गौळाणेचा मिशीवाला हनुमान
नाशिकपासून १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या गौळाणे या गावाला पौराणिक पार्श्वभूमी आहे. अंजनेरी पर्वतावर राहत असलेल्या हनुमानाने बालपणी सूर्याला पकडायला गेल्यानंतर जमिनीवर येताना गौळाणे या गावी पाय टेकवला. जेथे पाय टेकवला तेथे या मंदिराची स्थापना करण्यात आली आहे.
हा एकमेव हनुमान असा आहे, की ज्याला भरदार मिशा आहेत. तसेच, सूर्याच्या जवळ गेल्याने त्याच्या अंगावरील पितांबर जळून गेले असून, तो दिगंबर अवस्थेत आहे. ही मूर्ती सात ते आठ फूट उंच असून, नवसाला पावणारा हनुमान म्हणून त्याची ख्याती आहे. राज्यात इतर कोठेही अशी मूर्ती नाही. लग्न झालेल्या स्त्रियांना या मंदिरात प्रवेश नाही.
No comments:
Post a Comment