Saturday, 5 February 2022

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं खरं नाव माहितीये का?

 गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं खरं नाव माहितीये का?



लता मंगेशकर यांनी असंख्य चित्रपटांना आपला आवाज दिला. त्यांच्या गोड आवाजामुळे आज लाखो गाणी अजरामर झाली आहेत. त्यामुळे त्यांच्या गाण्याविषयी तर साऱ्यांनाच ठाऊक आहे. मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी जणांना माहित आहे. 


लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला. लता, आशा, उषा, मीना, आणि हृदयनाथ या मंगेशकर भावंडांमध्ये लतादीदी सर्वात मोठ्या. लता मंगेशकर यांचे मूळ नाव हेमा असे होते. पण काही वर्षांनंतर दिनानाथ यांच्या नाटकातील ‘लतिका’ या पात्राच्या नावावरुन त्यांना लता असे नाव ठेवण्यात आलं.


लता मंगेशकर यांचा जन्म मराठी भाषा बोलणारे गोमंतक मराठा कुटुंबातील इंदोर मध्यप्रदेशात झाला. त्यांचे वडील पंडित दिनानाथ मंगेशकर हे एक शास्त्रीय गायक आणि रंगमंच अभिनेते होते. त्यांच्या आईचे नाव माई आणि वडील दीनानाथ. कौटुंबिक आडनाव हर्डीकर होते, पण दिनानाथ यांनी ते बदलून मंगेशकर ठेवले, कारण त्यांचे नाव मंगेशी गाव, गोव्याचे प्रतिनिधित्व करेल. जन्माच्या वेळी लताचे नाव “हेमा” असे होते परंतु नंतर तिला लता असे नाव देण्यात आले. लता तिच्या पालकांचे पहिले मूल आहे. याबरोबरच मीना, आशा भोसले, उषा आणि हृदयनाथ हे त्यांचे भाऊ आणि बहिणी आहेत.

लता मंगेशकरांनी प्रथम धडा आपल्या वडिलां पासून शिकला होता. वयाच्या पाचव्या वर्षी लताजींनी आपल्या वडिलांच्या संगीत नाटक (संगीत नाटक) साठी अभिनेत्री म्हणून काम करणे सुरु केले. शाळेच्या पहिल्याच दिवशी त्यांनी मुलांना गायला शिकवणे सुरु केले. जेव्हा शिक्षकांनी त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते अतिशय संतप्त झाली आणि त्यांनी शाळेत जायचे बंद केले. लता मंगेशकर यांनी लताच्या बालपणात संगीत क्षेत्रातील एक चमत्कार असल्याचे त्यांच्या वडिलांच्या लक्षात आले. लता यांना वयाच्या ९ व्या वर्षी गायिका आणि अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ करून दिला. मास्टर दीनानाथ यांच्या मृत्यूनंतर १९४२ मध्ये १३ वर्षांच्या वयात “नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारी” हे सदाशिवराव नेवरेकरांनी बसवलेले गाणे वसंत जोगळेकरांच्या “किती हसाल” ह्या मराठी चित्रपटासाठी गायले.

त्यांनी ३०,००० पेक्षा अधिक गाणी गायली आहेत आणि सर्व भारतीय भाषांमध्ये गायन करण्याचा विक्रमही नोंदविला आहे. लता मंगेशकरांनी अनेक गाणी आणि संगीतकारांना यश मिळवून दिले, आणि त्यांच्या चांगल्या गयाना मुले अनेक चित्रपट प्रसिद्द पण झाले. त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत आणि भारत सरकार ने पद्मश्री देऊन सन्मानित केले आणि त्यांना 1958, 1960 1965, आणि 1969 मध्ये फिल्मफेअर पुरस्कार मिळाले.


पार्श्वगायन, सुगम संगीत संगीत क्षेत्रातील कामगिरीबद्दल अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.

