Sunday, 28 February 2021

अभयहस्त प्रभु राम

 #अभय हस्त मुद्रेतील श्री प्रभु रामचंद्र,

#काळाराम #मंदिर, #नाशिक




कुसुमाग्रज काव्य उद्यान

कुसुमाग्रज काव्य उद्यानाला झळाळी 

स्वामी तिन्ही जगाचा

स्वामी तिन्ही जगाचा 
आई विना भिकारी

Friday, 26 February 2021

बाप हा शेवटी बापच असतो

जगात आईची तुलना कुणाशीच करता येणार नाही, यात अजिबात दुमत नाही, पण याचा अर्थ असा नाही होत की बापाचं महत्त्व कमी आहे.

हे मुल ९ महिन्यांपूर्वी जन्माला आलं होतं, वेळे अगोदरच जन्म झाल्यामुळे त्याला श्वास घ्यायला त्रास होत होता, ज्यामुळे हे बाळ मरणाच्या दारात उभा होतं.
डॉक्टरांनी उपाय सुचवला की जर दुसऱ्या एखाद्या माणसाच्या फुप्फुसाशी या बाळाची श्वसन नलिका जोडली तर बाळाचा जीव वाचू शकतो...
मग काय, बाप हा शेवटी बापच असतो.
त्याने सरळ आपली छाती फाडून पुढचे कित्येक महिने आपल्या काळजाच्या तुकड्याला स्वतःच्या फुप्फुसाद्वारे श्वास दिला आणि जीवाचा जीव वाचवला...
❤️
(व्हॉटस अप फाॅरवर्ड)




हिमा दास

 🎴अभिनंदन हिमा दास!

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जलद धावपटू बनलेली भारत देशाची शान 'हिमा दास' ला आसाम पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले.

#Hima_das






मराठी राजभाषा दिन

||लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी |

|जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी |

|धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी |

|एवढ्या जगात माय मानतो मराठी ||

 - कुसुमाग्रज 

मराठी भाषा दिन हा जगभरातील मराठी भाषिकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीला पाळला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला. मराठी  भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, हि समस्त मराठीजनाची मागणी आहे. 

इये मऱ्हाटीचीये नगरी 
ब्रह्म विद्येचा सुकाळू करी, 
अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवानी मराठीचा उल्लेख करतानाच त्यांनी तिला ब्रम्हविद्या म्हटले आहे, शब्दब्रह्मही म्हटले आहे. याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पटते. अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या या माय मराठीचा मला सार्थ अभिमान वाटतो.

१९१२ : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म. (मृत्यू : १० मार्च १९९९)


आज स्वा.सावरकर यांचा आत्मार्पण दिन

 आज हिंदूह्रदयसम्राट स्वा.सावरकर यांचा आत्मार्पण दिन


सावरकर म्हणजे बुद्धीप्रामाण्यावाद,सावरकर म्हणजे Atheism, सावरकर म्हणजे साक्षात विज्ञानवाद, सावरकर म्हणजे तर्क , सावरकर म्हणजे हिंदुत्व! सावरकर म्हणजे आधुनिकीकरण [अद्ययावत ], सावरकर म्हणजे क्रांतीकार्य ,सावरकर म्हणजे तेज त्याग तप ,सावरकर म्हणजे महाकवी , साहित्य शिरोमणी ,सावरकर म्हणजे थोर समाजसुधारक , सावरकर म्हणजे तीर तलवार !!!सावरकर म्हणजे सुर्याची उबदार प्रखरता , सावरकर म्हणजे वा-याचा वेग ,सावरकर म्हणजे खडकानेही हेवा करावा इतकी कठोरता ,सावरकर म्हणजे साक्षात बृहस्पतीनेही शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची प्रगल्भता ....... सावरकरांचे जिवन म्हणजे ... एक धगधगतं यज्ञकुंड!!

