Thursday, 8 April 2021

नाशिकरोड रेल्वेस्टेशन जुने छायाचित्र.

 #नाशिकरोड रेल्वेस्टेशन चे विसाव्या शतकाच्या प्रारंभी काढलेले एक #जुने #छायाचित्र.


#Vintage #photograph of Nashikroad Railway Station taken in early twentieth century.



आद्य क्रांतीवीर मंगल पांडे पुण्यतिथी

आज ८ एप्रिल
आद्य क्रांतीवीर मंगल पांडे पुण्यतिथी.

१८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यात क्रांतीची ज्वाला निर्माण करून ब्रिटीश सत्तेला हादरवून सोडणारे अमर शहीद मंगल पांडे यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या या हौतात्म्याने देशात क्रांतीचे बीज पेरले. मंगल पांडे एक असे योध्दा होते ज्यांनी आपल्या निर्भयी व्यक्तिमत्वाच्या जोरावर भारतीयांना आपल्या शक्तीची जाणीव करून दिली. या वीरास विनम्र अभिवादन !
ज्या वेळी १८४९ साली, त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात नोकरीस सुरुवात केली, त्यावेळी ते २२ वर्षाचे होते. पांडे हे बराकपूर सैन्यदलामधील बंगालच्या ३४ व्या बी. एन. आय तुकडीच्या ५ व्या कंपनीत काम करत होते. कोलकात्याजवळील बराकपूर येथील १९ व्या पलटणीला दिलेली काडतुसे गाय वा डुक्कर यांची चरबी लावलेली आहेत असा समज सैन्यात पसरला होता. ही काडतुसे बंदुकीत भरण्यापूर्वी त्यांना लावलेले आवरण दातांनी तोडावे लागे. अशा वेळी या आवरणाला लावलेली गाईची वा डुकराची चरबी तोंडात जाऊ शकेल या भीतीने या पलटणीतील शिपायांनी ती काडतुसे स्वीकारण्याचे नाकारले. इतकेच नव्हे, तर प्रतिकारार्थ त्यांनी शस्त्र उपसले. त्या दिवशी ब्रिटिश अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने ब्रिटिशांनी तो अपमान मुकाट्याने गिळला. त्यांनी ब्रह्मदेश (म्यानमार)हून गोर्‍या सैनिकांची कुमक मागवून या पलटणीला निःशस्त्र करून अपमानित अवस्थेत हाकलून द्यायचे ठरवले. याची अंमलबजावणी बराकपूरला करण्याचे ठरले. या अपमानास्पद कारवाईमुळे मंगल पांडेने आपल्या सहकाऱ्यांना ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन केले.
३१ मे रोजी एकदम सर्वत्र क्रांतियुद्धाला प्रारंभ करण्याची श्रीमंत नानासाहेब पेशवे आदींची योजना होती. मात्र १९ व्या पलटणीतील स्वदेशबंधूंचा आपल्यादेखत अपमान व्हावा, ही गोष्ट मंगल पांडे यांना आवडली नाही. मार्च २९, १८५७ रोजी कवायतीच्या मैदानावर मंगल पांडे बराकपूर छावणीत ब्रिटिश करत असलेल्या अन्यायाविरुद्ध देशी सैनिकांना उत्तेजित करू लागले. "मर्दहो, उठा !" अशी गर्जना करून ते सैनिकांना म्हणाले, "आता माघार घेऊ नका. बंधूंनो, चला तुटून पडा ! तुम्हाला तुमच्या धर्माची शपथ आहे !! चला, आपल्या स्वातंत्र्यासाठी शत्रूचा निःपात करा!!!"