फिल्म फेर पुरस्कार- 1958, 1962, 1965, 1969, 1993, 1994. राष्ट्रीय पुरस्कार- 1972, 1975, 1990. महाराष्ट्र सरकार पुरस्कार- 1966, 1967. पद्मभूषण 1969. गिनीज़ बुक रिकॉर्ड- 1974, दादा साहब फाल्के पुरस्कार 1989, फिल्म फेर का लाइफ टाइम अचीवमेंट पुरस्कार 1993, स्क्रीन का लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार 1996, राजीव गांधी पुरस्कार 1997, एन.टी.आर. पुरस्कार 1999, पद्म विभूषण 1999, ज़ी सिने का लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार 1999, आई. आई. ए. एफ. का लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार 2000, स्टारडस्ट का लाइफटाइम अचीवमेंट पुरस्कार 2001. भारत का सर्वोच्च नागरिक सम्मान “भारत रत्न” 2001.

नूरजहाँ पुरस्कार 2001. महाराष्ट्र भुषण 2001 “गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” द्वारे त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. १९८९ मध्ये यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देण्यात आला.










मारुतीरायाची अनोखी मूर्ती.

 अतुलितबलधामं हेमशैलाभदेहम्।

दनुजवनकृषानुम् ज्ञानिनांग्रगणयम्।
सकलगुणनिधानं वानराणामधीशम्।
रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि॥




सोंढे, जि. उत्तर कन्नड, कर्नाटक येथील वादिराज मठातील मारुतीरायाची रामनाम गायन करतानाच्या आसनातील अनोखी मूर्ती.

काळ्या पाषाणातील हि मूर्ती चतुर्भुज असून सुखासनात कमलासनावर बसलेली आहे. वरच्या उजव्या हातात गदा धारण केलेली आहे तर बाजूचा वरचा हात अभयहस्त मुद्रेत आहे. खालच्या उजव्या हातात विणा आहे व डाव्या हाताने चिपळ्या वाजवीत आहे.

Friday, 4 February 2022

मराठा लाइट इन्फंट्री

 आज ४ फेब्रुवारी

आज #मराठालाइटइन्फंट्री_रेजिमेंट चा वर्धापनदिन.
स्थापना. ४ फेब्रुवारी १७६८

भारतात अडीचशे वर्ष पूर्ण झालेल्या अगदी मोजक्या रेजिमेंट आहेत. त्यातली 'मराठा लाइट इन्फंट्री' ही एक अत्यंत मानाची रेजिमेंट आहे. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंट (एम.एल.आय.आर.) ही भारतीय सेनेतील सैन्यदल असून सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील जंगी पलटण म्हणून होती. १८०२ च्या सुमारास याला रेजिमेंटचा दर्जा देण्यात आला. लाईट इंन्फंट्री म्हणजे मोजक्या सैनिकांची चपळपणे हालचाली करू शकणारी पलटण. याचे प्रशिक्षण केंद्र बेळगाव येथे आहे. यातील सैनिकांना गणपत असेही संबोधतात. अश्या सहा बटालियन्स सैन्यात होत्या. या बटालियन्स एकत्रित करून त्याचे लाईट इन्फंट्री रेजिमेंटमधे रुपांतर करण्यात आले. ब्रिटिश काळात मुंबई प्रांतामध्ये बॉम्बे नेटिव्ह सिपॉयच्या रूपात 'मराठा'ची स्थापना झाली. त्यावेळी फर्स्ट मराठा म्हणजेच जंगी पलटण आणि सेकंड मराठा म्हणजे काळी पाचवी अशा दोन बटालियन होत्या. या दोन्ही रेजिमेंटनी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात मोठा पराक्रम गाजवला. ब्रिटिशांनी युरोपात मिळवलेल्या विजयाचे खरे शिल्पकार हेच मराठे होते. दुसऱ्या महायुद्धात इटली व जर्मनीच्या सैन्याशी लढताना इटलीमधील सँग्रो येथे ब्रिटिश सैन्य अडकले होते. त्यांना सोडविण्यासाठी फर्स्ट मराठाचे सैनिक विद्युतवेगाने तब्बल ४० किलोमीटरचे अंतर पायी कापत पोहोचले आणि आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्यांनी ब्रिटिशांची सुटका केली. त्याच कामगिरीमुळे मराठा बटालियन ही लाइट (विद्युतवेगाने काम करणारी) बटालियन म्हणून ओळखली जाऊ लागली.

