सरदार विंचूरकर जहागीरदार यांना अंदाजे ४०० वर्षांपुर्वी त्यांना ईनाम म्हणुन मिळालेल्या व नंतर त्यांची उपराजधानी असलेल्या आत्ताचे सायखेडा व पूर्वीचे शामराजक्षेत्र येथे सापडलेली श्रीलक्ष्मीनृसिंहाची अतिशय सुरेख मुर्ती.
मंदिर जरी ४०० वर्षांपुर्वी बांधलेले असेल पण मुर्ती ही यादवकालीन असून शाळीग्राम मध्ये अतिशय सुबक कोरीव काम केलेली आहे, त्यामुळे मुर्ती ही अंदाजे ८००-८५० वर्ष जुनी असावी असं जाणकार व अभ्यासक सांगतात. असे हें अतिशय प्राचीन, ऐतिहासिक व जागृत देवस्थान नाशिकपासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे..
सध्या विंचूरकर डायग्नोसीस चे मालक व विंचूरकरांचे वंशज डॉ. नारायण विंचूरकर व सायखेडकर ग्रामस्थ मिळुन या मंदिराचा जीर्णोद्धार करीत आहेत. पण असं जरी असलं तरी गरज आहे ती या मंदिराचा प्रचार व प्रसार होण्याची, नृसिंह भक्तांनी येथे येण्याची, नृसिंह कुलदैवत असणाऱ्या सगळ्यांनी याही मंदिराला वर्षातनं एकदाका होईना पण भेट देण्याची, तरच याची महती ही सर्वदूर पोहोचेल व सगळ्यांना श्रीलक्ष्मीनृसिंहाच्या प्रचिती येईल. त्यामुळे आपण एकदा आवर्जून शामराजक्षेत्र म्हणजेच सायखेडला भेट द्यावी.
- प्रसाद पुराणिक
No comments:
Post a Comment