Tuesday, 6 April 2021

जागतिक आरोग्य दिन

आज ७ एप्रिल हा ‘जागतिक आरोग्य दिन’ 

आंतरराष्ट्रीय पातळीवर नागरिकांना भेडसावणा-या आरोग्य समस्या आणि त्यावर विचारमंथन करण्यासाठी ७ एप्रिल १९४८ रोजी जागतिक आरोग्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यात मानवासमोर असणारी आरोग्य समस्या सर्व देशांनी एकत्रित येऊन सोडवावी यावर एकमत झाले. विभिन्न वंशांच्या समस्या वेगळ्या असं वाटत असलं तरी सारे मानव एक या न्यायाने आरोग्य समस्या आणि त्यावर उपाय हे साधारणपणे समान आहेत. त्यामुळे सर्व देशांतील नागरिकांना त्यांच्या चांगल्या आरोग्याविषयी जागरूक करण्याचा उद्देशाने ७ एप्रिल १९५० पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनाखाली जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यास सुरूवात झाली.

सध्या कोरोनाशी मुकाबला जगभरातील रुग्णालयात डॉक्टर्स, परिचारिका, आरोग्यसेविका, नर्स आपला जीव धोक्यात घालून कोरोना बाधित रुग्णांची सेवा करत आहेत. जीवनात उत्तम आरोग्याचे महत्व किती आहे याची प्रचिती आपल्याला या कोरोनाच्या कालखंडात पदोपदी जाणवत आहे. आरोग्याच्या बाबतीत चांगल्या सवयी लावून घेणे ही काळाची गरज बनली आहे. ज्यामध्ये हात धुणे, सकस आहार, व्यायाम करणे, अशा बाबींचा प्राधान्यक्रम येतो. 

सध्या कोरोना सारख्या आजाराने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.ती घेत असताना वेळोवेळी हात धुत राहणे, कोणाशी बोलत असताना ठराविक अंतर ठेऊनच बोलणे, शिंकत असताना, खोकताना तोंडाला रुमाल लावणे. सर्दी, खोकला, ताप असेल तर तत्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधणे तसेच कसल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता शासकीय नियमावलीचे पालन करणे हा आपला दिनक्रम असायलाच हवा.   निरोगी राहून कुटुंब व समाजाची काळजी घेत खऱ्या अर्थाने जागतिक आरोग्य दिन साजरा करूयात.

सर्वांना जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा!

#worldhealthday  #जागतिक_आरोग्य_दिन  #worldhealthday2021





No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....