हे पहाताच सार्जंट मेजर ह्यूसन याने त्यांना पकडण्याची आज्ञा केली; पण एकही सैनिक जागचा हालला नाही. उलट मंगल पांडे यांची गोळी लागून ह्यूसन जखमी झाला. हे पहाताच लेफ्टनंट बॉ घोडा नाचवत मंगलवर चाल करून आला. एवढ्यात मंगलच्या बंदुकीतून सुटलेली गोळी घोड्याच्या पोटात शिरली. घोडा लेफ्टनंटसह भूमीवर आडवा झाला. मंगल पांडे यांना पुन्हा बंदुकीत गोळया भरायचा अवसर मिळण्याआधीच लेफ्टनंट बॉ आपले पिस्तुल काढून उभा राहिला. मंगल पांडे यांनी तिळमात्रही न डगमगता आपली तलवार उपसली. बॉने पिस्तुल झाडले; पण मंगल पांडे यांनी त्याचा नेम चुकवला. आपल्या तलवारीने मंगल पांडे यांनी त्यालाही लोळवले. ह्यूसन व बॉ आपल्या निवासस्थानांकडे पळून गेले.
एवढ्यात शेख पालटू नावाचा मुसलमान शिपाई मंगलच्या दिशेने जाऊ लागला. तो आपल्या पलटणीतील असल्यामुळे आपल्याला मदत करायला येत असावा, असे मंगल पांडे यांना वाटले; पण तसे घडले नाही. शेख पालटूने मंगल पांडे यांना पाठीमागून विळखा घातला. पांडे यांनी त्याचा विळखा सोडवला. देशी शिपाईही शेखच्या रोखाने दगड व जोडे फेकू लागले. जिवाच्या भीतीने शेख पालटू पळून गेला. थोड्याच वेळात कर्नल व्हीलर त्या स्थानी आला. त्याने सैनिकांना मंगल पांडे यांना पकडण्याची आज्ञा केली. कर्नल व्हीलरला सैनिकांनी निक्षून सांगितले, ``आम्ही या पवित्र ब्राह्मणाच्या केसालासुद्धा हात लावणार नाही. हिंदुस्थानच्या भूमीवरून वाहाणारे गोर्‍या अधिकाऱ्यांचे रक्‍त आणि समोरचे धर्माभिमानी शिपाई पाहून कर्नल व्हीलर त्याच्या बंगल्याकडे पळून गेला. नंतर जनरल हिअर्स पुष्कळसे युरोपियन शिपाई घेऊन मंगल पांडे यांच्यावर चालून गेला. तोपर्यंत दुपार झाली होती. मंगल पांडे थकले होते. आपण फिरंग्यांच्या हातात सापडणार, हे पहाताच त्यांनी बंदूक आपल्या छातीकडे रोखली व स्वतःवर गोळी झाडून घेतली. मंगल पांडे धरणीवर कोसळले आणि त्यांची शुद्ध हरपली. नंतरच ब्रिटिश त्यांना पकडू शकले. [ संदर्भ हवा ] आठवडाभरातच त्यांच्यावर सैनिकी न्यायालयात अभियोग चालवण्यात आला. स्वधर्मावर प्राणापलीकडे निष्ठा ठेवणार्‍या या तरण्याबांड क्षात्रवीराला न्यायालयाने कटामध्ये सामील असलेल्यांची नावे विचारली; परंतु मंगल पांडे यांच्या मुखातून कोणाचेही नाव बाहेर पडले नाही. पांडे यांना सैनिक न्यायालयात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आपल्या देशबांधवांच्या अपमानासाठी स्वतःचे प्राण देणार्‍या या क्रांतीच्या अग्रदूताविषयी लोकांत इतकी विलक्षण श्रद्धा निर्माण झाली होती की, सार्‍या बराकपूरमध्ये त्यांना फाशी देण्यास एकही मांग मिळेना. शेवटी या घाणेरड्या कामासाठी कोलकात्याहून चार माणसे मागवण्यात आली. मंगल पांडे ज्या तुकडीचे सैनिक होते, तिच्या सुभेदाराला इंग्रजांनी ठार मारले. १९ आणि ३४ या दोन्ही पलटणी त्यांनी निःशस्त्र करून खालसा केल्या. याचा परिणाम उलटाच झाला. शिपायांना धाक वाटण्याऐवजी शेकडो शिपायांनी आपणहून गुलामीचे चिन्ह असलेले त्यांचे सैनिकी गणवेश फाडून टाकले.
हा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो. त्यांच्या नावाचा प्रभाव एवढा विलक्षण होता की, या क्रांतियुद्धातील सर्व सैनिकांना इंग्रज `पांडे' याच नावाने संबोधू लागले.



