Monday, 22 February 2021

गाडगेबाबांचा दुर्मिळ फोटो

आज राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती...

सातारा येथे असताना गाडगेबाबांची प्रकृती साथ देत नव्हती . तेव्हा बाबांनी आर्वजून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भेटीचा निरोप पाठाविला. निरोप मिळताच डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपली  कामे बाजूला ठेवून सातारा गाठले.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना पाहताच गाडगेबाबांना खूप समाधान वाटले. त्यानी आपल्या उशिखालून कांही  दस्त काढले .ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात देत गाडगेबाबा म्हणाले' सायबा ही लाख मोलाची दौलत हाय. तवा ही दौलत योग्य माणसाच्या हातात देऊन मी मोकळा होणार .म्हणून सायबा तुला बोलावलो बघ.हे दस्ताची योग्य पुर्तता केल्याली हाय तवा ही दौलत तुझ्याकड दिलो तर मी मोकळा .'डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दस्तऐवज पाहिला तर त्यांना आश्चर्य वाटले कारण तो दस्त सातारा येथिल जमिनीचा होता .त्या  सर्व जमिनीचे सर्व अधिकार  गाडगेबाबांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना दिले होते.

दान मिळालेल्या जमिनीचा योग्य कामासाठी वापर व्हावा हिच बाबांची इच्छा ओळखून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कर्मवीर भाऊराव पाटलांना निरोप दिला आणि ती सर्व जमिन डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी गाडगेबाबांच्या समक्ष कर्मवीरांना बहाल केली.आज तिथे छञपती शिवरायांच्या नावाने चालविलेली रयत शिक्षण संस्था आहे ती याच जागेवर. 

खाली जो दुर्मिळ फोटो शेयर केला आहे तो या घटनेची साक्ष आहे.

राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#Gadgebaba #Ambedkar #KarmaveerBhauraoPatil




No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....