मराठा लाईट इन्फंट्रीचे चिन्ह हे अशोकचक्र, ढाल तलवार व तुतारी हे आहे. मराठा रेजिमेंटचे मुख्यालय बेळगावात आहे. मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटचा पोशाख हिरवी बेरेट, त्यावर लाल हिरव्य़ा पिसांचा तुरा, हिरवी लॅनयार्ड. ही लॅनयार्ड खांद्यावर नसून गळ्याभोवती असते. या पद्धतीने लॅनयार्ड असण्याचा मान फक्त यांनाच आहे. त्यांचा बिल्ला म्हणजे शिकारीच्या वेळेस वाजवण्यात येणार बिगूल हा आहे. पुर्वी ५ नेटीव्ह इन्फंट्रीच्या पुर्वी हे सैनिक त्यांच्या फेट्यावर काळ्या पिसांचा तुरा लावत असत. त्या तुर्या मुळे या बटालियनला “काळी पाचवी” असेही म्हटले जात असे. आजही हे नाव प्रचलित असलेले आढळते. आपल्या नावाला जागत या रेजिमेंटचे जवान मार्चिंग मध्ये मिनीटाला १२० पावले टाकतात.

या सैनिकांनी अबेसिनीया, मेसोपोटेमिया या देशात, जनरल एलनबी यांच्या नेतॄत्वाखाली, वाळवंटातून पॅलेस्टाईनमधे दूरवर अंतरे वेगाने कापली. येथे असलेल्या हालआपेष्टांना ज्या तडफेने तोंड दिले. इटलीमधील केरेन व आसाम, ब्रह्मदेशमधील जंगलात त्यांनी निसर्गावर मात करून जपान्यांशी घनघोर युद्ध केले. या सगळ्या युध्दातून त्यांनी शौर्याच्या बाबतीत जगाच्या सगळ्या फौजांना मागे टाकले आहे. त्या युध्दात त्यांनी गाजवलेल्या पराक्रमासाठी त्यांना मान म्हणून चांदीचा ड्रम प्रदान करण्यात आला. आफ्रिकेत सोमालीया येथे पाठवण्यात आले. त्या देशात पहिल्या महायुद्धापर्यंत त्यांचा मुक्काम होता. ही या सैन्याची बाहेरील कामगिरी होय. २९ ऑक्टोबर १९१८ रोजी जो तुर्की सैन्यावर हल्ला केला गेला त्यात तुर्कस्तानची बगदादवरची सत्ता नष्ट झाली. या युद्धाच्या स्मरणार्थ दरवर्षी शरकत दिवस पाळला जातो आणि त्या दिवशी एक खास परेडचे आयोजन केले जाते. या लढाईत ११४व्या मराठा लाईट इन्फंट्रीला २८ शौर्य पदकांनी सन्मानित करण्यात आले. एकाच हल्ल्यात इतकी शौर्य पदकं मिळवणारी मराठा लाईट इन्फंट्री ही एकमेव रेजिमेंट आहे.

