'कोर्टातला #मारुती' या नावाने विख्यात असलेले हे मारुतीचे मंदिर एक जागृत व नवसाला पावणारे स्थळ समजले जाते.
#नाशिक #जिल्हा #न्यायालय आवारातील श्री मारुतीचे मंदिर १९७१ पासून अस्तित्वात असून, त्याआधी १९३८ साली प. पु. शिवशिवबाबा यांनी न्यायालय आवारातील झाडाखाली या मूर्तीची प्रतिष्ठापना केली असे सांगितले जाते. त्यानंतर १९८५ साली जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यासाची नेमणूक करण्यात आली. २०१८ मध्ये या प्राचीन मारुती मंदिरातील मूर्तीवर साचलेला शेंदूर काढण्यात आल्यानंतर ही सुरेख व सुबक मूर्ती दृष्टीस पडली.
हा मारुती जागृत समजला जात असल्याने दर शनिवारी दर्शनासाठी इथे मोठी गर्दी असते. माणसांमधील परस्परसंबंध, वितंडवाद व विसंवादाचा साक्षीदार असलेला हा मारुती अनेकदा लोकन्यायालयाच्या माध्यमातून तडजोडीने सदर संबंध पूर्ववत करण्यातही यशस्वी ठरलेला दिसून येतो.
No comments:
Post a Comment