Sunday, 9 January 2022

कुशावर्त तीर्थाचे शिल्पवैभव

 कुशावर्त तीर्थाचे शिल्पवैभव


त्र्यंबकेश्वर गावात स्थित असलेले कुशावर्त कुंड हे अत्यंत पवित्र मानले जाते. सिंहस्थ कुंभमेळ्याप्रसंगी साधुलोक या ठिकाणी शाही स्नान करतात.

अशा कुशावर्त तिर्थांची जन्मकथा अत्यंत रंजक आहे. असे म्हणतात की गोदावरी नदी ब्रह्मगिरी पर्वतावरुन वारंवार गायब व्हायची. गोदावरीचे पलायन थांबविण्यासाठी  गौतम ऋषींनी कुशाची मदत घेतली आणि गोदावरीला बांधले. दर्भाच्या कुशाने चौकोन रेखून गोदावरीला अडवले ते त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थ होय. तेव्हापासून या तलावामध्ये नेहमीच भरपूर पाणी असतं. हा तलाव स्वतः कुशावर्त तीर्थ म्हणून ओळखला जातो.


हे कुशावर्त कुंड श्रीमंत होळकर सरकारचे फडणीस, रावजी महादेव पारनेरकर यांनी इ. स. १७६८ मध्ये बांधले. कुशावर्ताभोवती उत्तर, पश्चिम आणि दक्षिण अशा तीन बाजूस ओवऱ्या बांधलेल्या आहेत. या ओवऱ्याच्या चारी कोपऱ्यांवर चार देवालयं आहेत. या तीर्थावर स्नान, दान, श्राद्धादिक करण्यासाठी हे अत्यंत पवित्र स्थान मानलं जातं. 

कुशावर्त तीर्थचा मंडप असंख्य अप्रतिम मूर्तीनी सजविलेला आहे. तोही आवर्जून पाहण्यासारखा आहे. 




















No comments:

Post a Comment

वैकुंठ चतुर्दशी हरिहरभेट

 #आज_वैकुंठ_चतुर्दशी #हरिहरभेट त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजे कार्तिक चतुर्दशी. ही 'वैकुंठ चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाते....