उरलेल्या झेंडूच्या फुलांचे काय करायचे?
https://tinyurl.com/mr25ejes
मंडळी, काल दसरा अगदी जोरदार साजरा केला असणार. झेंडूची फुले जी काल अगदी १०० रुपये किलो दराने आणली ती आज आपण फेकून देणार,
हो न? मात्र आपण याचे खालीलप्रमाणे अनेक उपयोग करू शकतो.
१.काल तोरणासाठी आणि पूजेसाठी आणलेले झेंडू दोन दिवसात कचऱ्यात जातील, ही झेंडूची फुलं वाळवली तर रोप तयार करता येतील.
२. झेंडूची फुलं ही कडू वासाची असल्याने चुरडून कुंडीमध्ये टाकली तर कीटकांना परावृत्त करतात.
३.लिंबू ,संत्र सालींपासून जसे बायो एन्झाईम बनवतात तसेच झेंडूच्या फुलांपासून देखील बनवता येते. ते कीटकनाशक म्हणून वापरता येते.
( फुले ,गूळ आणि पाणी यांचे प्रमाण ३:१:१०)
४.फक्त झेंडूच्या फुलांचे कंपोस्ट देखील करू शकता. अशा प्रकारच्या कंपोस्टमध्ये फुलझाडे लावली तर कीटकनाशक घालायची गरजही कमी भासते.
५.झेंडू फुले वाळवून त्याचा प्राकृतिक रंग देखील बनवतात.
६. तोरणामध्ये लावलेली आंब्याची पाने काढून फेकून न देता ती मिक्सरमधून काढून किंवा बारीक चुरडून पाण्यामध्ये घालून तीन दिवस ठेवावी, आणि असे पाणी डायलॉग करून झाडांवर फवारल्यास मुंग्या कमी होतात.
७. झेंडूच्या फुलाच्या पाण्याने खोकला जातो. एका झेंडूच्या (पिवळा किंवा नारिंगी)पाकळ्या एक ग्लास पाण्यात रात्रभर ठेवून सकाळी गाळून घ्यावे . मोठ्यांसाठी अर्धी वाटी वाटी लहानासाठी ४-५चमचे दिवसातून तीन चार वेळा घेणे. सदर उपाय आयुर्वेदात निष्णात असलेल्या वैद्यांच्या सल्ल्याने करावा.
चला तर मग करून पाहूया!
No comments:
Post a Comment