थोर स्वातंत्र्यसेनानी, समाजसुधारक, साहित्यिक, महाकवी, भाषाशुद्धी कार, तत्त्वचिंतक स्वातंत्र्य वीर विनायक दामोदर सावरकर उर्फ तात्यासाहेब यांच्या आत्मार्पणदिनानिमीत्त त्यांच्या पवित्र स्मृतीस शतशः विनम्र अभिवादन !!साष्टांग दंडवत 🚩!!!🚩🚩




Thursday, 25 February 2021

कुसुमाग्रज तारा 🌟

कुसुमाग्रज तारा 🌟

मिथुन तारकासमुहातील कॅस्टर (पुनर्वसू) व पोलक्स जवळच्या तार्‍याचे ’कुसुमाग्रज तारा’ असे नामकरण केले गेले. ’स्वर्गदारा’तील तार्‍याला (Star in the gate of heavens) वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले. त्यांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हे नाव देण्यात आले. स्वित्झर्लंडमधील ’इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री' या आंतरराष्ट्रीय संस्थेने हा गौरव केला. पौराणिक काळात ताऱ्यांना अनेक नावे दिली गेली . पण वर्तमानात असा बहुमान मिळविणारी भारतीय व्यक्ती बहुदा एकमेव. (२५ फेब्रुवारी १९९६)





सुंदर नारायण मंदिराचे जुने छायाचित्र

नाशिकच्या सुंदर नारायण मंदिराचे ब्रिटिश फोटोग्राफर हेन्री कुसेन्स यांनी इसवी सन १८८०-९० दरम्यान काढलेले छायाचित्र.

Photograph of the Sundara Narayana temple at Nashik, taken by Henry Cousens in the 1880s-90s.

Tuesday, 23 February 2021

"हे बाळ पातशाही पालथी घालेल"

"हे बाळ पातशाही पालथी घालेल"

महाराणी सोयराबाईंना पुत्ररत्न झाले. पण बाळ पालथ्या अवस्थेत जन्मले. सर्वजण काळजीत पडले. अपशकून झाला असे कुजबुजू लागले. महाराजांकडे भितभीतच हा विषय काढला. आता काय करायचे. पण झाले उलटेच. 

महाराज उदगारले, " वा ! बाळराजे पालथे जन्मले हे उत्तम झाले. आता ते पातशाही पालथी घालतील." सर्वजण महाराजांच्या या भविष्यवाणीने आनंदले. वातावरणातले मळभ दूर झाले. बाळाचे नाव ठेवले 'रामराजे'.

आणि पुढे शंभुराजांनंतर जेव्हा स्वराज्य संकटात सापडले, तेव्हा शिवछत्रपतींनी व्यक्त केलेला विश्वास राजाराम महाराजांनी सार्थ ठरविला. आपल्या मुत्सद्देगिरीने, व्यवहारचातुर्याने, असामान्य धैर्याने व शौर्याने त्यांनी स्वराज्याची विस्कटलेली घडी नीट बसवली व या हिंदवी स्वराज्याचे प्राणपणाने रक्षण केले.

शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांना जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन.





वेडात मराठे वीर दौडले सात

 

म्यानातुन उसळे तरवारीची पात…वेडात मराठे वीर दौडले सात

२४ फेब्रुवारी १६७४ : कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले. या प्रेरणादायी घटनेवरच कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी वेडात मराठे वीर दौडले सात हे काव्य लिहिले आहे.

कोल्हापूर येथील गडहिंग्लज तालुक्यात नेसरी या गावी एक इतिहास घडला. तो दिवस होता इंग्रजी तिथीनुसार २४ फेब्रुवारी १६७४. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे तिसरे सेनापती म्हणजे कुडतोजीराव गुजर. महाराजांनी त्यांना  त्यांच्या परक्रमामुळे 'प्रतापराव' ही पदवी बहाल केली. तेव्हापासून कुडतोजीराव गुजर 'सेनापती प्रतापराव गुजर' म्ह्णून ओळखले जाऊ लागले.

सन १६७३ साली शिवराज्याभिषेकापूर्वी काही महिने, महाराज पन्हाळगडावर स्थित होते. याचकाळात अदिलशाही सरदार बहलोलखान हत्ती-घोड्यांचे वीस हजारी सैन्य घेऊन स्वराज्यावर चालून आला. याची खबर लागताच शिवाजीराजांनी त्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रतापरावांना धाडले. उमराणी येथे झालेल्या निकराच्या लढाईत बहलोलखान मराठ्यांना शरण आला, त्याने क्षमायाचना करताच प्रतापरावांनी त्यांना सोडून दिले. 

