'बदाम' राजाला मिशी का नसते माहितेय?
पत्ते खेळणे हा अनेकांच्या आवडीचा छंद असतो. नातेवाईक-मित्र-मेत्रीणी एकत्र जमले की हटकून पत्ते ( Four Color Deck) खेळले जातात. लांबच्या प्रवासादरम्यान तर पत्ते खेळले की टाईमपास होतो. म्हणून सर्व वयोगटातल्या लोकांना पत्ते खेळणे आवडते.
पत्त्यांचा कॅट हा ५२ पानांचा असतो. त्यात एका रंगाचे १३ पत्ते असतात. त्यापैकी एक राजा असतो. असे चार रंगाचे चार राजे असतात. पण त्यातला एक राजा असा असतो की त्याला मिशी नसते. तुम्ही हे कधी नीट पाहिले आहे का? नसेल पाहिले तर बघाच. बदामच्या राज्याला मिशी नाहिये. त्यामागे हे कारण आहे.
हे आहे कारण : ५२ पत्त्यांच्या कॅटमध्ये चौकट, किल्वर, इस्पिक, बदाम ही चार चिन्ह आणि त्याच रंगाचे चार राजा असतात. असे सांगितले जाते की, जेव्हा पत्त्यांचा खेळ अस्तित्वात आला तेव्हा बदामच्या राजालाही मिशी होती. पण जेव्हा या पानांची पुनर्रचना करण्यात आली तेव्हा डिझायनर बदामच्या राजाची मिशी बनवायला विसरला. आश्चर्य म्हणजे चूक कळल्यानंतरही त्याने ती सुधारली नाही आणि मग या चारपैकी एक राजा मिशीशिवाय राहिला.
ही चूक न सुधारण्याचे एक कारण असेही मानले जाते की 'बदाम राजा' हा 'शार्लेमेन' या फ्रेंच राजा चे चित्र आहे, तो दिसायला सुंदर आणि प्रसिद्ध होता. त्यामुळे वेगळे दिसण्याच्या इच्छेने त्याने मिशा काढल्या. या राजावर एक हॉलिवूड चित्रपटही बनवण्यात आला आहे, त्यातही राजाला मिशी नव्हती.
पत्ते आणि राजांचे कनेक्शन : पत्त्यांमधले चार राजे इतिहासामधील काही महान राजांचे प्रतिनिधीत्व करतात. पहिला हुकुमाचा बादशहा हा प्राचीन काळातील इस्रायलचा राजा डेव्हिडचे, किल्वर या कार्डावर मॅसेडोनियाचा राजा अलेक्झांडर द ग्रेट आहे. तिसरा चौकट हा रोमन राजा सीझर ऑगस्टसचे तर चौथा बदाम हा फ्रान्सचा राजा शारलेमेन आहे, जो रोमन साम्राज्याचा पहिला राजा होता.
(दै. सकाळ )
No comments:
Post a Comment