ऐश्वर्येश्वर मंदिर, सिन्नर
काहीशे दुर्लक्षित असे ऐश्वर्येश्वर मंदिर चालुक्यकालिन द्राविडी वळणाच्या शिल्पसौंदर्याने नटलेले आहे. भग्नावस्थेत असलेल्या या मंदिरातील शिल्पे आजही आपले लक्ष वेधून घेतात. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर नटराजाची नृत्यमुद्रा असलेले मकरतोरण व त्यावरील अतिशय सुंदर नक्षीकाम अद्वितीय असेच आहे. मंदिरातील प्रत्येक खांबांवर अशीच उत्तम कलाकुसर कोरलेली आहे. गाभा-यात सुबक असे शिवलिंग आहे.
गेली सुमारे आठ नऊ शतके हे मंदिर निसर्गाशी तसेच नागरिक व भक्तांच्या अनास्थेशी झुंज देत उभे आहे.
No comments:
Post a Comment