नाशिक : येथील युवा सायकलिस्ट ओम महाजन याने काश्मीर ते कन्याकुमारी हे तब्बल 3900 किलोमीटरचे अंतर 8 दिवस, 7 तास, 38मिनिटांत यशस्वीरित्या पार करून गिनीज बुकमध्ये विक्रमाची नोंद केली आहे. वयाच्या 17 व्या वर्षी ओम याने हा अद्भूत पराक्रम केल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
श्रीनगर,दिल्ली, झांशी, नागपूर, हैदराबाद, बंगळूरू, मदुराई, कन्याकुमारी असा ओम याच्या राईडचा मार्ग होता. या राईडच्या सपोर्ट टीममध्ये डॉ. महेंद्र महाजन, डॉ. नितीन रौंदळ, मिलिंद वाळेकर, अंजना महाजन, डॉ. हितेंद्र महाजन, कबीर राचुरे, सागर बोंदार्डे, पूर्वांश लखानी, बलभीम कांबळे, राहूल भांड, नेहा पाटील आदी कार्यरत होते. राष्ट्रीय सायकलपटू असलेल्या ओम याने आजवर महाराष्ट्र स्तरावरील अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. आपले वडील व काका आपले सायकलिंग क्षेत्रातील प्रेरणास्त्रोत असल्याचे तो अभिमानाने सांगत असतो. दरम्याना ओम महाजन याच्या कामगिरीने नाशिकच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे.
No comments:
Post a Comment