||लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी |
|जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी |
|धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी |
|एवढ्या जगात माय मानतो मराठी ||
- कुसुमाग्रज
मराठी भाषा दिन हा जगभरातील मराठी भाषिकांकडून दर वर्षी २७ फेब्रुवारीला पाळला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रसिद्ध साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, हि समस्त मराठीजनाची मागणी आहे.
इये मऱ्हाटीचीये नगरी
ब्रह्म विद्येचा सुकाळू करी,
अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवानी मराठीचा उल्लेख करतानाच त्यांनी तिला ब्रम्हविद्या म्हटले आहे, शब्दब्रह्मही म्हटले आहे. याची यथार्थता आज मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने पटते. अमृतातेही पैजासी जिंकणाऱ्या या माय मराठीचा मला सार्थ अभिमान वाटतो.
१९१२ : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म. (मृत्यू : १० मार्च १९९९)
No comments:
Post a Comment