Monday, 5 October 2020

माझी आई व इतर शेजारच्या आया

'माझी पत्नी काहीही करत नाही, ती घरी असते इतकेच....' केरळातील एका विद्यार्थ्याचे वडील आपल्या पत्नीची इतरांना ओळख करून देताना सांगायचे.
परंतु हा मुलगा मात्र आपल्या आईला सतत कुठल्या ना कुठल्या कामात गर्क असलेला पहायचा, म्हणून त्यानं आपली आई विविध कामात गर्क करतानाचे पेंटींग काढले व त्याला शिर्षक दिले -- 'माझी आई  व इतर शेजारच्या आया'

अनुजथ सिंधु विनायल असं या मुलाचं नाव. तो केरळच्या त्रिसुरमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकतो. त्याचं हे चित्र पाहून त्याचे शिक्षक इतके चकीत झाले की त्यांनी ते सरकारी कार्यालयाकडे पाठवून दिले. या चित्रात त्यानं महिलांच्या विविध घरकामांची दखल घेतली आहे.
हे पेंटींग केरळ सरकारच्या २०२०-२०२१ च्याा जेंडर बजेट डॉक्युमेंटचे कव्हर म्हणून निवडले गेले आहे.

1 comment:

सुंदर नारायण मंदिर व गोदावरी घाट, पंचवटी, नाशिक (सुमारे इसवी सन १८७५–१८७८च्या दरम्यान)

📜 ऐतिहासिक छायाचित्र : सुंदर नारायण मंदिर व गोदावरी घाट, पंचवटी, नाशिक (सुमारे इसवी सन  १८७५–१८७८च्या दरम्यान) एका अज्ञात छायाचित्रकाराने क...