात (स्वामी विवेकानंद यांचे शिकागो मधील भाषण आणि विश्व धर्म परिषदेतला प्रसंग यासाठी प्रसिद्ध आहे) म्हणूनच या भारताला 2020 चे मिशन देणारे भूतपूर्व राष्ट्रपती (राष्ट्राध्यक्ष) डॉ. ए पी जे अब्दुल कलाम मुस्लिम असूनही श्रीमद्भगवद् गीतेचे अभ्यासक आणि पूजक होते. याच गीतेचा विभूती योग (अध्याय 10वा) विश्वातील चराचरात भरून राहिलेल्या भगवंताचे दर्शन घडवते. 
तेव्हा एक हिंदू आणि महत्वाचे म्हणजे मानव म्हणून आपण एकदा तरी या आपल्या धर्मग्रंथास उघडून बघितले पाहिजे किंवा निदान त्याबद्दल महत्वाची जुजबी माहिती तरी आपणाला असावी या करताच हा लेखन प्रपंच.....

"गर्व से कहो मुझे मेरे धर्मग्रंथ के बारे मे पता है, और वह श्रीमद्भगवद् गीता है......."

No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....