अपघाती मृत्यू झालेल्या अनामिक कारागिराचे शिल्प
हे शिल्प नाशिक येथील काळाराम मंदिराचे आहे. उत्तर, दक्षिण, व पश्चिम अश्या तीन बाजूस असे हत्तीचे द्वंद्व असलेले शिल्प आहे. फक्त पश्चिम बाजूचे शिल्पातील एका हत्तीवर माणूस पालथा पडलेला दिसत आहे.
असे का ?
पूर्वी उंच बांधकामास क्रेन वा त्या सारखे अन्य यांत्रिक उपकरणे उपलब्ध नव्हती. टप्प्या टप्प्याने मातीचा उतार करून शिल्प व अवजड वस्तू वर सरकवत.
अशात काम करणारा एक कारागीर वरून खाली पडला तो नेमका या हत्तीवर व तेथेच गतप्राण झाला. त्याची स्मृती म्हणून नंतर एक दगडी पुतळा बनवून तो त्या हत्तीवर ठेवण्यात आला आहे.
मंदिरातील अन्य हत्तीवर असा पुतळा नाही. ती फक्त त्या अज्ञात कारागीराची स्मृतिशिला आहे.
या मंदिरात ज्या ओव-या आहेत त्याची संख्या ८४ आहे. ८४ लक्ष योनीतून जीवास फिरावे लागते याचे ते प्रतीक आहे.
या मंदिराच्या वास्तुकलेचे वैशिष्ट्य असे की, पूर्व दरवाजात उभे राहून सुद्धा गाभाऱ्यातील मुर्तीचे दर्शन घेता येते. दरवर्षी रामनवमीस सुर्यकिरण रामाचे मुर्तीवर प्रकाशित होतात.
राम मंदिरा समोर मारूती मंदिर आहे. त्या सभामंडपास ४० खांब आहेत. ते हनुमान चालीसाचे प्रतीक म्हणून बाधले गेले आहेत.(१० खांबांची १ ओळ अश्या ४ ओळी). मारुतीच्या मूर्तीची नजर श्रीरामप्रभूंच्या चरणावर आहे.
मंदिराचे प्रांगणातून मुख्य मंदिरात जाण्या साठी १४ पायर्या चढून जावे लागते. रामाच्या १४ वर्षे वनवासाचे ते प्रतीक आहे.
No comments:
Post a Comment