मराठा लाइट इन्फेंट्रीची युद्धगर्जना "बोला श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय." अशी जबरदस्त आहे. हि एकमेव युद्धगर्जना जी देवाच्या नावाने नसून एका महापुरूषाच्या नावाने आहे.मराठा लाईट इन्फ्रंट्रीची युद्धगर्जना 'छ.शिवाजी महाराज की जय' ही कधीपासुन दिली जाऊ लागली हे पाहणे सुध्दा रंजक ठरेल.
१९४१ साली दुसऱ्या महायुद्धात आफ्रिकेत आत्ताच्या इथियोपियाच्या म्हणजे त्याकाळच्या ॲबेसिनीयाच्या उत्तरेस एक छोटासा देश होता त्याचं नाव इरेट्रिया. या इरेट्रियात एक केरेन नावाचा प्रांत आहे.या प्रांतात उंच अशा डोंगररांगा आहेत.या डोंगररांगेवर एक किल्ला इटालियन सैनिकांच्या ताब्यात होता त्याचं नाव "डोलोगोरोडाँक". हा किल्ला जिंकून घेण्यासाठी ब्रिटिशांतर्फे मराठा रेजिमेंट लढत होती.बराच प्रयत्न करून सुद्धा हा किल्ला त्यांच्या ताब्यात येत नव्हता.परंतु या मराठा रेजिमेंटमध्ये एक 'श्रीरंग लावंड' नावाचे एक सुभेदार होते, त्यांनी ब्रिटिशांना सांगितलं आम्हांला शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची परवानगी द्या आम्ही हा किल्ला तुम्हाला जिंकून देऊ. पण ब्रिटिश ही परवानगी देण्यासाठी घाबरत होते कारण महाराजांचं नाव घेऊन यांनी बंदुका आपल्यावरच रोखल्या तर? पण त्यांना किल्ला घेण्याशी मतलब असल्यामुळं त्यांनी ही परवानगी दिली. नंतर आपल्या लोकांनी 'बोला छत्रपती शिवाजी महाराज कि जय' म्हणत एका रात्रीत किल्ला जिंकून घेतला आणि त्यानंतर मराठा लाइट इन्फ्रंट्रीने ही battlecry म्हणजे युद्धगर्जना अधिकृत केली. या युद्धगर्जनेमुळे केवळ सह्याद्रीतच नव्हे तर जगाच्या पाठीवर कोठेही प्रेरणा मिळाल्याशिवाय रहाणार नाही.




Thursday, 3 February 2022

।माघी गणेश जयंती।

ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो बुद्धि प्रचोदयात।।

गणेश जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!! 🌺🙏


श्रीगणपतीचे एकंदरीत तीन अवतार मानण्यात येतात.

या तिन्ही अवतारांचे जन्मदिवस वेगवेगळे आहेत. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस, दुसरा भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा पार्थिव गणेश जन्मदिवस, तिसरा माघ शुक्ल चतुर्थीचा श्रीगणेश जयंतीचा दिवस !

चौदा विद्या चौसष्ठ कलां’चा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाची जयंती  माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी ‘श्रीगणेशजयंती’ म्हणून ओळखली जाते. हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. 

भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यानंतर गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवैद्य दाखविला जातो. 

तर माघी गणेशोत्सवात गणपतीला तीळाच्या लाडवांचा नैवैद्य दाखविण्याची प्रथा आहे. माघी गणेश जयंती ही तीलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते.

भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी अर्थात गणेशोत्सव जेवढय़ा मोठय़ा सार्वजनिक आणि घरगुती स्वरूपात साजरा केला जातो, त्या तुलनेत माघी गणेशोत्सवाचे महत्त्व कमी आहे. काही जण घरीच गणपतीची मूर्ती आणून पूजा करतात. तसेच काही ठिकाणी तो सार्वजनिक स्वरूपात साजरा केला जातो. गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला, असे म्हटले जाते. 

पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा, त्याला पुष्टिपती विनायक जयंती म्हणतात. या दिवशी पिठाचा गणपती करून त्याचे पूजन केले जाते.

दुसरी वेळ म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेशचतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी मातीच्या मूर्तीचे पूजन केले जाते. हे पूजन म्हणजे एक प्रकारे पृथ्वीची पूजा असते. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. त्याप्रति कृतज्ञता म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते.

तिसरा दिवस (वेळ) म्हणजे माघ शुक्ल जयंती. या दिवशी धुंडीराज व्रत करण्यास सांगितले आहे.

त्याबाबत, स्कंद पुराणात एक कथा आहे. या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारले. त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला. म्हणून, ही माघी गणेश जयंती (माघी गणेशोत्सव) म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. या दिवशी उपवास करून धुंडीराज गणेशाला तीळ व साखरेचे मोदक करून अर्पण करायचे असतात. एक वेळ उपाशी राहून या दिवशी जागरण करायचे असते.


पूजा कशी कराल? 