ही बातमी राजेंच्या कानी जाताच राजेंनी प्रतापरावांना पत्राद्वारे आदेश दिला."गनिमास गर्दीस मिळविल्याशिवाय आम्हाला रायगडावर तोंड दाखवू नका".या आज्ञेने प्रतापराव खजिल झाले. बहलोलखानास मारण्यास आतुर झाले. प्रतापरावांना बातमी कळाली की खानाचे सैन्य हे गडहिंग्लजनजीक आहे तेंव्हा प्रतापराव गुजर यांचे सैन्य ही कोल्हापुरजवळ होते. ही बातमी कळताच 

प्रतापरावांनी बेभान होऊन केवळ बरोबरच्या सहा सहका-यांना घेऊन नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला केला. या वळेस बहलोलखानाकडे सुमारे १२हजाराची फौज होती. घनघोर लढाई झाली. शेकडो गनिम त्यांनी कापून काढले, मात्र प्रतापराव गुजर व त्यांचे सहा सहकारी या गर्दीत धारातीर्थी पडले .

प्रतापराव पडले,’ही खबर महाराजांना अतीव दु:ख झाले. या ७ वीरांचे स्मारक महाराजांनी नेसरीजवळ उभारले. तसेच राजाराम महाराजांचा विवाह प्रतापरावांची एक कन्या जानकीबाईंशी लावला. नेसरीची खिंड पावन झाली.


म्यानातुनि उसळे तरवारीची पात

वेडात मराठे वीर दौडले सात!

ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले

सरदार सहा सरसावुनि उठले शेले

रिकिबीत टाकले पाय, झेलले भाले

उसळले धुळीचे मेघ सात, निमिषात

वेडात मराठे वीर दौडले सात!

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना

अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना

छावणीत शिरले थेट, भेट गनिमांना

कोसळल्या उल्का जळत सात दर्यात

वेडात मराठे वीर दौडले सात!

खालून आग, वर आग, आग बाजूंनी,

समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी,

गर्दीत लोपले सात जीव ते मानी

खग सात जळाले अभिमानी वणव्यात

वेडात मराठे वीर दौडले सात!

दगडांवर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा

ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा

क्षितिजावर उठतो अजुनि मेघ मातीचा

अद्याप विराणी कुणि वाऱ्यावर गात

वेडात मराठे वीर दौडले सात!


- कविश्रेष्ठ कुसुमाग्रज









'साहित्यलक्ष्मी' लक्ष्मीबाई टिळक

 'साहित्यलक्ष्मी' प्रख्यात मराठी लेखिका आणि कवयित्री लक्ष्मीबाई टिळक यांचा आज स्मृतीदिन...

२४ फेब्रुवारी १९३६ मध्ये लक्ष्मीबाईंचे नाशिक येथे निधन झाले. लक्ष्मीबाई या फुलामुलांचे कवी म्हणून प्रसिद्ध असलेले कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक ह्यांच्या पत्नी. माहेरचे नाव मनूताई (मनकर्णिका) गोखले. १८८० मध्ये वयाच्या ११व्या वर्षी त्यांचा विवाह झाला. १८९५ मध्ये टिळकांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. प्रथम ह्या घटनेने लक्ष्मीबाईंना धक्का बसला, तरी त्यानंतर ५ वर्षांनी त्यांनीही पतीप्रमाणेच, ख्रिस्ती धर्मावर खरीखुरी श्रद्धा बसल्यानंतर, डोळसपणे तो धर्म स्वीकारला. लक्ष्मीबाईंचे शिक्षण केवळ लिहिण्यावाचण्यापुरतेच झालेले होते. तथापि जीवनातील दुःखांना आणि ताणतणावांना तोंड देत असताना त्यांच्यातील सुप्त कवित्वशक्ती प्रथम उत्स्फूर्तपणे प्रकट झाली. त्यांची पहिली कविता टिळक धर्मांतर करणार, असे समजल्यानंतरच्या वेदनेतून लिहिली गेली आहे. 

