।।श्री.एकमुखी दत्त मंदीर,नाशिक।।
हे मंदीर नाशिकच्या श्रीक्षेत्र गंगाघाटावर असुन सुमारे ३५०वर्षा पूर्वीचे आहे.
श्री.एकमुखी दत्त मंदिरातील महंत श्री. बर्वेंनी गोदातिरी एकमुखी दत्त मुर्तिची स्थापना केली होती.
प. पुज्य रघुनाथ भटजी महाराज हे भृगुऋषींचे विभूति रूप मानले जाते. निरंजन स्वामी कृत श्री रघुनाथ चरित्रात माघ वद्य १४ शके १९३९ (सन १८१७) रोजी समाधी घेतल्याचा उल्लेख आहे. म्हणजेच ती समाधी २०५ वर्षांची आहे. या वरुन हे मंदिर ३५० वर्षाचे असावे असा अंदाज आहे.
श्री दत्त उपासकां मधे नाशिकचे श्री एकमुखी दत्त मंदिर हे प्रति गाणगापुर मानले जाते, म्हणुन या मंदिरा मधे नाशिककरांची विशेष आस्था आहे.
।। श्री गुरूदेव दत्त ।।
No comments:
Post a Comment