Saturday, 3 October 2020

सरकार वाडा, नाशिक येथील अप्रतिम लाकूडकाम

सरकार वाडा, नाशिक येथील अप्रतिम लाकूडकाम.

पेशव्यांच्या राजवटीत बांधला गेलेला हा सरकार वाडा 1750-1760दरम्यान पूर्ण झाला. म्हणजे आता ह्या वाड्याचं वय तब्बल 'अडीचशे वर्षे' आहे! पेशवे ह्या वाड्यातून उत्तर महाराष्ट्रातली मराठी राजवट चालवत असत. 1818नंतर पेशव्यांच्या पतनानंतर हा वाडा ब्रिटिशांनी ताब्यात घेतला. त्यांनीदेखील वाड्याचा उपयोग Regional headquarter म्हणून केला.

त्या काळातील सौंदर्याचे परिमाण असलेल्या गोष्टींचा उदा. अत्तरदाणी, कळशी, केळफुले, शिड्या, कमळ इ. वापर ह्या लाकूडकामाच्या डिझाईनसाठी केलेला आहे हे अगदीच लक्षात येईल.

जुन्या नाशकात असलेला हा वाडा अजूनही अतिशय चांगल्या अवस्थेत टिकून आहे. ह्याचे सुंदर म्युझियम बनवले गेले आहे. सोबत असलेल्या फोटोंत ह्या वाड्याच्या सौंदर्याचा आस्वाद घेता येईल. ❤️

Credits: Karan Raskar

1 comment:

  1. It's a heritage monument to be preserved,but a sad story that once upon a time, somewhere in 1970s there was a police station of nasik,known as 'sarkarwada police station

    ReplyDelete

असा असतो आषाढी वारीचा सोहळा

🚩 हेचि घडो मज जन्मजन्मांतरी ।        मागणे श्रीहरी नाही दुजे ।। आषाढी वारीला संतांच्या पालख्या पंढरपुरात पोहोचल्या, की वारी संप...