Wednesday, 1 December 2021

नाशिकमधील संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींचे पुरातन मंदिर

आज संत ज्ञानेश्वर महाराज समाधीचा सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवी म्हणजे ७२५ वा समाधी दिन आहे.

संत ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पावन तीरावर संजीवन समाधी घेतली (कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दूर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार)

आज रोजी आळंदी येथे समाधी सोहळा पार पडेल.

आपल्या नाशिक शहरामध्येही श्री ज्ञानेश्वर माऊलींचे अप्रतिम असे मंदिर हुंडीवाला लेन, भद्रकाली येथे आहे. नाशिक परिसरातून आळंदीला जाणारे वारकरी या मंदिराला कायम भेट देतात. जुन्या पद्धतीचे लाकडी बिन्नीचे दरवाजे आणि कमानीचा सभामंडप, लाकडी खांब, नक्षीच्या कमानी, नक्षीदार छत अशा पारंपारिक सजावटीने सजवलेला हा प्राचीन वाडा आहे. या मंदिरात प्रतिवर्षी भाविक दर्शनासाठी आवर्जून येतात. आषाढी आणि कार्तिकी अशा दोन्ही मोठ्या एकादशीला येथे साग्रसंगीत भंडारा व पूजा केली जाते. 

ऐतिहासिक वास्तुचं शहर म्हणून नाशिककडे बघितलं जातं त्यामुळे जर अजूनही काही नाशिककरांनी या मंदिराला भेट दिली नसेल तर एकदा नक्की द्या.

No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....