पुढे काव्यरचनेसाठी टिळकांचे उत्तेजनही त्यांना मिळत गेले. रेव्हरंड टिळकांनी ओवीवृत्तात लिहावयास घेतलेले ख्रिस्तायन हे प्रदीर्घ काव्य पूर्ण करण्याचे काम लक्ष्मीबाईंनी रेव्हरंड टिळकांच्या मृत्यूनंतर सु. १२ वर्षांनी हाती घेऊन तडीस नेले. एकूण ७६ अध्यायांच्या ह्या काव्यातील पहिले सु. १०।।• अध्याय रेव्हरंड टिळकांचे असून सु. ६४।। अध्याय लक्ष्मीबाईंचे आहेत. त्यामुळे ह्या काव्याचे बहुतांश कर्तृत्व लक्ष्मीबाईंकडेच जाते. एवढी दीर्घ आख्यानक रचना करणाऱ्या त्या एकमेव आधुनिक मराठी कवयित्री होत. त्यांची स्फुट काव्यरचना भावगीतात्मक असून भरली घागर (१९५१) ह्या नावाने प्रसिद्ध झालेली आहे.

संसारातील सुखदुःखांचा, उत्कट ईश्वरनिष्ठेचा सहजाविष्कार तीत आढळून येतो. बालगीते, देशभक्तिपर गीते अशीही काही रचना त्यांनी केलेली असून तीही ह्या काव्यसंग्रहात अंतर्भूत आहे. तथापि ज्या ग्रंथामुळे लक्ष्मीबाईंचे नाव मराठी साहित्यसृष्टीत अजरामर झाले, तो त्यांचा ग्रंथ म्हणजे स्मृतिचित्रे. हा चार भागांत असून त्याचा पहिला भाग १९३४ साली, दुसरा १९३५ साली आणि तिसरा व चौथा १९३६ साली प्रसिद्ध झाले. लक्ष्मीबाईंचे पुत्र देवदत्त ह्यांनी लिहावयास घेतलेल्या रेव्हरंड टिळकांच्या चरित्रासाठी केवळ सामग्री पुरविण्याच्या हेतूने लक्ष्मीबाईंनी आपल्या आठवणी लिहून काढावयास प्रारंभ केला. पुढे श्रीपाद कृष्णांना त्यांचे जमात आणि देवदत्तांचे स्नेही भा. ल. पाटणकर ह्यांच्याकडून लक्ष्मीबाईंच्या ह्या लेखनाची वार्ता समजली. पाटणकारांकडून ह्या आठवणी वाचून घेतल्यानंतर त्या प्रकाशात आल्याच पाहिजेत, अशी इच्छा त्यांनी व्यक्ती केली.

श्रीपाद कृष्णांचे पुत्र प्रभाकर कोल्हटकर ह्यांच्या संजीवनी ह्या पाक्षिकान स्मृतिचित्रे प्रथम प्रसिद्ध झाली.  लक्ष्मीबाईंच्या स्मृतिचित्रांची निर्मिती आत्मप्रेमातून झालेली नाही. जाणीवपूर्वक एखादी साहित्यकृती निर्माण करण्याची इच्छाही ह्या लेखनामागे नव्हती. तथापि लक्ष्मीबाईंच्या जीवनातील नानाविध अनुभवांचे कडूगोड सौंदर्य त्यातून सहजगत्या व्यक्त झाले. स्मृतिचित्रांची अकृत्रिम भाषाशैली, त्यांतून प्रत्ययास येणारी वृत्तीची निरागसता, मानवतेवरील नितांत प्रेम आणि श्रद्धा, स्वतःलाच हसणारी आणि स्वतःबरोबरच सभोवतालच्यांना सदैव प्रसन्न ठेवणारी लोकविलक्षण, मिस्किल विनोदबुद्धी ह्या सर्वच गोष्टींची मोहकता कधीही न कोमेजणारी अशी आहे. 

१९३३ मध्ये नागपूर येथे भरलेल्या मराठी ख्रिस्ती साहित्यसंमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. त्याच वर्षी नासिकच्या कविसंमेलनाचे त्यांना स्वागताध्यक्ष करण्यात आले. १९३५ मध्ये आचार्य अत्रे ह्यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक शहरात त्यांच्या भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आचार्यांनी त्यांना 'साहित्यलक्ष्मी' ही उपाधी दिली. त्यानंतर नाशिक येथेच त्या निधन पावल्या.