मातीची मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठा करावी. नंतर, १६ उपचारांनी (षोडशोपचार) पूजा करावी. नैवेद्य दाखवून आरती करावी. अथर्वशीर्षाचे पठण करावे. अथर्व याचा अर्थ स्थिर राहणे. मनाची एकाग्रता साधण्यासाठी अथर्वशीर्षाचे पठण फलदायी ठरते. 

या दिवशी पूजेचा विशेष मुहूर्त नसला तरी सूर्योदयापासून दुपारी ४ पर्यंत केव्हाही पूजा करावी. त्यातही माध्यान्हावेळी अर्थात दुपारी १२ वाजताची वेळ उत्तम.

माघी गणेश जयंतीचा उत्सव हा एक दिवस की, त्याहून अधिक दिवस साजरा करावा, हा निर्णय प्रत्येकाने स्वत:चा स्वत: घ्यावा. स्वत:च्या सोयी आणि मर्जीनुसार ते ठरवता येते. माघी गणपतीला २१ दूर्वा का वाहतात, कारण मातृदेवता २१ आहेत, असे मानले जाते आणि गणपती हा मातृप्रिय आहे. त्यामुळे त्याला २१ दूर्वा वाहतात, असे म्हटले जाते. गणपती हा १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असल्याने त्याच्या उपासनेने मनाची एकाग्रता साधता येते आणि हाती घेतलेले कार्य पूर्ण करता येते.


#GaneshJayanti #गणेशजयंती










रमेश ठाकूर चे 'रमेश देव' कसे झाले?

रमेश देव म्हणजे चैतन्य, उत्साहाचा खळखळता झरा....  एकदम दिलखुलास व्यक्तिमत्त्व. त्यांचे वयाच्या ९३व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.


रमेश देव यांचा जन्म अमरावती झाला,  परंतु त्यांचे घराणे राजस्थानमधील जोधपूरचे होते. रमेश देव यांचं मूळ आडनाव खरंतर ठाकूर होतं. रमेश देव यांचे पणजोबा, आजोबा अभियंता  होते.  त्यांच्या पणजोबा व आजोबांची जोधपूर येथील प्रसिद्ध असा 'जोधपूर पॅलेस' हा राजवाडा बांधण्यामध्ये महत्वाची भूमिका होती असे सांगितले जाते.  कोल्हापूर शहरातील काही इमारतींच्या उभारणीसाठी राजर्षी शाहू महाराजांच्या निमंत्रणावरून त्यांचे आजोबा कोल्हापूरला आले व तेथेच नंतर स्थायिक झाले.  त्यांचे वडील कोल्हापुरात त्याकाळातील एक प्रसिद्ध फौजदारी वकील होते. एकदा रमेश देव यांच्या वडिलांनी शाहू महाराजांना एका कामात अमूल्य मदत केली. तेव्हा शाहू महाराज म्हणाले, ‘ठाकूर, तुम्ही देवासारखे भेटलात बघा. तुम्ही आता ठाकूर नाही आजपासून तुम्ही देवच.’ 


तेव्हापासून ठाकूर हे आडनाव जाऊन सगळेजण त्यांना 'देव' या आडनावानेच संबोधू लागले होते.


देव यांनी करवीर नगरीला  (कोल्हापूर) आपली कर्मभूमी मानले होते. तेथील भक्ती सेवा विद्यापीठात त्यांचे शिक्षण झाले. रमेश देव यांनी त्यांच्या कारकिर्दीत २८५ हून अधिक हिंदी चित्रपट केले आणि सुमारे १९० मराठी चित्रपटांमध्ये ते दिसले. अभिनयाची आवड असलेल्या रमेश यांनी सुमारे ३० मराठी नाटकांमध्येही काम केले आहे. त्यांनी अनेक फिचर फिल्म्स, दूरदर्शन मालिका आणि जाहिरात चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. 


या  महान कलावंताला मनःपूर्वक श्रद्धांजली!!!






