Showing posts with label सिन्नर. Show all posts
Showing posts with label सिन्नर. Show all posts

Monday, 29 November 2021

ऐश्वर्येश्वर मंदिर, सिन्नर

 सिन्नरच्या ऐश्वर्येश्वर मंदिराचे इसवी सन १८८० मध्ये ब्रिटिश फोटोग्राफर हेन्री कुझेन याने काढलेले छायाचित्र 








Sunday, 13 December 2020

ऐश्वर्येश्वर मंदिर, सिन्नर

ऐश्वर्येश्वर मंदिर, सिन्नर

काहीशे दुर्लक्षित असे ऐश्वर्येश्वर मंदिर चालुक्यकालिन द्राविडी वळणाच्या शिल्पसौंदर्याने नटलेले आहे.  भग्नावस्थेत असलेल्या या मंदिरातील शिल्पे आजही आपले लक्ष वेधून घेतात. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर नटराजाची नृत्यमुद्रा असलेले मकरतोरण व त्यावरील अतिशय सुंदर नक्षीकाम अद्वितीय असेच आहे.  मंदिरातील प्रत्येक खांबांवर अशीच उत्तम कलाकुसर कोरलेली आहे. गाभा-यात सुबक असे शिवलिंग आहे.

गेली सुमारे आठ नऊ शतके हे मंदिर निसर्गाशी तसेच नागरिक व भक्तांच्या अनास्थेशी झुंज देत उभे आहे.


Wednesday, 4 November 2020

बालवीर गौरव

#नाशिकच्या 12 वर्षाच्या पठ्ठ्याच्या धाडसाचं कौतुक...

बिबट्या समोर जरी दिसला तरी काय होईल हे सांगायला नको.मात्र बिबट्याच्या हल्ल्यात एक हात बिबट्याच्या जबड्यात असतांना दुसऱ्या हाताने त्याच्या कानशिलात लावून त्याला पळवून लावणाऱ्या सिन्नर तालुक्यातील सोनारी गावातील 12 वर्षीय #गौरव_काळुंगे याचं सर्वत्र कौतुक होतं आहे.
बिबट्याच्या हल्ल्यात गौरवाच्या हाताला 5 टाके पडलेत.

सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...