*दिनविशेष*
मदर्स डे अर्थात जागतिक मातृदिन
आईचा सन्मान करण्यासाठी 'मातृदिन' साजरा केला जातो. हा दिवस जगातील बराच भागांमध्ये विविध दिवसांमध्ये साजरा केला जातो. सामान्यतः मार्च किंवा मे महिन्यांत हा मदर्स डे साजरा केला जातो. काही देशात जसे बल्गेरिया आणि रोमानिया येथे जागतिक महिला दिन हा दिवस मातृदिन म्हणून साजरा केला जातो तर पाश्चात्य देशात व भारतात मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा केला जातो.
"स्वामी तिन्ही जगाचा
आई वीना भिकारी "
या उक्तितच आईचा महिमा किती अगाध आहे हे समजते.
मातृ दिनाचा इतिहास :
मे महिन्याचा दुसरा रविवार हा पाश्चिमात्य देशात मदर्स डे म्हणून साजरा केला जातो.
मातृ दिनाचा इतिहास खूप प्राचीन आहे. १६ व्या शतकापासून इंग्लडमध्ये एक मोठा समुदाय प्रभू येशूची आई मदर मेरीचा सन्मान करत असे.
अमेरिकेचे राष्ट्रपती वूड्रो विल्सन यांनी १९१४ मध्ये मे महिन्याच्या दुसर्या रविवारी मदर्स डे साजरा करण्याचे जाहीर केले. तेव्हापासून अमेरिकेत मातृ दिन साजरा केला जात आहे. अमेरिकेत साजरा करणारा मदर्स डे हल्ली सर्वत्र साजरा केला जात आहे.
मातेला प्रणाम करण्याचा, तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणाचा हा दिवस. मात्र,आईवरचे प्रेम व्यक्त करणासाठी एक दिवस पुरेसा आहे का?
भारतीय संस्कृतीत आई ही संकल्पनाच अशी आहे की, तिच्यासाठी एखादा दिवस साजरा करणे ही औपचारिकताच ठरेल. शिवाय ही संकल्पना इतकी व्यापक आहे की, ती आपण मोजमाप करता येत नाही. भारतीय संस्कृतीत आईला ईश्वराचे रूप मानले आहे. कोणतेही कार्य करण्याच्या आधी सर्वप्रथम आईचा आशीर्वाद घेतला जातो.
आई ही हृदयातून आलेली प्रेमळ साद आहे.तिच्या पदराखाली वाटणारी सुरक्षिता दुसरीकडे कुठेही मिळत नाही. ममता, माया आणि खरा आपलेपणाचा चिरंतन ओलावा, अनेक समस्यांवरचा एकच उपाय आई होय. रडणारे बाळ आईकडे दिले की लगेच शांत होते. बाळाला हाताला धरून चालायला शिकवणारी आईच जन्म घेणार्या प्रत्येकाची पहिली गुरू असते.
तीच मुलांना लहानाचे मोठे करून त्यांच्यावर संस्कार करते. मुलांच्या सर्व चुकांवर पांघरूण घालणारी आईच असते. मुलांना जिवापार जपणारी, सुख-दु:खांत पाठीशी उभी असते ती फक्त आई. आई आपल्या श्वासात वास करत असते. दूर असली तरी मुलांच्याच काळजीत अललेलं एक नातं म्हणजे आई.
एक वेळेस स्वत: उपाशी राहील; पण आपल्या पिलांना पोटभर खाऊ खातल्याशिवाय तिला चैन पडत नाही. मुलांना काय हवे, काय नको याची काळजी घेणारी ती असते. स्वत: जळत दुसर्यांना प्रकाशात ठेवण्याचे काम ती करते. व्यक्तिमत्त्व घडवणार्या आईचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही.
मुलांच्या सर्व चुकांवर पांघरूण घालणारी आईच असते. मुलांना जिवापार जपणारी, सुख-दु:खांत पाठीशी उभी असते ती फक्त आई. आई आपल्या श्वासात वास करत असते. दूर असली तरी मुलांच्याच काळजीत असलेलं एक नातं म्हणजे आई.
आई सकाळी उठल्यापासून आपल्या पिलांसाठी राबत असते. एक वेळेस स्वत: उपाशी राहील; पण आपल्या पिलांना पोटभर खाऊ खातल्याशिवाय तिला चैन पडत नाही. मुलांना काय हवे, काय नको याची काळजी घेणारी ती असते. स्वत: जळत दुसर्यांना प्रकाशात ठेवण्याचे काम ती करते. व्यक्तिमत्त्व घडवणार्या आईचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही;
आयुष्यात आपण अनेक नाती जोडतं असतो. प्रत्येक नात्यांचा काही तरी अर्थ आहे. काही नाती तडजोड असतात, काही नाती स्वार्थासाठी, काही नाती प्रेमापोटी तर काही नाती आपण केवळ पर्याय नसल्याचे स्वीकारत असतो. 'आई' हे एकमेव असं नातं आहे, ज्यात ना तडजोड आहे, ना स्वार्थ आहे, आणि ना हे नातं तात्पूरतं असतं.
माझ्या मनाचा आरसा आहे माझी आई. आईला कधी माझ्या मनातील कोणतीही गोष्ट सांगण्याची गरज मला भासलीच नाही.
आई म्हणजे प्रेम, माया, वात्सल्याचा सागर आहे. आईच्या उपकारांची महती अपार आहे. तिच्या उपकारांची परतफेड कुणीच करू शकत नाही, हे माहीत असूनही आईविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जगात मातृ दिन साजरा केला जातो.
No comments:
Post a Comment