सोनम वांगचुक

सोनम वांगचुक! तोच तो ज्यावरून 'थ्री इडियटस' मधला रँचो बेतला होता.

या सोनम ने भारतीय सैन्या साठी सौर ऊर्जेवर (solar energy) चालणारे तंबू (tent) बनवले आहेत. हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये रात्री बाहेर तापमान -14° असले तरी तंबूच्या आत +15° असेल. हा तंबू 30 किलोपेक्षा कमी वजनाचा असल्याने ने आण करायला सोपा आहे. या तंबूत 10 सैनिक राहू शकतात.
आता राॅकेल वगैरे जाळून होणारे प्रदूषण टळेल.
संपूर्ण स्वदेशी बनावट.
सोनम वांगचुक तुम्हाला मनापासून प्रणाम! असेच नवनविन शोध लावत रहा.




Monday, 22 February 2021

गाडगेबाबांचा दुर्मिळ फोटो

आज राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती...

सातारा येथे असताना गाडगेबाबांची प्रकृती साथ देत नव्हती . तेव्हा बाबांनी आर्वजून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भेटीचा निरोप पाठाविला. निरोप मिळताच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपली  कामे बाजूला ठेवून सातारा गाठले.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पाहताच गाडगेबाबांना खूप समाधान वाटले. त्यानी आपल्या उशिखालून कांही  दस्त काढले .ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात देत गाडगेबाबा म्हणाले' सायबा ही लाख मोलाची दौलत हाय. तवा ही दौलत योग्य माणसाच्या हातात देऊन मी मोकळा होणार .म्हणून सायबा तुला बोलावलो बघ.हे दस्ताची योग्य पुर्तता केल्याली हाय तवा ही दौलत तुझ्याकड दिलो तर मी मोकळा .'डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दस्तऐवज पाहिला तर त्यांना आश्चर्य वाटले कारण तो दस्त सातारा येथिल जमिनीचा होता .त्या  सर्व जमिनीचे सर्व अधिकार  गाडगेबाबांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दिले होते.

दान मिळालेल्या जमिनीचा योग्य कामासाठी वापर व्हावा हिच बाबांची इच्छा ओळखून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कर्मवीर भाऊराव पाटलांना निरोप दिला आणि ती सर्व जमिन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी गाडगेबाबांच्या समक्ष कर्मवीरांना बहाल केली.आज तिथे छञपती शिवरायांच्या नावाने चालविलेली रयत शिक्षण संस्था आहे ती याच जागेवर. 

खाली जो दुर्मिळ फोटो शेयर केला आहे तो या घटनेची साक्ष आहे.

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#Gadgebaba #Ambedkar #KarmaveerBhauraoPatil




Sunday, 21 February 2021

गोदावरी जन्मोत्सव

 आज गोदावरी जन्मोत्सव सोहळा...

गोदावरी नदीचे माहात्म्य अतिप्राचीन काळापासून सर्वांना माहित आहे. अनेक पुराणांमध्ये ते वर्णिलेले आहे. भगवान  श्रीरामचंद्रांनी गौतम ऋषींना गोदावरी माहात्म्य सांगून आनंदित केले. रामचंद्रांनी स्वतः गोदातीरी निवास केल्यामुळे तिचे पावित्र्य अधिकच वाढले. तिचे गौतमीमुख विशेष पवित्र मानतात. तिला वृद्धगंगा म्हणतात कारण गंगेचा व गोदेचा उगम एकच असून गोदावरी भूगर्भातून दक्षिणेत आली अशी कथा आहे. ती दक्षिणेत असल्यामुळे तिला दक्षिणगंगा असेही म्हणतात.

गोदावरीचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर गावामागे सह्याद्रीतील डोंगररांगेतील ब्रह्मगिरी डोंगरावर होतो. गोदावरी म्हणजे गाईचे पोषण करणारी असा अर्थ आहे. या पर्वताच्या पायथ्याशी प्राचीन काळी गौतम ऋषींचा आश्रम होता. एकदा त्यांचे कडून चुकून गोहत्या घडली. त्या पातकाच्या निवारणार्थ त्यांनी भगवान शंकराची घोर तपश्चर्या केली व गोहत्येचे पातक नाहीसे होण्यासाठी गंगावतरण करण्याची भगवान शंकरांना वरदान मागितले. त्यांच्या तपश्चर्येने भगवान शिव प्रसन्न झाले व त्यांनी आपल्या जटांच्या माध्यमातून गंगा प्रकट केली अशी कथा आहे. ह घटना माघ शुद्ध दशमी या तिथीस घडल्याचे मानले जाते. त्यामुळे माघ शुद्ध दशमीस गोदावरी जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो.

जेथे महादेवाने जटा उघडून गंगा सोडली तेथे लहानशा कुंडात थोडेसे पाणी असते. नंतर डोंगराच्या पूर्व कुशीत गंगाद्वार येथे लहानशा झऱ्यातून ते बाहेर येते. तेथपर्यंत ६९० पायऱ्या चढून जाता येते. तेथे कुंड व गंगेचे लहानसे देऊळ आहे. ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी ज्योतीर्लिंग त्र्यंबकेश्वर क्षेत्र आहे. 


  
















जेजुरी शिवलिंग

#जेजुरी_शिवलिंग

वर्षातून एकदा महाशिवरात्रीला उघडले जाते.
मुख्य गाभा-याच्या उजव्या बाजूस छोट्या दरवाजातून आत प्रवेश केल्यानंतर खाली एक माणूस उतरू शकेल इतके छोटे तळघर आहे. तेथे हे शिवलिंग आहे. शिवपार्वतीने कैलासानंतर पृथ्वीतलावर वास्तव्य  केलेले एकमेव ठिकाण म्हणजे जेजुरी (जयाद्री) पर्वत असे मानले जाते
 
जय मल्हार 🙏🙏🙏

Saturday, 20 February 2021

कोर्टातला मारुती


'कोर्टातला #मारुती' या नावाने विख्यात असलेले हे मारुतीचे मंदिर एक जागृत व नवसाला पावणारे स्थळ समजले जाते.

#नाशिक #जिल्हा #न्यायालय आवारातील श्री मारुतीचे मंदिर १९७१ पासून अस्तित्वात असून, त्याआधी १९३८ साली प. पु. शिवशिवबाबा यांनी न्यायालय आवारातील झाडाखाली या मूर्तीची प्रतिष्ठापना केली असे सांगितले जाते. त्यानंतर १९८५ साली जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यासाची नेमणूक करण्यात आली. २०१८ मध्ये या प्राचीन मारुती मंदिरातील मूर्तीवर साचलेला शेंदूर काढण्यात आल्यानंतर  ही सुरेख व सुबक मूर्ती दृष्टीस पडली. 

हा मारुती जागृत समजला जात असल्याने दर शनिवारी दर्शनासाठी इथे मोठी गर्दी असते. माणसांमधील परस्परसंबंध, वितंडवाद व विसंवादाचा साक्षीदार असलेला हा मारुती अनेकदा लोकन्यायालयाच्या माध्यमातून तडजोडीने सदर संबंध पूर्ववत करण्यातही यशस्वी ठरलेला दिसून येतो.




Thursday, 18 February 2021

काझीगढीवर दौडली बालशिवाजीची पावले

आज #शिवजयंती निमित्त जाणून घेऊया #शिवरायांच्या बालपणाचे नाशिकशी असलेले नाते.

महाराष्ट्रालाच नव्हे तर अखिल हिंदुस्थानाला स्वाभिमानाची शिकवण देणा-या व प्रबळ शत्रूशी कसा लढा द्यावा याचा संपूर्ण विश्वात मानदंड प्रस्थापित करणारे #छत्रपती #शिवाजी #महाराज यांचा आज जन्मदिवस.