हुतात्मा मंगल पांडे यांचे मेरठ येथे उभारण्यात आलेले स्मारक


भारताचे एडिसन - डॉ. शंकर आबाजी भिसे

 भारताचे एडिसन - डॉ. शंकर आबाजी भिसे ♦️

🔹२००च्यावर निरनिराळे शोध लावणारे, ४०हून अधिक शोधांचे पेटंट घेणारे आणि शतकापूर्वी भारतीयांच्या नावानं नाक मुरडणाऱ्या, तिरस्कार व्यक्त करणार्या अमेरिकन लोकांमध्येच मानाचं स्थान मिळवणारे #डॉ_शंकर_आबाजी_भिसे !

🔹साधारण १८९७मध्ये ‘इन्व्हेन्टर रिव्ह्यू अँड सायंटिफिक रेकॉर्ड’ या मासिकाने ‘स्वयंमापन यंत्र’ करण्याची एक स्पर्धा जाहीर केली होती. #स्वयंमापन_यंत्र म्हणजे साखर, पीठ इत्यादी वस्तूंचे गिऱ्हाईकाला हवं तेवढं वजन करून देणारं यंत्र. शंकररावांनी अशा यंत्राचा आराखडा करून पाठवला. त्यावेळी शंकररावांच्या त्या यंत्राला प्रथम क्रमांक मिळाला. तयार केलेले हे यंत्र त्यांनी त्या वाण्याला आवर्जून दाखवले. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा टर्निंग पॉईंट ठरला.

🔹छपाईतंत्राचा शोध चीनमध्ये चार शतकांपुर्वी लागला असला, तरी छपाईसाठी लागणार्या अक्षरांचे खिळे पाडणारी आणि त्यांची जुळणी करणारी यंत्रं दीडशे वर्षांपुर्वीपर्यंतही फारच संथगतीने काम करीत असत. एका मिनीटाला फक्त १५० अक्षरांची जुळणी व्हायची. जगामधील अनेक #वैज्ञानिक व #संशोधन क्षेत्रांमध्ये नाव कमावलेल्या संस्थांनी या यंत्राच्या आधुनिकीकरणासाठी जातीने प्रयत्न केले पण मनाजोगते यश कुणालाही मिळत नव्हते. शेवटी मराठमोळ्या अशा #शंकर_भिसे यांनी आपले सारे लक्ष, शक्ती व जगावेगळी घडण असलेले त्यांचे तल्लख व चपळ डोके या संशोधनकार्यासाठी पणाला लावले. काही वर्षांतच त्यांनी मिनीटाला १२०० अक्षरांची जुळणी सहजगत्या करू शकणार #छपाईयंत्र बनवण्याची किमया केली. हेच ते प्रसिद्ध असे १२०० अक्षरं छापणारं ‘गुणित मातृका’ यंत्र…  हे यंत्र भिसेनी तयार केलं आणि १९१६ मध्ये ते विक्रीला आणलं. हे यंत्र गतिमानतेबरोबरच गुणवत्ता व अचुकता यांचा सुवर्णमध्य गाठणारं असल्यामुळेच त्याची दखल परदेशातही घेतली गेली.

🔹१९१०मध्ये ते आजारी असताना त्यांच्यावर करण्यात आलेल्या औषधी उपचारातलं एक भारतीय औषध फार गुणकारी ठरलं. या औषधाचं रासायनिक पृथ:करण त्यांनी करवून घेतलं आणि त्याचा गुणकारीपणा आयोडिनामुळे आहे, हे जाणलं. १९१४साली भिसेंनी स्वत:च एक नवीन औषध तयार करून त्याला ‘#बेसलीन’ हे नाव दिले. हे औषध बाह्योपचारासाठी उपयुक्त ठरलं. पहिल्या महायुद्धात या औषधाचा अमेरिकन लष्कराने मोठय़ा प्रमाणावर वापर केला. 

🔹समुद्राच्या तळाशी भरपूर प्रकाश देणारा दिवा, वातावरणातले विविध वायू वेगळे करणारं यंत्र, जाहिराती दाखविणारं यंत्र, स्वयंचलित मालवाहक, स्वयंचलित वजन वितरण आणि नोंदणी करणारं यंत्र, एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी विजेच्या सहाय्याने छायाचित्रे पाठविणारं यंत्र अशा अनेक यंत्रांचे शोध त्यांनी लावले. १९२७ मध्ये न्यूयॉर्क विद्यापीठाने त्यांना डी. एस. सी. ही पदवी दिली. भिसे यांनी विद्युत शास्त्रातही बरंच प्रयोगात्मक संशोधन केलं. त्यांनी तयार केलेल्या ‘स्वयंचलित आगामी स्थानदर्शक’ यंत्रामुळे प्रवाशांना पुढच्या स्टेशनचे नाव आपोआप कळणार होतं. पण एका भारतीयाने शोध लावल्याने ब्रिटिश रेल्वे कंपनीने हे यंत्र वापरायला नकार दिला. 

