Monday, 2 November 2020

श्रीरामाचे मिशा

"श्रीरामाच्या  मिश्या"

नाशिक च्या काळारामाचे वैशिष्ट्य येथे चैत्र गुढीपाडवा ते चैत्र शुध्द त्रयोदशी माध्यान्न राज उपचार महाअभिषेक झाल्यानंतर प्रभूरामचंद्र लक्ष्मण यांना सोन्याच्या मिश्या लावल्या जातात.

भगवान शिवाचे अवतार असलेल्या भैरव,खंडेराव यांचे  दर्शन या स्वरूपात दाखवतात.   परंतु संपूर्ण जगात कोणत्याही वैष्णव मूर्तीला { विष्णू , राम, कृष्ण, बालाजी, विठ्ठल ,मोहनीराज } मिश्या दाखवलेल्या नाहीत.

या संदर्भात वाल्मीकी रामायणात एक कथानक आले आहे. (वाल्मीकी रामायण .अरण्यकाण्ड षडविंशः{२६ } सर्ग.श्लोक क्र.४ रामः क्रोधं परं लभे वधार्थं सर्व रक्षसाम्.)

प्रभूरामचंन्द्र ज्या वेळी दंडकारण्यात आले. त्या वेळी खरदूषण त्रीशिर शूर्पणखा यांच्यासह रावणाचे महा बलाढ्य व अतिशय क्रूर असे १४ हजार राक्षस  दंडकारण्यात व विशेषतः पंचवटीच्या परिसरात वास्तव्यास होते. 

देवांना देखील दूर्रजय असलेल्या या महाबलाढ्य राक्षस सेनेचा अजानबाहू असलेल्या प्रभू श्रीरामांनी अवघ्या दिड मुहुर्तात म्हणजे ४५ मिनिटांत वध केला, त्या प्रसंगी श्रीरामाच्या चेहऱ्याकडे कोणी पाहू शकत नव्हते, जणू ते राक्षसांचे काळ भासत होते. उग्र तेज रामरायांच्या चेहऱ्यावर क्रोध धारण केल्यामुळे प्रकटले होते जणू ते राक्षसांचे काळ, भासत होते 

म्हणून ते राक्षसांना दंड देणारे, शिक्षा करणारे काळराम; एरवी दशरथ तयनं शामलं शान्तमूर्तिम् असणारे भासत नव्हते तर वीर रस धारण केलेले दिसत होते.

प्रभूच्या जीवनातील प्रथमच एवढा मोठा युद्ध प्रसंग ... प्रचंड मोठा पुरूषार्थ गाजविला. राम बाण केव्हा भात्यातुन काढीत केव्हा जोडून सोडीत होते हे सुघ्दा समजत नव्हते ...

पुरूषार्थाची पराकाष्ठा केली. वीर, शौर्य, तेज, उग्र सर्वच भाव रामांच्या चेहऱ्यावर प्रकटला. मिशी त्याच पराक्रमाचे प्रतिक. म्हणून रामाच्या मूर्तीस सोन्याची मिशी लावली जाते...

सायंकाळी शेजआरती च्या वेळी मिशी काढल्यानंतर राम पुन्हा सुंदर शांत दिसतांत.

No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....