आज २१ डिसेंबर, हुतात्मा #अनंत_कान्हेरे शौर्य दिवस !
आजच्याच दिवशी १९०९ साली नाशिकचा जिल्हाधिकारी ए.एम.टी. जॅक्सन ह्याचा हुतात्मा अनंत कान्हेरे ह्यांनी गोळ्या घालून वध केला !
आजच्या दिवशी १९०९ साली संगीत शारदा या नाटकाच्या प्रयोगादरम्यान अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा तत्कालीन कलेक्टर जॅक्सनचा विजयानंद नाट्यगृहात गोळ्या झाडून वध केला. अनंत कान्हेरे अभिनव भारत संघटनेच्या सदस्य होते .गणेश सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आल्या चा बदला म्हणून कान्हेरे यांनी नाशिकचे न्यायाधीश व तत्कालीन कलेक्टर जॅक्सन यांना २१ डिसेंबर १९०९ ला विजयानंद थिएटरमध्ये गोळ्या घालून ठार केले. त्यावेळी ते फक्त १७ वर्षांचे होते.
२१ डिसेंबर १९०९, नाशिकच्या विजयानंद नाट्यगृहात ‘शारदा’ नाटकाचा खेळ आयोजित केला होता. बालगंधर्वांचा ऐन उमेदीचा काळ त्यांना लाभलेली जोगळेकरांची साथ याने हे नाटक विशेष लोकप्रिय पावले होते,अन आज तर नाशकाचा जिल्हाधिकारी ए.एम.टी. जॅक्सन साठी विशेष खेळ लावला होता.पण जॅक्सन इथे येणार म्हणून फक्त नाटक वाली मंडळी नव्हे,अजूनही तीन व्यक्ती त्या जॅक्सनसाठी,त्याची वाट पाहत नाट्यगृहात थांबल्या होत्या
मंचासमोरून धाड धाड असे एकामागून एक गोळ्यांचे आवाज झाले,अन नाशिकचा तो दुष्ट जिल्हाधिकारी ए.एम.टी. जॅक्सन रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळला.मागे बसलेल्या त्या क्रांतिकारी तरुणाने सुरवातीस एक गोळी आपल्या पिस्तुलाने पाठीमागूनच जॅक्सनवर झाडली पण ती चुकली म्हणून समोर येऊन पुन्हा चार गोळ्या झाडून त्या पापी इंग्रजाचा अंत ह्या तरुणाने केला. गोळ्यांचे आवाज ऐकता हा हा कल्लोळ माजला,अन तितक्यात विनायकराव देशपांडे आणि अण्णा कर्वे सभागृहातून बाहेर पडले,पण हा अनंत कान्हेरे,त्याचा उद्देश वेगळाच,त्याने दुसरेही पिस्तुल काढले आणि स्वतःच्या मस्तकी धरले,स्वतःलाही संपवण्याचा त्याचा प्रयत्न मात्र फसला,गोळी चालवण्याआधीच शेजारी उभ्या अधिकाऱ्याने त्याचा हात पकडून त्याला अटकाव केला.पुढे खटला चालला,गणू वैद्याच्या भित्रेपणामुळे इतरही साथीदार पकडले गेले,अनंत कान्हेरे,विनायकराव देशपांडे आणि कृष्णाजी गोपाळ कर्वे या तिघांना १९ एप्रिल १९१० रोजी फाशीही दिल्या गेली. या तिघांचेही मृतदेह नातलगांना न सोपवता त्यांच्यावर परस्पर अंतिम संस्कार करण्यात आले. ब्रिटिश सरकारने अस्थी ठाण्याच्या खाडीत आणि रक्षा मुंबईला समुद्रात विसर्जित केली.
आपल्या कर्तृत्वाने जॅक्सन चा वध करणारा हा केवळ १९ वर्षांचा तरुण अनंत लक्ष्मण कान्हेरे इतिहासात अजरामर झाला.
#नाशिक #कान्हेरे #जॅक्सन #nashik #kanhere #jackson
No comments:
Post a Comment