🔹डब्यात लोंबकळणारे प्रवासी खाली पडतात व मरतात. त्यामुळे स्वयंचलित दरवाजे लावण्याची घोषणा #रेल्वे मंत्र्यांनी केली, पण आगगाडीच्या स्वयंचलित दरवाजाचा शोध डॉ. भिसे यांनी १८९८ मध्ये लावला होता. त्या काळात आजच्यासारखी गर्दी नव्हती, पण पुण्याहून मुंबईस येत असताना कल्याण स्टेशनवर उतरताना एका प्रवाशाची बोटे दरवाजात चिरडली. त्यामुळे रेल्वेवर टीका झाली. अशाप्रकारचा अपघात टळावा म्हणून डॉ. भिसे यांनी असा शोध लावला की, प्रवाशाने गाडीच्या दरवाजात मुद्दाम बोट घातले वा कोणी निष्काळजीपणे दरवाजा लावला तरीही प्रवाशास इजा होणार नाही. या शोधाचे पेटंट भिसे यांनी घेतले नाही.

🔹#सौर ऊर्जेवर चालणार्या मोटारीचा शोध १९१८ सालीच लावून ते मोकळे झाले. त्यामुळे सध्या चर्चेत असलेल्या सौरऊर्जेवर चालू शकतील अशा मोटारी तयार करण्याची मूळ कल्पना डॉ. शंकर आबाजी भिसे यांचीच आहे, हे आपण प्रत्येक भारतीयाने आवर्जून लक्षात ठेवायला हवे. डॉ. भिसे यांनी ‘टिंगी’नावाच्या अजब अशा छोट्या यंत्राचा शोध लावला. टिंगीमुळे अंगरख्याची परीटघडी न बिघडवता बटणे बसविता येत असत. बॉडी मसाजरचा शोध त्यांनी त्या काळात लावला. डोके दुखू लागल्यास शिरा चेपणारे हे यंत्र होते. त्यांनी ‘चटण्या’ वगैरे वाटणारे ‘मिक्सर’ बनवले. 

🔹 २९ एप्रिल १९२७ या दिवशी- भिसे यांच्या ६० व्या वाढदिवशी अमेरिकन वैज्ञानिकांच्या उपस्थितीत ‘अमेरिकेतील भारताचे पहिले शास्त्रज्ञ’ म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला. खरं तर  १९०८ सालीच युरोपीय व अमेरिकन नियतकालिकांनी भिसे यांना ‘#इंडियन_एडिसन’ हे बिरुद बहाल केलं होतं. 

🔹जागतिक दर्जाच्या ‘हु इज हु’ या संदर्भग्रंथात ‘भारताचे एडिसन’ असे म्हणून त्यांना गौरवण्यात आलं. त्यावेळी २३ डिसेंबर १९३० रोजी भिसे यांनी आपले आदर्श असलेल्या थॉमस अल्वा एडिसन यांची त्यांच्या प्रयोगशाळेत भेट घेतली. अमेरिकेतल्या ‘#हूज_हू’मध्ये समावेश झालेले भिसे हे पहिलेच भारतीय. इतकंच नाही तर त्यांच्या टाइप कास्टिंगच्या शोधाचा अमेरिकेच्या पाठ्यपुस्तकात समावेश करण्यात आला. शिकागो विद्यापीठाने त्यांना सायको-अ‍ॅनालिसिसमधील #डॉक्टरेट बहाल केली, तर माऊंट व्हेरनॉनच्या चेंबर ऑफ कॉमर्सने भिसे यांना मानद सदस्यत्व दिले.

🔹विज्ञान व संशोधनातले नोबेल प्राईज मिळावे, अशा तोडीचा हा माणूस होता. तो महाराष्ट्रात जन्माला आला. देशभरात गाजला. 

हृदयपूर्वक अभिवादन व आदरांजली !!

🌹🌹🌹🌻🌻🌻🌹🌹🌹

(संकलित लेख)








Wednesday, 7 April 2021

पंचवटी परिसराचे जुने छायाचित्र

 नाशिक पंचवटी परिसराचे सन १९१० मध्ये घेतलेले जुने  छायाचित्र. या छायाचित्रात (तत्कालीन व्हिक्टोरीया ब्रिज)सध्याच्या  अहिल्याबाई होळकर पुलाच्या वर सुंदरनारायण मंदिर दिसत आहे.




