तुम्हाला माहीतआहे_का
धोडप आणि वसुबारस..
सातमाळचा मुकुटशिरोमणी आणि नाशिकच्या प्रत्येक डोंगर भटक्याच पहिल प्रेम म्हणजे दुर्गरत्न धोडप..
वास्तविक प्रत्येक गडाशी निगडित अश्या काही कथा असतात.. श्रद्धा किंवा अंधश्रद्धा यापलिकडच अस एक अलौकिक विश्व या कथेमध्ये दडलेल असत.. असच हे धोडपच्या पोटात लपलेल नैसर्गिक शिल्प.. दगडी गाय.. अशी एक आख्यायिका आहे की ही गाय आणि तिच वासरू धोडपच्या डोंगरामुळे वेगळे झालेत.. आणि दरवर्षी वसुबारसच्या दिवशी ही गाय गव्हाच्या दाण्याएवढी पुढे सरकते.. तिच्या वासराच्या ओढीने..
अर्थात ही कथा एका वाटसरूकडून कळाली होती.. पटो अगर नको पण काहीतरी वेगळ या उद्देशाने एकदा भेट द्यायला हरकत नाही..
- स्वप्नील खोत
No comments:
Post a Comment