कुसुमाग्रज तारा 🌟
मिथुन तारकासमुहातील कॅस्टर (पुनर्वसू) व पोलक्स जवळच्या तार्याचे ’कुसुमाग्रज तारा’ असे नामकरण केले गेले. ’स्वर्गदारा’तील तार्याला (Star in the gate of heavens) वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कविवर्य कुसुमाग्रज यांचे नाव देण्यात आले. त्यांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हे नाव देण्यात आले. स्वित्झर्लंडमधील ’इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री' या आंतरराष्ट्रीय संस्थेने हा गौरव केला. पौराणिक काळात ताऱ्यांना अनेक नावे दिली गेली . पण वर्तमानात असा बहुमान मिळविणारी भारतीय व्यक्ती बहुदा एकमेव. (२५ फेब्रुवारी १९९६)
No comments:
Post a Comment