"हे बाळ पातशाही पालथी घालेल"
महाराणी सोयराबाईंना पुत्ररत्न झाले. पण बाळ पालथ्या अवस्थेत जन्मले. सर्वजण काळजीत पडले. अपशकून झाला असे कुजबुजू लागले. महाराजांकडे भितभीतच हा विषय काढला. आता काय करायचे. पण झाले उलटेच.
महाराज उदगारले, " वा ! बाळराजे पालथे जन्मले हे उत्तम झाले. आता ते पातशाही पालथी घालतील." सर्वजण महाराजांच्या या भविष्यवाणीने आनंदले. वातावरणातले मळभ दूर झाले. बाळाचे नाव ठेवले 'रामराजे'.
आणि पुढे शंभुराजांनंतर जेव्हा स्वराज्य संकटात सापडले, तेव्हा शिवछत्रपतींनी व्यक्त केलेला विश्वास राजाराम महाराजांनी सार्थ ठरविला. आपल्या मुत्सद्देगिरीने, व्यवहारचातुर्याने, असामान्य धैर्याने व शौर्याने त्यांनी स्वराज्याची विस्कटलेली घडी नीट बसवली व या हिंदवी स्वराज्याचे प्राणपणाने रक्षण केले.
शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांना जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
No comments:
Post a Comment