नववर्षदिन १ जानेवारीलाच का साजरा केला जातो?
जानेवारी हे नाव ग्रेगरीयन वर्षातील पहिल्या महिन्यासाठी रोमन देवता जानुस (Janus) याच्यावरून ठेवण्यात आले.
जानुस ही देवता रोमन संस्कृतीमध्ये शुभारंभाची देवता मानली जाते. या देवतेला दोन शिरे कल्पिलेली आहेत. एक शिर वृद्धावस्थेतील म्हणजे मावळत्या वर्षाचे प्रतिक तर दुसरे शिर यौवनावस्थेतील म्हणजे येणा-या वर्षाचे प्रतिक मानले जाते.
नववर्षदिन हा जानेवारी महिन्याच्या प्रारंभी या देवतेच्या सन्मानार्थ साजरा केला जात असे.
ग्रेगरीयन नववर्ष २०२२ च्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. 💐💐💐
- ©️अशोक दारके
No comments:
Post a Comment