महाराष्ट्राचे सांस्कृतिक अधिष्ठान असलेल्या संत संप्रदायाची शिकवण आणि मानवा-मानवांतील एकात्मतेची वीण घट्ट करणाऱ्या आषाढी एकादशीच्या सणाचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.
सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा,
मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा !!
वारीतला प्रत्येक जण विठ्ठलाच्या भेटीसाठी सलग २०-२२दिवस न थकता ऊन वारा पाऊस कशाचीही चिंता न करता देहभान विसरून चालत असतात.
जेव्हा विठ्ठलाचं दर्शन होईल तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच असतो एक वेगळीच ऊर्जा भेटलेली असते.
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवोनिया!
पंढरपूरच्या विठ्ठलाची थोरवी गावी, ऐकावी तेवढी थोडीच आहे. अशी हि सर्वांना वेड लावणारी विठूरायाची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. अनेक संतांनी तिचे वर्णन देहभान हरपून केलेले आहे. या आषाढी एकादशीच्या पवित्र व्रतानिमित्त आपणही या मूर्तीची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.
महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत झिरपलेल्या भक्तीरसाचा हा सांस्कृतिक वारसा आहे. तो असाच वृद्धिंगत होत राहो. आषाढी एकादशी निमित्त सर्वांना भक्तीमय शुभेच्छा!
#आषाढीएकादशी #AshadhiEkadashi
#vitthalrakhumai #pandharpur
No comments:
Post a Comment