शिवजयंती म्हटले की आपल्याला शिवनेरी किल्ल्याची आठवण येते. शिवरायांचे बालपण शिवनेरीवर कसे गेले असेल याची कल्पनाचित्रे आपल्या मनात फेर धरु लागतात. पण शिवरायांचे बालपण केवळ शिवनेरीवरच नव्हे तर #नाशिक मध्येही व्यतित झाले आहे, हे सांगितले तर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसेल. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा नाशिकशी असलेला संबंध फक्त लढाई आणि गडकिल्ल्यांपुरताच मर्यादित नव्हता, तर नाशिककरांशी त्यांचा थेट ऋणानुबंध जोडला गेला होता, हे नातं आहे छत्रपतींच्या बालशिवाजी रुपाशी! काझी गढीवरील पाटीलवाड्यात बालशिवाजींची पावले तब्बल पाच वर्षे दुडूदुडू दौडत होती. बालशिवाजी शिवनेरीवर जेवढे राहिले तेवढेच ते नाशिकमध्येही राहिले. त्यामुळेच वडील शहाजीराजे व आई राजमाता जिजाऊ यांच्यासह बालशिवरायांचा एकत्रित पुतळा असलेले स्मारक काझी गढीवर उभारावे, अशी पूर्वापार मागणी आहे. खुद्द इतिहास संशोधक सेतू माधवराव पगडी यांनीही अशा वैशिष्ट्यपूर्ण स्मारकाची इच्छा व्यक्त केल्याचे पुरावे उजेडात आले आहेत.

नाशिकमध्ये सन १६३० मध्ये बाल शिवाजींचे वास्तव्य होते. कवीन्द्र परमानंद या समकालीन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निकटवर्ती पंडित कवीने महाराजांची जन्मतारीख फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० ही दिली आहे. म्हणजे बाल शिवाजी वडिलांबरोबर जुन्नरहून नाशिकला आले त्यावेळी ते एक वर्षाचे होते. मोगलांचे ठाणे जुन्या नाशिकच्या काझी गढीच्या टेकडीवर होते. आज या भागात जुम्मा मशिद, गाडगे महाराजांची धर्मशाळा, सादिक अलीचा दर्गा इत्यादी स्थळे आहेत. मोगलांचे ठाणेदार म्हणून शहाजीराजे आजच्या जुम्मा मशिदीच्या जवळ व गाडगे महाराजांच्या धर्मशाळेच्या अगदी वरच्या मजल्याला लागून असलेल्या सरकारी वाड्यातून कारभार पाहत होते. तेथील आताच्या पाटीलवाड्यात (कोठावळे वाडा) शहाजीराजे, राजमाता जिजाबाई आणि बालशिवाजींचे वास्तव्य होते. पुढे शहाजीराजे व मोगलांचे पटले नाही. एका वर्षातच त्यांनी बंडाचा झेडा फडकवला आणि सन १६३२ मध्ये ते निजामशाहीत दाखल झाले.

सन १६३२ ते १६३६ च्या ऑक्टोबरपर्यंत मोगल आणि शहाजीराजे यांची वारंवार धुमश्चक्री चालू होती. शेवटी शहाजी राजांना सन १६३६ च्या ऑक्टोबरमध्ये विजापूरला नोकरीत जावे लागले. या पाच-सहा वर्षांच्या काळात बालशिवाजी नाशिक ते शिवनेरी असे येत-जात राहिले, अशी नोंद इतिहास संशोधक सेतू माधवराव पगडी यांनी 'बहु असोत सुंदर' या पुस्तकात केली आहे.

- रमेश पडवळ





Wednesday, 17 February 2021

छत्रपती सेने तर्फे शिवजन्मोत्सव २०२१ साठी शिवरायांचा विश्वविक्रमी टाक

#छत्रपती सेने तर्फे #शिवजन्मोत्सव २०२१ साठी शिवरायांचा #विश्वविक्रमी टाक 


छत्रपती सेने तर्फे शिवजन्मोत्सव २०२१ साठी तयार करण्यात आलेल्या भव्यदिव्य विश्वविक्रमी टाक चा अनावरण सोहळा सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे पार पडला. सदर टाक चे अनावरण हे शाळकरी मुलीच्या हस्ते करण्यात आले. 

मागील 2 महिन्यापासून काम सुरू असलेल्या या टाक साठी तांबे पितळ याचा वापर करण्यात आला आहे. टाक चे वजन हे ७०किलो असून या टाक ची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्ड (लंडन) येथे नोंद झाली आहे.

