Friday, 11 December 2020

सख्खे चारही भाऊ बहीण आयएएस & आयपीएस.

देशातील एकमेव उदाहरण असावे हे ...सख्खे चारही भाऊ बहिण IAS व IPS

जिथे घरातला एक मुलगा किंवा मुलगी आय पी एस बनण्यासाठी त्यांचे आई वडील आणि पूर्ण फॅमिली धडपडत असते, तरी कित्तेक लोकांना यश मिळत नाही ..बरेच लोक अपयशासाठी आपल्या नशिबाला आपल्या परिस्थितीला जबाबदार ठरवतात . काही पूर्ण सिस्टिम लाच दोष देतात .आणि हि फॅमिली बघा ज्या घरातील ( २ खोल्यांच्या घरात राहुन 4 भाऊ बहीण बनले IAS - IPS अधिकारी  )

प्रतापगढ जिल्ह्यातील लालगंज तालुक्यातील हि गोष्ट आहे.अनिल मिश्रा यांच्या परिवाराची. त्यांची फक्त एकच इच्छा होती मुलांनी मोठं होऊन घराच नाव मोठे कराव. झाले सुध्दा तसेच त्याच्या चारही मुलांनी देशातील सर्वात मोठी परीक्षा उत्तीर्ण केली. 

चार भावा बहिणीमध्ये योगेश मिश्रा IAS आहेत. सध्या त्यांची पोस्टिंग कलकत्ता येथे CEO म्हणून आहे. दोन नंबर आहे बहिण क्षमा मिश्रा जी IPS आहे सध्या ती कर्नाटकमध्ये पोस्टिंग वर आहे. तीन नंबर आहे माधवी मिश्रा ती झारखंड कॅडर IAS आहे. सध्या ती प्रतिनियुक्तीवर दिल्ली येथे आहे. आणि चार नंबरला आहे लोकेश मिश्रा जो IAS आहे. सध्या तो बिहार मध्ये चंपारन जिल्ह्यात ट्रेनिंगला आहे.

भाऊ व बहिणीस प्रेरणा द्यायला पहिले स्वतः झाला IAS...सगळ्यात मोठा भाऊ योगेश सांगतो कि, IAS होण्याअगोदर तो नोयडा येथे सॉफ्टवेयर इंजीनियर होता. त्यावेळेस क्षमा आणि माधवी UPSC ची तयारी करत होत्या. रक्षाबंधन दिवशी परीक्षेचा निकाल लागला आणि पहिल्या प्रयत्नात त्या अयशस्वी झाल्या. दुसऱ्या दिवशी योगेश त्यांना भेटायला गेला आणि त्यांचा आत्मविश्वास वाढविला आणि स्वतः ठरविले कि IAS व्हायचे ज्यामुळे लहान भावा बहिणींना प्रेरणा मिळेल आणि केली तयारी सुरु पहिल्या प्रयत्नात IAS झालाही त्यानंतर त्याने भावा बहिणींना मार्गदर्शन केले.

दोन खोल्याचे घर, पाहुणे आल्यास राहायची पंचायत...!
माधवी सांगते कि, चार भावा बहिणीत वयाचा जास्त फरक नाही आहे. एका एका वर्षाने सगळे लहान मोठे आहे. जेव्हा जेव्हा लहानपणी भांडणे व्हायची तेव्हा चौघामधील एकजण भांडण मिटवायचे काम करत असे. क्षमा सांगते कि घर फार छोटे होते, पाहुणे आल्यास खूप परेशानी होत असे आणि अभ्यास करताना हि एकमेकांना त्रास होत असे.

योगेश सांगतो कि, आमचे बारावी पर्यंतचे शिक्षण पैतृक येथे पूर्ण झाले हे गाव एक छोटस खेडं आहे. त्यानंतर पुढील शिक्षणा करीता मोतीलाल नेहरू राष्ट्रीय प्राद्योगिक संस्थान येथे BTech करायला पुढील शिक्षण अलाहबाद येथे घेतले. तिथेच इंजिनियरची नौकरी सुध्दा लागली.

2013 साली IAS झालेली क्षमा सांगते, कि MA पर्यंतचे तिचे सर्व शिक्षण तालुक्याला झाले. 2006 साली तिचे लग्न सुधीर सोबत झाले. सुधीर उत्तराखंड मध्ये अधिकारी आहे. त्यांनी पुढील शिक्षण घेण्याकरिता मला प्रेरणा दिली. सुरवातीला क्षमाची निवड 2015 मध्ये DYSP साठी झाले होते. परंतु पुढील वर्षीच ती IPS झाली.

माधवी सांगते कि तिचेही पदवी पर्यंतचे शिक्षण तालुक्यावर झाले. त्यानंतर तिने अर्थशास्त्रात पीजी तिने अलाहबाद विद्यापीठातून केले. येथील शिक्षण पूर्ण झाल्यानतर PhD करिता जेएनयु दिल्ली येथे संशोधन सुरु असताना 2016 साली तिची IAS म्हणून निवड झाली.

सगळ्यात लहान भाऊ लोकेशने दिल्ली विद्यापीठातून केमिकल इंजिनियरची पदवी मिळविल्या नंतर कोटा राजस्थान येथे एका खताच्या कंपनीत नौकरी केली. त्यानंतर तो राज्यसेवेत BDO झाला आणि 2016 साली #UPSC पास करून IAS झाला. 

धन्य ते आई वडील ज्यांनी ह्या रत्नांना मोठे केले...🙏

No comments:

Post a Comment

Vintage photo 1909

  Boys begging on the streets of Nashik, 1909.