Friday, 28 January 2022

ज्ञानेश्वरीचे प्रेरणास्रोत, वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज

भागवत संप्रदायाचे आद्यपीठ, वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक, ज्ञानेश्वर माऊलींचे सकल तीर्थ. विश्वकल्याणाच्या पसायदानातले श्री विश्वेश्वरावो, आद्यगुरू, आदिनाथ असणाऱ्या संत निवृत्तिनाथ महाराज यांनी ज्येष्ठ वद्य द्वादशी रोजी नाशिकमधील त्रंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली. संत निवृत्तीनाथांचा संजीवन समाधी सोहळा त्र्यंबकेश्वर येथे साजरा केला जातो. ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताई या भावंडांमधे निवृत्तिनाथ थोरले होते. निवृत्तिनाथ ज्ञानेश्वरांचे गुरू होते. संसारात मन रमेना म्हणून निवृत्तीनाथांचे वडील विठ्ठलपंत एके दिवशी घरातून बाहेर पडले आणि त्यांनी थेट काशीचा मार्ग धरला. विठ्ठलपंतांनी त्यांच्याकडून संन्यासदीक्षा घेतली. पुढे गुरूंच्या आज्ञेनुसार विठ्ठलपंत आळंदीस आले आणि त्यांनी परत संसारास प्रारंभ केला. नंतर विठ्ठलपंतांना चार मुले झाली. पहिले निवृत्तिनाथ, दुसरे ज्ञानेश्वर, तिसरे सोपानदेव आणि चौथी मुक्ताबाई. मात्र, आळंदीवासीयांनी त्यांना स्वीकारले नाही. देहांत प्रायश्चित्ताविना दुसरे प्रायश्चित नाही, असा गावचा हुकूम झाल्यानंतर विठ्ठलपंत आणि त्यांच्या पत्नी रुक्मिणीबाई यांनी जलसमाधी घेतली. आई-वडिलांविना सर्व भावंड पोरकी झाली. सर्वांत थोरले म्हणून निवृत्तिनाथांनी सर्व भावंडांचा सांभाळ केला. त्यांना योग्य दिशा दाखवली. मार्गदर्शन केले आणि त्यांचे गुरूही झाले.


​पूर्वायुष्य आणि गहिनीनाथांचे शिष्यत्व :

माघ वद्य प्रतिपदेला सन ११९५ रोजी निवृत्तिनाथ महाराजांचा जन्म झाला, असे सांगितले जाते. एके दिवस विठ्ठलपंत पत्नी आणि मुलांसहित त्र्यंबकेश्वराच्या मागील डोंगरावर गेले होते. डोंगरात हिंडता-हिंडता एक वाघ धावत आला. विठ्ठलपंत बायकोमुलांसह पळाले. अरण्यातून बाहेर पडल्यानंतर निवृत्तिनाथ कुठे दिसेनात. पुष्कळ शोध करूनही निवृत्तिनाथ सापडले नाहीत. सात दिवसांनंतर निवृत्तिनाथ दत्त म्हणून पुढे उभे राहिले. गेले सात दिवस कुठे होता, अशी विचारणा केल्यावर, वाघाला भिऊन पळतांना मी एका गुहेत शिरलो. त्या ठिकाणी एक स्वामी बसले होते. त्या अंधाऱ्या गुहेतही त्यांची कांती मला स्पष्ट दिसत होती. त्यांचे नाव गहिनीनाथ. त्यांनी मला योग शिकवला आणि आता जगामध्ये गांजलेले जीव आहेत, त्यांना तू सुखी कर, असे सांगितले, असे निवृत्तिनाथांनी सांगितले. अशा प्रकारे निवृत्तिनाथ गहिनीनाथांचे शिष्य बनले.


​संत ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक :

नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना दीक्षा दिली. गैनीनाथ वा गहिनीनाथ हे निवृत्तिनाथांचे गुरू होते. सुमारे तीन-चारशे अभंग आणि एक हरिपाठ एवढी रचना, निश्चितपणे निवृत्तिनाथांची आहे, असे म्हणता येईल. योगपर, अद्वैतपर आणि कृष्णभक्तिपर, असे अभंग त्यांनी रचले आहेत. निवृत्तिनाथांची ख्याती आणि महत्त्व केवळ कवी म्हणून नाही, तर ज्ञानेश्वरांचे मार्गदर्शक ‌म्हणून अधिक आहे. आपले संपूर्ण अध्यात्मधन ज्ञानेश्वरांना देऊन त्यांना यश दिले व आपण त्या यशापासूनही निवृत्त झाले, असे निवृत्तिनाथांबद्दल म्हटले जाते.


