नंदिनी नदीचे प्रदूषण कमी करून ते रोखण्यासाठी नाशिक मधील सतीश कुलकर्णी व चंद्रकिशोर पाटील हे स्वयंस्फूर्तीने कार्यरत असून मनपाच्या वतीने या दोघांचा कार्यगौरव मा.आयुक्त कैलास जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
नाशिक मधील रहिवासी सतीश कुलकर्णी हे वयाच्या ७० व्या वर्षी नंदिनी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कार्यरत असतात त्यांच्या समवेत चंद्रकिशोर पाटील हे देखील काम करीत असून नंदिनी नदीच्या तिडके नगर पूल येथे या दोघांनी दसऱ्याच्या दिवशी नागरिकांना नदीपात्रात निर्माल्य टाकू नये याबाबत आवाहन करून जनजागृती केली व नदीपात्रात पडणारे निर्माल्य संकलित करण्याचा अभिनव उपक्रम राबवून त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत मा.आयुक्त कैलास जाधव यांनी त्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव केला.
No comments:
Post a Comment