चांदवडचे श्री चंद्रेश्वर महादेव मंदीर
चांदवड गावाच्या उत्तरेला तांबकडा परिसरात चांदवड किल्ल्याच्या माचीवर श्री च॔द्रेश्वर महादेवाचे पुरातन स्थान आहे. चांदवड ही चंद्रहास राजाची राजधानी होती. त्यानेच चांदवडच्या किल्ल्यावर चंद्रेश्वर महादेवाचे मंदिर बांधले. नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी इसवी सन १७४० मध्ये केला. या मंदिराच्या आवारात प्राचीन मंदिराचे अवशेष पहायला मिळतात.
आता चंद्रेश्वर महादेव मंदिरापर्यंत गाडी रस्ता झाला आहे, त्यामुळे थेट मंदिरापर्यंत गाडी जाऊ शकते व तेथून पुढे चांदवडच्या गडावर जाता येते.
No comments:
Post a Comment