​ज्ञानेश्वरीचे प्रेरणास्रोत : 

निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरू होते. निवृत्तिनाथांनी ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे शके १२१२ मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी नेवासे येथे भावार्थदीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचला. हा अलौकिक ग्रंथ त्यांनी अत्यंत नम्रपणे संतसद्गुरू निवृत्तिनाथांच्या चरणी अर्पण केला. यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंच्या आज्ञेवरून 'अमृतानुभव' हा एक स्वतंत्र ग्रंथ लिहिला. निवृत्तिनाथांबद्दल असलेला आदर ज्ञानेश्वरांनी अनेक ठिकाणी व्यक्त केलेला आढळतो. अनेक तीर्थयात्रांमध्ये निवृत्तिनाथांसोबत ज्ञानेश्वर होते.


​'सटीक भगवद्‌गीता' आणि 'समाधि बोध' :

निवृत्तिदेवी, निवृत्तिसार आणि उत्तरगीताटीका, असे तीन ग्रंथही निवृत्तिनाथांनी लिहिल्याचे म्हटले जाते. मात्र, आताच्याघडीला ते उपलब्ध नाहीत. धुळे येथील श्रीसमर्थवाग्देवता मंदिरात ‘सटीक भगवद्‌गीता’ आणि ‘समाधि बोध’ अशी दोन हस्तलिखिते आहेत, ती निवृत्तिनाथ महाराजांची आहेत, असे सांगितले जाते. निवृत्तिनाथ समजून घ्यायचे तर अनेक संतांच्या हृदयस्थ भावनांना मन–स्पर्श करायचा तो भक्तीच्या ओथंबलेपणातून. तिन्ही भावांचे शब्दपूजन सूर्याची उपमा देऊन केली जाते. सूर्य म्हणजे प्रकाशाची सहस्त्रावधी किरणे, तसेच सद्गुरू निवृत्तिनाथांचे ज्ञानस्वरूप. विश्व-आत्म-स्वरूप म्हणजे निवृत्तिनाथांचे व्यक्तिमत्त्वदर्शन. निवृत्ती हे तत्त्व आहे. गुरुतत्त्व स्वरूप असतात. संतांची भाव-एकवाक्यता अनुभूतिपूर्ण आहे.

​त्रंबकेश्वरी समाधी : 

निवृत्तिनाथ, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई या चारही भावंडानी आपल्या अभंग रचनेच्याद्वारा पंढपुरची वारी करून सर्व समाजाचे प्रबोधन केले. निवृत्तिनाथांनी व्यक्त केलेले भाव नामदेवांनी शब्दबद्ध करून ठेवले आहेत. नामदेव महाराजांच्या नंतरच्या काळातले सेना महाराज निवृत्तिनाथांचे वर्णन करतात. संत चोखोबा महाराज त्यांच्या अभंग गाथेतील संतांची आरती या प्रकरणात निवृत्तिनाथांचा उल्लेख निरंतर ब्रह्म आणि आनंदाचा पूर असा करतात. एकनाथ असो की नामदेव, सेना महाराज असो की चोखोबा, जनाबाई असो की कान्होपात्रा, तुकाराम महाराज असो की निळोबाराय, सोपान असो की मुक्ताई, या सर्व संतांनी निवृत्तिनाथांचे गुणगायन केले आहे. संत ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर सरते शेवटी जेष्ठ वद्य द्वादशी रोजी निवृत्तिनाथ महाराजांनी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली.

