सध्या मिझोरममधील एक गोंडस मुलगी इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरली आहे. सर्वसामान्य भारतीयांपासून ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सर्वच जण या मुलीच्या प्रेमात पडल्याचे चित्र सध्या इंटरनेटवर दिसत आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील आघाडीचे नाव असणाऱ्या ए. आर. रेहमान यांनाही या मुलीचे तोंड भरुन कौतुक केलं आहे. ही चिमुकली अवघ्या चार वर्षांची असून तिचं नाव आहे एस्तर हेंमटे असं आहे.
एस्तरचं वय लहान असलं तरी तिच्या युट्यूब चॅनलेच्या सबस्क्रायबर्सची संख्या पाहून ही मुलगी म्हणजे मुर्ती लहान पण किर्ती महान अशी आहे हे तुम्हाला लगेच समजेल. एस्तरच्या युट्यूब चॅनेलवर तब्बल एक लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स असून दिवसोंदिवस ही संख्या वाढत आहे. बरं आता एस्तर चर्चेत असण्यामागील कारण म्हणजे तिने गायलेलं वंदे मातरम् हे गाणं. या गाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक बड्या व्यक्तींनी अगदी गोंडस पद्धतीने हे गाणं गाणाऱ्या एस्तरचं कौतुक केलं आहे. मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वात आधी एस्तरचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये भारताचा राष्ट्रध्वज हातात पकडून ही चार वर्षांची एस्तर गाणं गाताना दिसत आहे.
वंदे मातरम हे मूळ गाणं सादर करणारा गायक, संगितकार आणि गितकार ए. आर रेहमाननेही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे. हे सादरीकरण म्हणजे प्रेम आणि गोंडसपणाचे उत्तम उदाहरण आहे असं रेहमानने म्हटलं आहे.
या सेलिब्रिटींबरोबरच हजारो भारतीयांनी ट्विटर आणि सोशल नेटवर्किंगवरुन हा व्हिडिओ शेअर केला असून त्याला लाखोंच्या संख्येने व्ह्यूज आहेत.
No comments:
Post a Comment