आज आंतरराष्ट्रीय परिचारीका दिन आहे.
दरवर्षी १२ मे रोजी आंतरराष्ट्रीय परिचारीका दिन साजरा केला जातो. रुग्णसेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या जगातील प्रत्येक परिचारिकेचा सन्मान करण्याचा हा दिवस. १९७१ मध्ये आधुनिक नर्सिंगच्या प्रणेत्या लेडी फ्लोरेंस नायटिंगेल यांच्या जन्मदिवशी जागतिक परिचारिका दिन साजरा करण्याचे घोषित करण्यात आले. तेव्हापासून १२ मे हा दिवस हा दिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. फ्लोरेन्स यांचा जन्म १२ मे १८२० ला इटलीमध्ये झाला. धनाढ्य कुटुंबात वाढूनही फ्लोरेंस नायटिंगेल यांनी आपले जीवन रुग्णसेवेसाठी समर्पित केले. आधुनिक शुश्रुषा पद्धती विकसित केल्या. रात्ररात्र त्या हातात दिवा घेऊन प्रत्येक रुग्णाची काळजी घेत. त्यामुळे त्यांना 'लॅम्प लेडी' असेही म्हटले जात असे.
नर्सिंग क्षेत्राकडे त्या काळात तितकेसे प्रतिष्ठेने पाहिले जात नव्हते. मात्र त्यांनी सर्व सामाजिक अडथळ्यांकडे दुर्लक्ष करत १८५१ मध्ये त्यांनी नर्सिंगच्या शिक्षणाला सुरुवात केली. विशेष म्हणजे १८५३ मध्ये त्यांनी लंडनमध्ये महिलांसाठी रुग्णालय सुरु केलं.
१३ ऑगस्ट, १९१९ रोजी फ्लोरेंस नाईटिंगेल यांचं निधन झालं. नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय योगदानामुळे त्यांच्या नावाने पुरस्कारही दिला जातो. नर्सिंग क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या परिचारिकांना फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने गौरवण्यात येते.
नर्सिंग चे वैद्यकीय क्षेत्रातील योगदान हे अतुलनीय व प्रशंसनीय आहे. परिचरिकांमुळे रुग्णांची वेळोवेळी निगा राखली जाते. स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता अहोरात्र मेहनत घेणाऱ्या सर्व परिचारिकांना जागतिक परिचारीका दिनाच्या (International Nurses Day) हार्दिक शुभेच्छा.
No comments:
Post a Comment