Monday, 11 January 2021

नारोशंकर मंदिराचा जुने छायाचित्र

नारोशंकर मंदिराचा ब्रिटिश फोटोग्राफर फ्रांसिस फ्रिथ यांनी इसवी सन  १८५० ते १८७० दरम्यान काढलेला फोटो 

Vintage Photo of Naroshankar temple taken by Francis Frith between 1850 to 1870.

Sunday, 10 January 2021

ब्रह्मगिरी चा कालभैरव

ब्रह्मगिरी वरील कातळात शिल्पांकित केलेली कालभैरवाची मूर्ती 

Picture credit : Amar Reddy

Friday, 8 January 2021

गौळाणे हनुमान

गौळाणेचा मिशीवाला हनुमान

नाशिकपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या गौळाणे या गावाला पौराणिक पार्श्वभूमी आहे. अंजनेरी पर्वतावर राहत असलेल्या हनुमानाने बालपणी सूर्याला पकडायला गेल्यानंतर जमिनीवर येताना गौळाणे या गावी पाय टेकवला. जेथे पाय टेकवला तेथे या मंदिराची स्थापना करण्यात आली आहे. 

हा एकमेव हनुमान असा आहे, की ज्याला भरदार मिशा आहेत. तसेच, सूर्याच्या जवळ गेल्याने त्याच्या अंगावरील पितांबर जळून गेले असून, तो दिगंबर अवस्थेत आहे. ही मूर्ती सात ते आठ फूट उंच असून, नवसाला पावणारा हनुमान म्हणून त्याची ख्याती आहे. राज्यात इतर कोठेही अशी मूर्ती नाही. लग्न झालेल्या स्त्रियांना या मंदिरात प्रवेश नाही.

सप्तश्रृंगगड

धुक्यात हरवलेला सप्तश्रृंगगड

Picture credit : @_rahulgupta21

Markandeya Fort (मार्कंड्या किल्ला)

 Markandeya Fort (मार्कंड्या किल्ला) II Drone Shots II

नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गडापासून सुरु होणार्या डोंगररांगेत अनेक किल्ले वसलेले आहेत. सप्तशृंगी गडासमोरच दिसणार्या डोंगरावर मार्कंड्या किल्ला आहे. सप्तशृंगीगड व रावळ्याजावळ्या गडांपासून खिंडीमुळे वेगळ्या झालेल्या डोंगरावर पूरातन काळी मार्कंडेय ऋषींचे वास्तव्य होते. त्यामुळे हा डोंगर व त्यावरील किल्ला मार्कंड्या या नावाने ओळखला जातो
शहाजाहानच्या काळात दक्षिणसुभा औरंगजेबाच्या ताब्यात होता. औरंगजेबाने अलिवर्दीखानाला नाशिक जिल्ह्यातील किल्ले जिकण्याचा हूकूम दिला. इ.स. १६३९ मध्ये अलिवर्दी खानाने वर उल्लेख केलेले सर्व किल्ले जिंकून घेतले. याबद्दलचा फारसीतील शिलालेख आपल्याला इंद्राई किल्ल्यावर पाहाता येतो.
वणी - दिंडोरीच्या लढाईनंतर नाशिक परिसरातील किल्ले शिवाजी महाराजांनी जिंकून घेतले. त्यात मार्कंड्याचा समावेश होता. महाराजांच्या निधनानंतर मुघलांनी हे किल्ले जिंकून घेतले.
मार्कंड्या व रवळ्या - जावळ्या किल्ल्याच्या मध्ये जी खिंड आहे, ती मुलनबारी या नावाने ओळखतात. या खिंडीतून मार्कंड्या गडावर चढताना पहिला टप्पा पार पडल्यावर आपण पठारावर येतो, ही गडाची माची आहे. माचीवरुन बालेकिल्ल्याकडे जाण्यासाठी असलेल्या वाटेवर दगडात कोरलेल्या; बांधलेल्या पायर्या दिसतात. या वाटेवरच डावीकडे एका कातळकड्या खाली कातळात कोरलेल्या दोन गुहा दिसतात. त्यांना "ध्यान गुंफा" म्हणतात. येथून वर चढताना उजव्या हाताला बुरुजाचे व डाव्या हाताला तटबंदीचे अवशेष दिसतात. हा पायर्यांचा टप्पा संपला की, समोरच सप्तशृंगी गड दिसतो. तो पाहून , डाव्या बाजूच्या कातळात खोदलेल्या वाटेने बालेकिल्ल्यावर जाता येते. येथे पहिल्या टप्प्यावर एका घुमटी खाली कोरलेले टाकं पाहाता येते. या टाक्याला "कमंडलू तीर्थ" म्हणतात. या टाक्यात पिण्याचे पाणी बारामाही असते. दुसर्या टप्प्यावर एका रांगेत खोदलेली तीन पाण्याची टाकी पाहायला मिळतात. त्यांच्या बाजूलाच एक सुकलेल टाक आहे. गडाच्या सर्वोच्च टोकावर मार्कंडेश्वराच मंदिर आहे. मंदिरात मार्कंडेय ऋषींची मूर्ती व शिवलींग आहे. गडाच्या या सर्वोच्च टोकावरुन सप्तशृंगी गड, रवळ्या जावळ्या, धोडप हे किल्ले दिसतात.
Credit : @Sameer Hajare





Thursday, 7 January 2021

पद्मावती माता

सोमेश्वर धबधब्याजवळ असलेल्या बालाजी मंदिराच्या आवारातील पद्मावती मातेची ही मनमोहक मूर्ती

Sunday, 3 January 2021

Vintage painting of Chandwad Fort

 जॉन जॉन्सन या ब्रिटीश चित्रकाराने सन १७९५ मध्ये काढलेले चांदवड किल्ल्याचे जलरंगातील चित्र


A watercolour painting of Chandwad Fort (Chandor fort, near Nashik) by John Johnson in 1795 AD

(Image courtsey : British Library)



सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण!

  सुमारे १४० वर्षांपूर्वीचे नाशिक… गोदावरीच्या काठावरचा एक जिवंत क्षण! सुमारे १८८० च्या आसपासचे हे दुर्मीळ छायाचित्र नाशिकच्या गोदावरी नदीका...