Thursday, 2 December 2021
काळाराम मंदिरातील रचना
Wednesday, 1 December 2021
नाशिकमधील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचे पुरातन मंदिर
Monday, 20 September 2021
अपघाती मृत्यू झालेल्या अनामिक कारागिराचे शिल्प
Monday, 28 June 2021
श्री त्र्यंबकेश्वर ज्योतीर्लिंग मंदिराचे तिकिट
Monday, 21 June 2021
सुंदर नारायण मंदिर, नाशिक
Tuesday, 20 April 2021
अहिल्याराम
Wednesday, 10 March 2021
श्री शिवछत्रपतींचे" पहिले मंदिर
शिवराम मंदिर, म्हसरुळ, नाशिक
महाराष्ट्राचे आराध्य दैवत "श्री शिवछत्रपतींचे" उत्तर महाराष्ट्रातील किंबहुना आधुनिक काळातील संपूर्ण देशातील पहिले मंदिर नाशिक मध्ये २००१ मध्ये उभारण्यात आले आहे. मात्र बारा वर्षा पुर्वी उभारण्यात आलेले हे मंदिर अजूनही बरेचसे दुर्लक्षित आहे. बहुतांश नाशिक करांना ह्या मंदिरा विषयी माहिती देखील नाही.
या मंदिराची उभारणी करणारे डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर महाराज यांचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेत पुरोहित म्हणून कार्यरत होते. याची आठवण म्हणून पूर्णवाद चे प्रसारक डॉ. रामचंद्र महाराज पारनेरकर महाराज यांनी पूर्ण देश भरात छत्रपती शिवाजी महाराजांची एक हजार मंदीरे स्थापण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार या संकल्पाची मुहूर्तमेढ नाशिक मधुन झाली आणि छत्रपतींचे पहिले मंदिर उभारण्याचा मान नाशिकला मिळाला. या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मांडी घालून बसलेल्या अवस्थेमध्ये जवळपास ३५० किलो वजनाच्या पंचधातूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांच्या माध्यमातुन या मंदिरात रोज पुजा पाठ केला जातो.
मंदिरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणा-या नाशिक नगरीत शिव्छत्रपतींचेही मंदिर आहे, ही अवघ्या नाशिककरांसाठी अभिमानाची बाब आहे.
मंदिराचा पत्ता :- रिलायंस पेट्रोल पंप, सौभाग्य मंगल कार्यालया जवळ, महाराजा हॉटेल मागे, दिंडोरी रोड, नाशिक.
Shivram Temple, Mhasrul, Nashik
The first temple of Shri Shiv Chhatrapati, the adorable deity of Maharashtra, has been erected in Nashik. But the temple, which was built twelve years ago, is still neglected. Most Nashik taxes do not even know about this temple.
Dr. Ramchandra Parnarkar Maharaj, the broadcaster of Purnaism, had resolved to set up a thousand temples of Shivaji Maharaj across the country. It was completed in Nashik and Nashik received the honor of erecting the first temple of Chhatrapati. This temple has an idol of Shiv Chhatrapati in sitting posture, made up of five metals i.e. panch dhatu', weighing approx. 350 kg. Pooja is practiced daily in this temple through the citizens.
This is very much proud moment for Nashikeites, having a temple of Shiv Chhatrapati.
Address of the Temple: - Reliance Petrol Pump, Near Saughagya Mars Office, Behind Maharaja Hotel, Dindori Road, Nashik.
Sunday, 28 February 2021
Sunday, 13 December 2020
ऐश्वर्येश्वर मंदिर, सिन्नर
ऐश्वर्येश्वर मंदिर, सिन्नर
काहीशे दुर्लक्षित असे ऐश्वर्येश्वर मंदिर चालुक्यकालिन द्राविडी वळणाच्या शिल्पसौंदर्याने नटलेले आहे. भग्नावस्थेत असलेल्या या मंदिरातील शिल्पे आजही आपले लक्ष वेधून घेतात. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर नटराजाची नृत्यमुद्रा असलेले मकरतोरण व त्यावरील अतिशय सुंदर नक्षीकाम अद्वितीय असेच आहे. मंदिरातील प्रत्येक खांबांवर अशीच उत्तम कलाकुसर कोरलेली आहे. गाभा-यात सुबक असे शिवलिंग आहे.
गेली सुमारे आठ नऊ शतके हे मंदिर निसर्गाशी तसेच नागरिक व भक्तांच्या अनास्थेशी झुंज देत उभे आहे.
चांदवडचे श्री चंद्रेश्वर महादेव मंदीर
चांदवडचे श्री चंद्रेश्वर महादेव मंदीर
चांदवड गावाच्या उत्तरेला तांबकडा परिसरात चांदवड किल्ल्याच्या माचीवर श्री च॔द्रेश्वर महादेवाचे पुरातन स्थान आहे. चांदवड ही चंद्रहास राजाची राजधानी होती. त्यानेच चांदवडच्या किल्ल्यावर चंद्रेश्वर महादेवाचे मंदिर बांधले. नंतर या मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी इसवी सन १७४० मध्ये केला. या मंदिराच्या आवारात प्राचीन मंदिराचे अवशेष पहायला मिळतात.
आता चंद्रेश्वर महादेव मंदिरापर्यंत गाडी रस्ता झाला आहे, त्यामुळे थेट मंदिरापर्यंत गाडी जाऊ शकते व तेथून पुढे चांदवडच्या गडावर जाता येते.
Wednesday, 25 November 2020
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर केलेली आकर्षक रोषणाई
प्रबोधिनी भागवत एकादशी (कार्तिक एकादशी) च्या पूर्वसंध्येला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरावर केलेली आकर्षक रोषणाई...
अष्टविनायक — महाराष्ट्राच्या मांगल्याची आठ द्वारे
महाराष्ट्राच्या मातीत गणेशभक्तीचा जो अखंड प्रवाह वाहतो, त्याचे सर्वात प्राचीन आणि पवित्र रूप म्हणजे अष्टविनायक यात्रा. पुणे, रायगड आणि नगर ज...
-
गुरुदत्त परंपरा श्रीपाद श्रीवल्लभ देवस्थान, टिंगरी ते गाळणे रोड, टिंगरी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक Shreepad ShreeVallabh Temple, Galne ro...
-
आज २१ मार्च म्हणजे जागतिक कविता दिवस ! सर्व कवींना आणि काव्यप्रेमींना जागतिक कविता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! जगातील काव्यात्मक अभिव्यक्त...
-
आज #शिवजयंती निमित्त जाणून घेऊया #शिवरायांच्या बालपणाचे नाशिकशी असलेले नाते. महाराष्ट्रालाच नव्हे तर अखिल हिंदुस्थानाला स्वाभिमानाची शिकवण द...





















