Showing posts with label प्रदूषण. Show all posts
Showing posts with label प्रदूषण. Show all posts

Friday, 6 November 2020

विद्युत दाहिनीमुळे ७०० टन लाकडाची बचत

2 वर्षांमध्ये जवळपास 700 टन लाकडाची बचत

 नाशिक अमरधाममध्ये विद्युत शवदाहिनीच्या वापरामुळे 2018 ते 5 नोव्हेंबर, 2020 या काळामध्ये 701.420 टन लाकडाची बचत झाली आहे. 2018 ते 3 नोव्हेंबर, 2020 या कालावधीमध्ये 2063 अंत्यसंस्कार विद्युत शवदाहिनीद्वारे करण्यात आले आहेत.

नंदिनी नदीचे प्रदूषण कमी करून ते रोखण्यासाठी कार्यरत सतीश कुलकर्णी व चंद्रकिशोर पाटील यांचा कार्यगौरव

नंदिनी नदीचे प्रदूषण कमी करून ते रोखण्यासाठी नाशिक मधील सतीश कुलकर्णी व चंद्रकिशोर पाटील हे स्वयंस्फूर्तीने कार्यरत असून मनपाच्या वतीने या दोघांचा कार्यगौरव  मा.आयुक्त कैलास जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

नाशिक मधील रहिवासी सतीश कुलकर्णी हे वयाच्या ७० व्या वर्षी नंदिनी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कार्यरत असतात त्यांच्या समवेत चंद्रकिशोर पाटील हे देखील काम करीत असून नंदिनी नदीच्या तिडके नगर पूल येथे या दोघांनी दसऱ्याच्या दिवशी नागरिकांना नदीपात्रात निर्माल्य टाकू नये याबाबत आवाहन करून जनजागृती केली व नदीपात्रात पडणारे निर्माल्य संकलित करण्याचा अभिनव उपक्रम राबवून त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत मा.आयुक्त कैलास जाधव यांनी त्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव केला.

Sunday, 1 November 2020

चंद्रकिशोर पाटील यांची गोदा सेवा

इंदिरानगर येथील रहिवासी चंद्रकिशोर पाटील यांनी दस-याच्या दिवशी सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत थांबून नागरिकांना गोदावरी नदीत निर्माल्य टाकण्यापासून रोखले व गोदामाईला प्रदूषित होण्यापासून वाचविले.  तुमच्या या स्वयंस्फुर्त सेवेला सलाम...

#Respect #RealLifeHero
Chandra Kishore Patil from Indiranagar in Nashik stands beside the Godavari river from morning till 11 pm at night with a whistle and stops people from throwing garbage into the river. 

You are our hero, Mr Patil. 

PC: Swetha Boddu, IFS (@swethaboddu)

सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...