Showing posts with label फोटो. Show all posts
Showing posts with label फोटो. Show all posts

Wednesday, 3 March 2021

'लाईव्ह' फोटो

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा (एआय) उपयोग करून ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचे फोटो 'लाईव्ह' करण्याचा प्रयोग सध्या व्हायरल होत आहे. किर्थीक ससिधरन (Keerthik Sasidharan) या ट्विटर युजरने आपल्या हॅंडलवरुन अनेक स्वातंत्र्यसैनिकांचे जुने मोशन फोटो सादर केली आहेत. हि जुनी छायाचित्रे त्याने हेरीटेज एआय अल्गॉरिथम (Heritage AI Algorithm) या तंत्रज्ञानाचा वापर करुन व्हिडीओमध्ये परावर्तित केली आहेत. ज्णू काहीत्यांचे प्रत्यक्ष चित्रिकरण केले असावे इतके ते अप्रतिम वठले आहे. आपल्या आवडत्या महापुरुषांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याचे भाग्य आपल्याला लाभले नाही. मात्र (AI) एआयच्या किमयेमुळे त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव कसे असू शकतील याची झलक आपल्याला पाहायला मिळू शकते.

दुसरीकडे याच तंत्राचा दुरुपयोगही होऊ शकतो याबाबतही अनेक जण भीती व्यक्त करीत आहेत.

 #artifialintelligence #AI



Monday, 22 February 2021

गाडगेबाबांचा दुर्मिळ फोटो

आज राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती...

सातारा येथे असताना गाडगेबाबांची प्रकृती साथ देत नव्हती . तेव्हा बाबांनी आर्वजून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भेटीचा निरोप पाठाविला. निरोप मिळताच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपली  कामे बाजूला ठेवून सातारा गाठले.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पाहताच गाडगेबाबांना खूप समाधान वाटले. त्यानी आपल्या उशिखालून कांही  दस्त काढले .ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात देत गाडगेबाबा म्हणाले' सायबा ही लाख मोलाची दौलत हाय. तवा ही दौलत योग्य माणसाच्या हातात देऊन मी मोकळा होणार .म्हणून सायबा तुला बोलावलो बघ.हे दस्ताची योग्य पुर्तता केल्याली हाय तवा ही दौलत तुझ्याकड दिलो तर मी मोकळा .'डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दस्तऐवज पाहिला तर त्यांना आश्चर्य वाटले कारण तो दस्त सातारा येथिल जमिनीचा होता .त्या  सर्व जमिनीचे सर्व अधिकार  गाडगेबाबांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दिले होते.

दान मिळालेल्या जमिनीचा योग्य कामासाठी वापर व्हावा हिच बाबांची इच्छा ओळखून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कर्मवीर भाऊराव पाटलांना निरोप दिला आणि ती सर्व जमिन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी गाडगेबाबांच्या समक्ष कर्मवीरांना बहाल केली.आज तिथे छञपती शिवरायांच्या नावाने चालविलेली रयत शिक्षण संस्था आहे ती याच जागेवर. 

खाली जो दुर्मिळ फोटो शेयर केला आहे तो या घटनेची साक्ष आहे.

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#Gadgebaba #Ambedkar #KarmaveerBhauraoPatil




सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...