Sunday, 28 February 2021
Thursday, 29 October 2020
पंडित जवाहरलाल नेहरु वनौषधी उद्यान (नेहरु बोटॅनिकल गार्डन), नाशिक
पंडित जवाहरलाल नेहरु वनौषधी उद्यान (नेहरु बोटॅनिकल गार्डन), नाशिक
पांडव लेण्यांच्या पायथ्याशी व नाशिक शहराच्या प्रवेशद्वारावर असलेले पंडित जवाहरलाल नेहरू वन उद्यान हे त्यामध्ये असलेल्या हजारो जातींच्या वनौषधी व आयुर्वेदिक औषधांच्या झाडांनी नुसतेच नाशिकमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पं. जवाहरलाल नेहरू वन उद्यान नाशिककरांसाठी बॉटनिकल गार्डन म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे. ते केवळ वन उद्यानच नव्हे तर आता मनोरंजन पार्क म्हणून ही प्रसिद्ध पावते आहे.
फुलपाखराच्या आकाराचे आकर्षक व भव्य प्रवेशद्वार असलेले हे उद्यान त्याच्या विविध वैशिष्ट्यांमुळे एकमेवाद्वितीय ठरले आहे. १३ हेक्टरच्या विस्तीर्ण जमीनीवर पसरलेल्या या उद्यानात ठिकठिकाणी वनौषधींची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. उद्यानास भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांना बसण्यासाठी फुलपाखरांच्या प्रतिकृतीची बाके ठेवण्यात आली आहेत. बाळ्-गोपाळांच्या मनोरंजनासाठी विविध प्रकारची खेळणी व फायबरच्या प्राण्यांच्या प्रतिकृती विविध ठिकाणी मांडण्यात आल्या आहेत. मात्र या सर्वात जास्त आकर्षणाचे केंद्र थरले आहे ते 'कथा अरण्याची' या नावाने सादर होणारा लेझर शो. या शोमध्ये झाडे आपल्यावर ओढवलेल्या आपत्तीची कथा सांगतात व शेवटी सर्व प्रेक्षकांना वृक्षसंवर्धनासाठी भावनिक साद घालतात. ही बोलकी झाडे प्रेक्षकांच्या मनात घर करुन राहतात. टाटा ट्रस्टच्या माध्यमातून या वन उद्यानाचा कायापालट झाला आहे. उद्यानातल्या रस्त्यांच्या कडेला अनुरुप असे बांबुचे कुंपन घालण्यात आले आहे.
या उद्यानात वनौषधी तसेच आयुर्वेदिक औषधी यांच्यासह मूळच्या भारतातील नसलेल्या परंतु इकडेच रुळलेल्या विदेशी वनस्पतीदेखील आहेत. त्यासोबतच द्राक्ष ते रूद्राक्ष फळ संस्कृती जोपासणारी फळ वृक्षांचीदेखील लागवड करण्यात आली आहे. या ठिकाणी कपिला, शिवण, कुचलाकाजरा, रूद्राक्ष, द्राक्ष, सीताफळ, केसरी, मोह, कवट, तेंदू, हिरडा, आवळा, रामफळ, हनुमान फळ, फणस, जांभूळ, आंबा, काजू, बिब्बा आदी शेकडो प्रकारची फळझाडे आहेत.
नाशिक जिल्ह्यातील वन्य प्रदेशात तसेच इतर क्षेत्रात लक्षणीय ठरतील अशा सपुष्प वनस्पतींची संख्या हजाराहून अधिक आहे. त्यापैकी काही स्थानिक प्रजाती उद्यानातील कुसुमाकर, अशोक वन, चंपक वन व मकरंद वन या विभागात संवर्धित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पांढरा सिरस, बहवा, काटे साबर, नागकेसर, पळस, धामण, सातवीणा, अशोक, सीतेचा अशोक, झारूल, करंज, वारस, सोनचाफा, कदंब, बोंडारा, पांढरा चाफा, कांचन, शिरीष, पागारा आदी विविध प्रकारचे पुष्प-वृक्षवल्ली संवर्धित करण्यात आली आहे.
या ठिकाणी छोट्या-मोठ्या पक्ष्यांसाठी आवडते फळ खाद्य देणार्या वनस्पतींचे वन ‘सारिका बाग’ या नावाने संवर्धित करण्यात आले आहे. यामध्ये बोर, चिंच, उंबर, वड, मनीकरा, सिंगापूर चेरी, पेरू, डाळिंब, तोरण, घाणेरी, असाना, आळू, करवंद, भुवकेश, विलायती चिंच आदी प्रकारची शेकडो फळझाडे लावण्यात आल्याने पक्ष्यांचा चिवचिवाट या ठिकाणी सदैव ऐकायला मिळतो.
सह्याद्री श्रेणीतील डोंगर रांगा व संलग्न परिसरात आढळणारी बहुमोल औषधी वनस्पती या ठिकाणी लागवड करण्यात आल्या आहेत. शरीरातील विविध व्याधी कमी करण्यासाठी किंवा मिटवण्यासाठी या वनौषधींची मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लागवड केल्याने राज्यभरातून बरेच जण या ठिकाणी येथील दशमुळी नेण्यासाठी येतात. यामध्ये बेल-बिल्व, शिवण-काश्मिरी, पाडळ, टेटू, श्वोनक, टाकळी-ऐरण, अग्निमंथ, पीठवण-पृश्नपर्णी, सालवण, चिंचार्डी-बृहत, भुई रंगणी-कंटकारी, गोखरू आदी प्रजाती या ठिकाणी आढळून येतात.
या ठिकाणी आराध्य वृक्ष रूद्राक्ष, वड, उंबर, बेल, कदंब, कैलासपती, चंदन, पिंपळ, अश्वत्थ, आंबा, अंजरी, डाळिंब, खजूर, साधा चाफा, ऑलिव्ह, सिडार, ओक, सोनपिंपळ, बदाम, आपटा, कांचन, पचनार, काटे सावर, बखुल, साल आदी हजारो प्रजातींचे वृक्ष आढळून येतात.
या उद्यानाचा विकास झाला आणि या ठिकाणी शहरातूनच नव्हे तर राज्यभरातून येणार्या पर्यटकांची गर्दी वाढत आहे.
सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!
सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...
-
गुरुदत्त परंपरा श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थान, टिंगरी ते गाळणे रोड, टिंगरी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक Shreepad ShreeVallabh Temple, Galne ro...
-
आज २१ मार्च म्हणजे जागतिक कविता दिवस ! सर्व कवींना आणि काव्यप्रेमींना जागतिक कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! जगातील काव्यात्मक अभिव्यक्त...
-
आज #शिवजयंती निमित्त जाणून घेऊया #शिवरायांच्या बालपणाचे नाशिकशी असलेले नाते. महाराष्ट्रालाच नव्हे तर अखिल हिंदुस्थानाला स्वाभिमानाची शिकवण द...