Tuesday, 6 April 2021

जागतिक आरोग्य दिन

आज ७ एप्रिल हा ‘जागतिक आरोग्य दिन’ 

आंतरराष्ट्रीय पातळीवर नागरिकांना भेडसावणा-या आरोग्य समस्या आणि त्यावर विचारमंथन करण्यासाठी ७ एप्रिल १९४८ रोजी जागतिक आरोग्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यात मानवासमोर असणारी आरोग्य समस्या सर्व देशांनी एकत्रित येऊन सोडवावी यावर एकमत झाले. विभिन्न वंशांच्या समस्या वेगळ्या असं वाटत असलं तरी सारे मानव एक या न्यायाने आरोग्य समस्या आणि त्यावर उपाय हे साधारणपणे समान आहेत. त्यामुळे सर्व देशांतील नागरिकांना त्यांच्या चांगल्या आरोग्याविषयी जागरूक करण्याचा उद्देशाने ७ एप्रिल १९५० पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनाखाली जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यास सुरूवात झाली.

सध्या कोरोनाशी मुकाबला जगभरातील रुग्णालयात डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्यसेविका, नर्स आपला जीव धोक्यात घालून कोरोना बाधित रुग्णांची सेवा करत आहेत. जीवनात उत्तम आरोग्याचे महत्व किती आहे याची प्रचिती आपल्याला या कोरोनाच्या कालखंडात पदोपदी जाणवत आहे. आरोग्याच्या बाबतीत चांगल्या सवयी लावून घेणे ही काळाची गरज बनली आहे. ज्यामध्ये हात धुणे, सकस आहार, व्यायाम करणे, अशा बाबींचा प्राधान्यक्रम येतो. 

सध्या कोरोना सारख्या आजाराने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.ती घेत असताना वेळोवेळी हात धुत राहणे, कोणाशी बोलत असताना ठराविक अंतर ठेऊनच बोलणे, शिंकत असताना, खोकताना तोंडाला रुमाल लावणे. सर्दी, खोकला, ताप असेल तर तत्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधणे तसेच कसल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता शासकीय नियमावलीचे पालन करणे हा आपला दिनक्रम असायलाच हवा.   निरोगी राहून कुटुंब व समाजाची काळजी घेत खऱ्या अर्थाने जागतिक आरोग्य दिन साजरा करूयात.

सर्वांना जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा!

#worldhealthday  #जागतिक_आरोग्य_दिन  #worldhealthday2021





Monday, 5 April 2021

मोरांचा थवा.

 नाशिकच्या पांडव लेणी परिसरातील मुक्तपणे विहरत असलेला मोरांचा थवा.

dm for photo credit



Thursday, 1 April 2021

भाविकांना नम्र आवाहन

 भाविकांना नम्र आवाहन

श्री क्षेत्र सप्तशृंगगड व कळवण तालुक्याच्या परिसरात मोठ्या संख्येने कोविड-१९ संदर्भीय रुग्ण आढळून आल्यामुळे स्थानिक ग्राम पंचायत, सप्तशृंगगड यांनी जा क्र ०४/२०२१ नुसार जनता कर्फ्यु संदर्भात घेतलेल्या निर्णयाप्रमाणे श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड या विश्वस्त संस्थेने कोरोना संसर्ग टाळणे तसेच स्थानिक नागरिक व भाविक वर्गाच्या आरोग्य व जनसुरक्षेच्या हेतूने घेतलेल्या निर्णयानुसार श्री भगवती मंदिर दर्शन सुविधा ही गुरूवार दि. ०१/०४/२०२१ पासून सोमवार, दि. ०५/०४/२०२१ पावेतो संपूर्णतः बंद राहील. मात्र श्री भगवतीची दैनंदिन पंचामृत महापूजा व आरती निर्धारित वेळेत सातत्यपूर्वक सुरू असेल.
तरी भाविकांनी सदर नोंद घेवून विश्वस्त संस्थेसह जिल्हा प्रशासनाला योग्य ते सहकार्य देवू करावे. असे आवाहन विश्वस्त संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री सप्तशृंग निवासिनी देवी - श्री सप्तशृंगी मातेचे आज गुरुवार, दिनांक- ०१/०४/२०२१ रोजीचे दैनंदिन मुखदर्शन...





अष्टविनायक — महाराष्ट्राच्या मांगल्याची आठ द्वारे

महाराष्ट्राच्या मातीत गणेशभक्तीचा जो अखंड प्रवाह वाहतो, त्याचे सर्वात प्राचीन आणि पवित्र रूप म्हणजे अष्टविनायक यात्रा. पुणे, रायगड आणि नगर ज...