Thursday, 22 October 2020

कमळांचे “फुलपगार

कमळांचे “फुलपगार”

निसर्गाचे अनेक अद्भुत अविष्कार आपल्याला सभोवताली पाहायला मिळतात. यातीलच एक अप्रतिम अविष्कार म्हणजे “फुलपगार” येथील कमळ तलाव. 

नाशिक जिल्ह्यात अशी काही ठिकाणे आहेत की त्यांचे फोटो समोर आले की आपल्याला ती नाशिकची वाटतच नाहीत. असेच काही फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. कमळाच्या फुलांनी बहरलेले तळे आणि सभोवतालचा अदभूत निसर्ग.  हे फोटो आहेत बागलाण तालुक्यातील नामपूर जवळील इजमाने येथील. 

बागलाण तालुक्यातील नामपूर या गावापासून साधारण सहा किमी अंतरावर असणाऱ्या इजमाने गावालगत आहे हे फुलपगार. या कमळ तलावास साधारण 1100 वर्षांचा इतिहास असावा असे सांगितले जाते. या ठिकाणी वीज पडून जमिनीतून एक झरा उत्पन्न झाला व त्यापासूनच हा तलाव नैसर्गिकरित्या तयार झाल्याचे देखील सांगितले जाते. तलावाची खोली साधारण 8 फुट आहे. येथे गुलाबी, पांढरे, पिवळे तसेच जांभळ्या रंगाची कमळाची फुले नजरेस पडतात. या ठिकाणी असणारी कमळाची फुल ही चमत्कारिक असावेत असेच वाटते. उन्हाळ्यात हा तलाव पूर्णपणे कोरडा होतो. स्थानिकांनी सांगितल्यानुसार मध्यंतरी काही वर्षांपूर्वी उन्हाळ्यात या ठिकाणचा गाळ देखील काढण्यात आला होता, मात्र तरीही पुन्हा पावसाळ्यात तलावात पाणी आल्यानंतर तलाव कमळांच्या फुलांनी जैसे-थे बहरला होता.  

साधारणपणे ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत या तलावातील कमळाची फुले अतिशय बहरलेली असतात.
अतिशय सुंदर व मनमोहक असा हा परिसर असून या ठिकाणी एकदा आवर्जून भेट द्या.


No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....