Thursday, 13 January 2022

पानिपत... शौर्यदिन !!!

पानिपत... शौर्यदिन !!!

१४ जानेवारी १७६१ , पानिपतावर धारातीर्थी पडलेल्या मर्द मराठ्यांना मानाचा मुजरा.......!!!


कौरव - पांडव संगरतांडव द्वापारकाली होय अती !

तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानिपती !!


१४_जानेवारी याच दिवशी पानिपतमध्ये १ लाख मर्द मराठे भारताच्या रक्षणासाठी अब्दाली विरुद्ध कडवा संघर्ष करून धारातीर्थी पडले.. शत्रूनेही सलाम ठोकला मर्द मराठ्यांना . अब्दालीनेही लिहून ठेवले आहे, '  एवढ्या त्वेषाने जिद्दीने लढणारे मराठा शूरवीर मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिले.' 

- पानिपत म्हणजे मराठी सैन्याने दिल्लीच्या बादशहा बरोबर केलेला करार पाळायला आणि बाहेरून आलेला अब्दालीला धडा शिकवायला केलेला रणसंग्राम.

- पानिपत म्हणजे “ बचेंगे तो और भी लडेंगे “ अस उत्तर देणारा शूरवीर दत्ताजी शिंदे.

- पानिपत म्हणजे आपल इमान हाच आपला धर्म मानून अब्दालीच्या कौलाला झिडकारून मृत्यूला सामोरा जाणारा इब्राहिमखान गारदी.

- पानिपत म्हणजे कुंजपुरा जिंकल्यावर भाल्याच्या फाळावर कुतुबशहाच मुंडक लावून दत्ताजीच्या मृत्यूचा बदला घेणारा जनकोजी.

- पानिपत म्हणजे पोटात अन्नाचा कण नसताना अंगावर झालेल्या शेकडो जखमांची पर्वा न करता मराठा सैन्याला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणारे हजारो मावळे.

- पानिपतची लढाई जरी हरलेली असली तरी पुन्हा अब्दाली आणि कुणाचीही आक्रमण करायची हिंमत झाली नाही हेच या पराभवाच यश आहे. 


अखंड भारतावर परकिय आक्रमणांचा प्रवास अलेक्झांडर पासून होता.कुणीही यावं आणि दिवसाढवळ्या ह्या हिंदुस्थानच चक्रवर्ती सम्राट व्हाव.ग्रीक आले,हूण आले,कुशाण आले,इराणी आले,मोगल आले ,तुर्क आले,अफगाण ही आले.

पण,एक पानिपत घडलं..उभा महाराष्ट्र हौतात्म्याच्या वेदीवर उभा राहिला ...!! कळीकाळावर दात ओठ खाऊन धाऊन मराठे गेले आणि...परकिय आक्रमकांना खीळ बसली ती कायमचीच.

इतिहास चर्चा करतो ती पानिपत आम्ही गमावल्याची

पण आमचं वास्तव सांगतं. पानिपतात आम्ही आजचा भारत कमावला

पानिपतात आम्ही देवांना हेवा वाटेल असं हौतात्म्य कमावलं.

आणि हो...राष्ट्रानेही अनुसरावा असा महाराष्ट्रधर्म राखला....!!

जो पर्यन्त सुर्य चंद्र असतील ...जो पर्यंत महासागर आणि पर्वतांची शिखरे असतील...तो पर्यंत उत्तरेतल्या मागच्या पिढ्या पुढच्या पिढ्यांना सांगतील.

" दख्खन से मराठे आये थे...मौत के घोडे पर सवार होकर .. हिंदुस्थान कि शान मे उन्होनी अपनी जान समशेर पर रखी थी"

महाराष्ट्र म्हणून आपण समृद्ध आहोत .त्याचं सर्वात श्रीमंत कारण हे.


#शौर्यदिन #पानिपत #मराठे




 

No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....