गोंदेश्वराचे शिल्प सौंदर्य
महाराष्ट्र वर सुमारे पाचशे वर्षे यादव राजघराण्यानी राज्य केलं. यादव राजवटीत 'मराठी' भाषेच्या साहित्यकृतीनी मराठीचे साहित्यभांडार अलंकृत झाले. असे हे यादव घराणे स्वतःला श्रीकृष्णाचे वंशज म्हणवून घेत. यादवांनी बांधलेले किल्ले, राजवाडे, मंदिरे, मठ, रस्ते, बारव आजही महाराष्ट्रात पाहायला मिळतात. यादव काळात स्थापत्य व शिल्पकला बहरात होती. त्याचा उत्तम नमुना म्हणजे शिवपंचायतन प्रकारातील सिन्नर चे गोंदेश्वर मंदिर.
मंदिरातील शिल्पकाम त्रिमित असून त्यावर पडणार्या परावर्तित प्रकाशाच्या आणि सावलीच्या छटांतून मंदिराचे देखणेपण अधिकच उठावदार दिसते. सभामंडपातील खांब नक्षीने कोरलेले असून त्यावर आणि मंदिरांच्या बाह्य भिंतींवर सुरसुंदरी, देव-देवता, गंधर्व-अप्सरा, पौराणिक आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत.
(मंदिराच्या बाह्य अंगावरील व अंतरंगातील काही शिल्पांची मी माझ्या माहिती नुसार वर्णने केली आहेत. वर्णन करताना कुठे चूक झाली असल्यास आणि जाणकारांनी ती चूक निदर्शनास आणून दिल्यास ज्ञानात भर पडून आनंदच होईल.)
- रोहन गाडेकर
सिन्नर चे गोंदेश्वर मंदिर
नंदिमंडपा जवळ बाजूला उघड्यावर ठेवलेले हे शिवलिंग आपल्याला दिसते.
देवकोष्टकामध्ये असणारी ललित आसनातील गणेश मूर्ती.
मूख्य शिव मंदिराच्या उपदिशेला असणाऱ्या चार मंदिरामधील एका मंदिरामध्ये असणारी ललित आसनातील गणेश मूर्ती.
तिसऱ्या उप मंदिरातील महिषासुर मर्दिनी (देवी पार्वती)
चतुर्भुज, त्रिमुखी आणि पायाशी हंस असलेलं देवी सरस्वतीचे हे शिल्प मंदिराच्या परिक्रमा मार्गावर नजरेस पडते.
दुसऱ्या उप मंदिरातील सूर्य नारायण मूर्ती.
देवकोष्ठात चामुंडेचे शिल्प दिसते. भयप्रद चेहरा, तोंडातून बाहेर आलेल्या, हाडांचा सापळा, लोंबलेले स्तन, पोटात विंचू, प्रेतवाहना अशी ती सहज ओळखू येत असते. ही चामुंडा शीळ देखील वाजवती आहे
नंदीमंडपाच्या मागील बाजूस वामन भिंतीवर विष्णूचे वराह अवतार व नरसिंह अवतार आपल्याला दिसतात.
आपल्या डाव्या हातात ऊस व उजव्या हातात बाण असलेली ही रती.
आपल्या लहानग्या बाळाला हातांवर तोलत ही त्याचे कौतुक करणारी ही पुत्रवल्लभा.
आपल्या सेवकाच्या पाठीवर पाय ठेवून स्वतःची केशरचना करणारी ही कर्पूरमंजिरी.
नंदिमंडपातील अलंकीकृत नंदी.
मुख मंडपाच्या वामन भिंतीवर वरील पट्टीत रामायणातील प्रसंग कोरलेले आहे. तर खालील पट्टीत सुरसुंदरी आहेत. त्यात कोणी पुत्रवल्लभा, दर्पणा, शुकसारीका तर कोणी मर्कट लीलांनी त्रस्त झालेली अभिसारीका
पायात रुतलेला काटा आपल्या सेवका करवी उपटून काधते आहे अशी ही शुभगामिनी.
मुख्य प्रवेशद्वारा शेजारी, मुखमंडपाच्या स्तंभावर बाहेरील बाजूस असणारे हे भयप्रद व्याल, व्यालाने आपल्या पायात हत्ती पकडून ठेवला आहे.
मूख्य गर्भागृहाच्या द्वारशाखेवरती शैव द्वारपाल, द्वारपालीका व मकरारूढ गंगा व कुर्मारूढ यमुना आपल्याला दिसतात.
मूख्य गर्भागृहाच्या द्वारशाखेवरील व्याल व नर शाखा.
सतत आरशात पाहणारी ही दर्पणा.
सभमंडपाच्या स्तंभावर हे मैथुनशिल्प आहे. यात असा उघडा शृंगार चाललेला पाहून एका सेविकेने चक्क पाठ फिरवलीय तर दुसर्या सेविकेने लाजून आपले डोळेच झाकून घेतलेले आहेत.
सभामंडपातील वितान फुलांच्या नक्षीने अलंकृत आहे.
सभामंडपातील स्तंभांवरती कीर्तीमुख आहे.
हि विषकन्या असावी. तिच्या एका हाती सर्प तर दुसर्या हाती मुंगूस असून ती दोघांनाही भिडवतेय. जणू तुम्हा दोघांवरही माझेच वर्चस्व आहे असेच ती जाणवून देतेय.
ही अजून एक पुत्रवल्लभा.
मंदिराच्या गर्भगृहातील देवतेच्या पूजेचे व अभिषेकाचे पाणी गर्भगृहातून एका वारी मार्गाद्वारे मंदिराच्या बाहेर पडते. त्या वारी मार्गाच्या बाहेर अशी मकर मुखाची रचना केली आहे.
No comments:
Post a Comment