छत्रपती सेनेतर्फे विश्वविक्रम चे  सलग 3 वर्ष असून २०१९ मध्ये जिरेटोप, २०२० मध्ये भवानी तलवार आणि २०२१ मध्ये टाक साकारण्यात आला आहे. सदर टाक हा शुभरुषी ज्वेलर्स चे ऋषिकेश कपिलें व मूर्तिकार विश्वनाथ संगमनेरकर बंधू यांच्या तर्फे तयार करण्यात आला आहे.






Tuesday, 16 February 2021

आई वडिलांसोबत डोक्यावर पाटी घेऊन भाजीपाला विकणाऱ्या तरुणाची यशोगाथा...

आई वडिलांसोबत डोक्यावर पाटी घेऊन भाजीपाला विकणाऱ्या तरुणाची यशोगाथा...

बार्शीच्या तरुणाचा यूपीएससी मध्ये झेंडा - शरण कांबळे देशभरात ८ व्या क्रमांकाने उत्तीर्ण.
पोरगं साहेब झालं इतकचं समजते पण कोणती परिक्षा पास झाले माहित नाही. हि प्रतिक्रिया आहे शरणच्या आईची.
बार्शी तालुक्यातील तडवळे गावचे शरण गोपीनाथ कांबळे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ऑगस्ट २०१९मध्ये घेण्यात आलेल्या सीएपीएफ असिस्टंट कमांडंट ( ग्रुप ए ) परीक्षेमध्ये देशात आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. मोल मजुरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकरी आई-बापाच्या कष्टाचं चिज झालं आहे. सेंट्रल आम्रड पोलीस फोर्सद्वारे विविध दलांमध्ये भरती प्रक्रिया राबविली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची बॉर्डर सिक्युरिटी फोर्स बीएसएफ, सेंट्रल रिझर्व्ह पोळी फोर्स सीआरपीएफ, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स सीआयएसएफ, इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस आयटीबीपी आणि सशस्त्र सीमा बल एसएसबी या दलामध्ये निवड करण्यात येते. शरण याने ऑगस्ट २०१९ मध्ये प्रथमच दिलेल्या परीक्षेत बाजी मारली आहे.

गोपीनाथ कांबळे यांना जेमतेम दीड एकर शेती आहे. दिवसभर दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करुन त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण दिले. आई-वडिलांसोबत डोक्यावर पाटी ठेऊन भाजी विकणारा शरण हा लहान मुलगा. दोन मुलांपैकी मोठा मुलगा दादासाहेब अभियंता झाला आहे. तर लहान मुलगा शरण हा अभियंता पदाची पदवी घेऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. शरण याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तडवळे येथील यशवंतराव चव्हाण प्रशालेत , बारावीचे शिक्षण वैरागच्या विद्या मंदिरात आणि २०१६ साली सांगली येथील वालचंद कॉलेज इंजिनिअरिंग येथे बी टेक चे शिक्षन पूर्ण केले आहे. २०१८ साली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगरूर येथून मास्तर ऑफ टेक्नॉलॉजी या विषयाची पदवी घेतली आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका कंपनीमध्ये सुमारे २० लाखांच्या पॅकेजची नौकरी नाकारून शरण याने आई सुदामती व वडील गोपीनाथ यांच्या काबाड कष्ठाचे चीज व्हावे म्हणून केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याचे ठरविले. त्यासाठी त्याने तब्ब्ल १८ ते २० तास अभ्यास करून शरण याने २०१९ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली आणि नुकत्याच जाहीर झालेल्या निकालाने कांबळे कुटुंबाला आनंदाची बातमी मिळाली.

शरण यांच्या निकालाची वार्ता कळताच गावकऱ्यांनी जल्लोष केला. आपला लेक एवढा मोठा साहेब झाला, या आनंदाने आई-वडिलांना आकाश ठेंगणे झाले. भूतकाळातील आठवणी जागवताना, वडील गोपीनाथ आणि आई सुदामती यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तर, थोरला भाऊ दादासाहेब यानंही लहाणग्या भावाचं अभिनंदन केलं, गावातील मित्रांनी एकत्र येऊन शरणच्या गळ्यात हार घालून, फटाके फोडून जल्लोष साजरा केला.







वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....