संत निवृत्तीनाथ महाराजाच्या समाधीला ७२५ वर्षे झाली आहेत. हा  समाधी सोहळा जेष्ठ महिन्यात पावसाळ्यात झाला. मग आता यात्रा  आता कशी असा प्रश्न काही भाविकांना पडतो  या प्रश्नाचे  स्पष्टीकरण असे की, त्र्यंबकेश्वरला संत निवृत्तीनाथ महाराजांनी संजीवनसमाधी घेतली  थोडक्यात पावसाळा असे असताना यात्रा उत्सव पौष वद्य एकादशीला थोडक्यात या तिथीला भरवणे हा निर्णय तत्कालिन संतांनी घेतला.

श्री हरी पांडुरंगाची पंढरपूर यात्रा आषाढात असते . अशा वेळेस सर्व ठिकाणच्या ,सर्व संतांच्या दिंड्या पंढरपूर वाटचाल करीत असतात. ही पायी वाटचाल एक महिन्यापर्यंत अगोदर सुरू असते.  व  परतीत 15  दिवस सुरू असते. कार्तिकात माऊलींची आळंदी यात्रा असते. तर पावसाळ्यात त्रंबकेश्वरला मोठा पाऊस असतो. अशी काही कारणे  लक्षात घेऊन तत्कालीन संतांनी सातशे वर्षा पूर्वी समाधी सोहळ्या नंतर म्हणजे संत निवृत्ती नाथ यात्रा पौष वारी  पौष वद्य एकादशीला तिथीला यात्रा  भरवावी

असे ठेवले, असा निर्णय घेतला व तेंव्हा पासून अशा प्रकारे पौष महिन्यातील षटतिला एकादशीच्या दिवशी दरवर्षी यात्रा भरत आहे .






Tuesday, 25 January 2022

'आझाद हिंद' चे राष्ट्रगीत

 'आझाद हिंद' चे राष्ट्रगीत


नेताजींच्या विनंतीवरून गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेल्या जन गण मन या गीताचे कॅप्टन आबिद अली व मुमताज हुसेन यांनी हिंदुस्थानी भाषेत रूपांतरण केले तर या गीताला संगीतसाज कॅप्टन रॅम सिंग ठाकुरी यांनी चढवला. नेताजींनी या गीताला लष्करी धुन वर आधारित चाल द्यायला सुचविले जेणेकरून हे गीत ऐकणारे लोक जागृत व सावधान राहतील. या गीताचा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंदुस्तान या हंगामी सरकारने (१९४३-४५) आपले राष्ट्रगीत म्हणून स्वीकार केला होता.

https://youtu.be/MWLxsHFOcuY
https://youtu.be/MWLxsHFOcuY
शुभ सुखचैन की बरखा बरसे , भारत भाग है जागा
पंजाब, सिन्ध, गुजरात, मराठा, द्राविड़ उत्कल बंगा
चंचल सागर, विन्ध्य, हिमालय, नीला जमुना गंगा
तेरे नित गुण गाएँ, तुझसे जीवन पाएँ
हर तन पाए आशा।
सूरज बन कर जग पर चमके, भारत नाम सुभागा,जए हो! जए हो! जए हो! जए जए जए जए हो!॥


सब के दिल में प्रीत बसाए, तेरी मीठी बाणी
हर सूबे के रहने वाले, हर मज़हब के प्राणी
सब भेद और फ़र्क मिटा के, सब गोद में तेरी आके,
गूँथें प्रेम की माला।
सूरज बन कर जग पर चमके, भारत नाम सुभागा,
जए हो! जए हो! जए हो! जए जए जए जए हो!॥


शुभ सवेरे पंख पखेरे, तेरे ही गुण गाएँ,
बास भरी भरपूर हवाएँ, जीवन में रूत लाएँ,
सब मिल कर हिन्द पुकारे, जय आज़ाद हिन्द के नारे।
प्यारा देश हमारा।
सूरज बन कर जग पर चमके, भारत नाम सुभागा,
जए हो! जए हो! जए हो! जए जए जए जए हो!॥




अष्टविनायक — महाराष्ट्राच्या मांगल्याची आठ द्वारे

महाराष्ट्राच्या मातीत गणेशभक्तीचा जो अखंड प्रवाह वाहतो, त्याचे सर्वात प्राचीन आणि पवित्र रूप म्हणजे अष्टविनायक यात्रा. पुणे, रायगड आणि नगर ज...